Hinjawadi : बिहारच्या पाटण्याजवळील गावाबद्दल वाईट बोलण्याचा विचारला जाब, लॉचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण

हिंजवडी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गावाबद्दल वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने एका लॉचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाकड येथे घडली आहे. ही घटना वाकड हिंजवडी रोडवरील भामा पर्ल सोसायटीमध्ये गुरुवारी (दि.7) पहाटे दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हर्ष कुमार सिंग (वय-22 रा.भामा पर्ल सोसायटी, भुजबळ वस्ती, वाकड-हिंजवडी रोड, हिंजवडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रितीका राजनीशकुमार राज (वय-22 रा. ईद्रासंकरी नगरी, सुश्रीती बिल्डींग, पहीला मजला, कोथरुड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस नाईक गणेश रासाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रितीका या पुण्यात लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहेत. फिर्यादी तरुणी आणि हर्ष कुमार सिंह हे दोघे पटणा येथील रहिवासी आहेत. रितीका आणि हर्ष हे त्यांचे मित्र भास्कर ताई यांच्या घरी भेटले असता आरोपीने रितीका यांच्या गावा विषयी वाईट बोलला. याचा राग आल्याने फिर्यादी तरुणीने याचा जाब विचारला. त्यावेळी हर्ष याने फिर्यादी यांच्या गालावर चापट मारली. रितीका यांनी पुन्हा जाब विचारला असता आरोपी हर्ष याने हातातील कडे फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान आरोपी कोणते शिक्षण घेतो याची माहिती समजू शकली नसल्याचे तपास अधिकारी पोलीस नाईक गणेश रसाळ यांनी सांगितले.