51 लाखाला विकली गेली ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवणारी म्हैस ‘सरस्वती’, मालकाला होती चोरीची ‘भीती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील हिसार येथील शेतकरी सुखबीरसिंग ढांडा यांच्या मुऱ्हा जातीची म्हैस सरस्वतीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केले आहेत. त्यात आता आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविले आहे. सुखबीरने तब्बल 51 लाख रुपयांना आली ही म्हैस विकली आहे. सुखबीरने सांगितले कि, त्याला आपल्या म्हशीला विकायचे नव्हते, पण शेजारील दोन म्हशींच्या चोरीनंतर त्याला आपल्या म्हशींची देखील चोरी होऊ शकते अशी चिंता भेडसावू लागली. यामुळे त्याला आपली म्हैस विकावी लागली. मागील वर्षी हिसारमध्ये 29.31 किलो दूध देऊन सरस्वतीने पहिले पारितोषिक जिंकले. अनेक स्पर्धांमध्ये सरस्वतीने आपले सामर्थ्य दाखविले. पण आता सरस्वती पंजाबचा शान वाढवेल.

शेतकऱ्याने केले समारोहाचे आयोजन :
म्हैस विकण्याआधी शेतकऱ्याने सोहळ्याचे आयोजिन केले. त्यात हिसारखेरीज राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील सुमारे 700 शेतकरी सहभागी झाले होते. सुखबीरसिंग म्हणाले की, त्यांनी चार वर्षांपूर्वी सरस्वतीला एक लाख तीस हजार रुपयांत बरोवाला येथील खोखा गावच्या शेतकरी गोपीराम याच्याकडून खरेदी केले होते. यानंतर सरस्वतीने बर्‍याच मुलांना जन्म दिला. सध्या ते दूध आणि वीर्य विकून एक लाखाहून अधिक रुपये कमावत आहेत.

पाकिस्तानी म्हशीचे तोडले होते रेकॉर्ड :

सुबीरने काही दिवसांपूर्वी लुधियाना येथील जगरांव येथे डेअरी आणि अ‍ॅग्री एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. तिथे सरस्वतीने 33.131 किलो दूध देऊन विश्वविक्रम जिंकला होता, ज्यावर तिला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी सर्वाधिक दूध देण्याचा विक्रम पाकिस्तानच्या म्हशीच्या नावावर होता, जिने 32.050 किलो दूध होते.