अमित शहा यांनी नाकारली NSG सुरक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना जास्त धोका आहे त्यामुळे त्यांची सुरक्षा यंत्रणा खूप कडक ठेवण्यात येते. मात्र अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजे एनएसजीची सुरक्षा नाकारत केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा कायम ठेवली आहे.

केंद्रीय गृहमंत्री झाल्यावर अमित शहा यांची सुरक्षा यंत्रणा बदलून एनएसजीची करण्यात येणार होती. मात्र शहा यांनी ही सुरक्षा यंत्रणा नाकारली आहे. या आधीचे गृहमंत्री राजनाथ सिंह, पी. चिदंबरम, सुशील कुमार शिंदे यांना सुद्धा एनएसजीची सुरक्षा यंत्रणा देण्यात आली होती. गृहमंत्री झाल्यामुळे शहा यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

अमित शहा यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे १०० कमांडो तैनात असतात. जे कार्यालयापासून निवासस्थान आणि प्रवासामध्ये शाह यांची सुरक्षा करतात. शाह यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसही तैनात असतात. ६ ए कृष्णा मेनन मार्गावर अमित शाह यांचे निवासस्थान आहे. तिथे दिल्ली पोलिसांचे ५० जवान तैनात असतात.

कशी आहे नेमकी एनसीजी सुरक्षा प्रणाली
एनएसजी ही देशातील एलिट कमांडो फोर्स आहे. खास दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन्ससाठी एनएसजीची स्थापना करण्यात आली. एनएसजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते. १९८४ सालच्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एनएसजीची स्थापना करण्यात आली. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षेचीही जबाबदारी आहे. एनएसजी जवानांचा जो युनिफॉर्म आहे त्यामुळे मीडियामध्ये त्यांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाते.

You might also like