Hinjewadi Shivajinagar Metro Route | हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोसाठी महापालिकेला प्रसंगी ‘रोख’ मोबदला देउन भूसंपादन करावे लागणार; प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गीका (Hinjewadi Shivajinagar Metro Route) क्र. ३ ला महापालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये मान्यता दिली आहे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पीएमआरडीएच्या (PMRDA) माध्यमातून पीपीपी (PPP) तत्वावर उभारण्यात येणार्‍या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या आराखड्यात (Hinjewadi Shivajinagar Metro Route) करण्यात आलेल्या बदलांना मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे (standing committee) मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) या प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन (Land Acquisition) प्रसंगी रोख मोबदला देउन करून द्यावे लागणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गीका (Hinjewadi Shivajinagar Metro Route) क्र. ३ ला महापालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये मान्यता दिली आहे.
२३ कि.मी. लांबीच्या या मार्गीकेचा १४ कि.मी. ट्रॅक आणि १४ स्थानके पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत आहेत.
दरम्यान १ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रशासकिय अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिकेने उपलब्ध करून द्यायची आहे.
यापैकी खाजगी जागेचे भूसंपादन हे महापालिकेने करायचे असून टीडीआर (TDR), एफएसआय (FSI) देउन ज्या जागा संपादीत होणार नाहीत.
त्याचे भूसंपादनासाठी येणारा खर्च महापालिकेने उचलायचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार पीएमआरडीएने प्रकल्पासाठी (PMRDA Project) संपादीत कराव्या लागणार्‍या जागांची यादी महापालिकेला पाठविली आहे.
भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करताना आराखड्यात सुचविलेल्या काही बदलांनाही महापालिकेची मान्यता मागितली आहे.
त्यानुसार महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे (standing committee) ठेवला आहे.

यामध्ये मेट्रो मार्गावरील प्रस्तावित स्थानके व मुख्य रस्त्यांना जोडणार्‍या जिन्यांचे स्थान नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी महापालिकेची परवानगी.
विकास आराखड्यातील रस्त्याच्या मध्य रेषेनुसार पिलर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील प्रस्तावीत रस्ता रुंदीनुसार जागा उपलब्ध करून देणे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील एच.सी.एम.टी.आर च्या आखणीच्या ठिकाणी सुयोग्य नियोजन करून वाहतुक सुधारण विषयक कामे पीएमआरडीए ने करणे.
प्रकल्पाच्या कामामुळे बाधित होणार्‍या सेवा वाहिन्यांचे स्थलांतर पीएमआरडीएने (PMRDA) स्वखर्चाने करणे.
मेट्रो ३ प्रकल्पातून मेट्रो १ व २ प्रकल्पापर्यंत वाहतूक संक्रमण व्यवस्थेची कामे पीएमआरडीएने स्वखर्चाने करणे.
तांत्रिक निकषानुसार व आवश्यक्तेनुसार या मार्गावरील आवश्यक ते फेरबदल तसेच विकास आराखड्यातील रस्त्याच्या आखणी व्यतिरिक्त आवश्यक्तेनुसार मेट्रो मार्गाची आखणी करणे.
प्रस्तावीत मेट्रो ३ मार्गाच्या आखणीबाबत व शासनाच्या टीओडी धोरणानुसार कार्यवाही करण्यास मान्यता मागण्यात आली आहे.

1 वर्षाच्या वॉरंटीसह येथे मिळत आहे जुनी Wagon R कार ! जाणून घ्या किती खर्च करावा लागेल

 

Wab Title :- Hinjewadi Shivajinagar Metro Route | Municipal Corporation will have to acquire land for Hinjewadi – Shivajinagar Metro by paying ‘cash’ on occasion; Before the Standing Committee for proposal approval