#PulwamaAttack बिहारचा दौरा रद्द करून गृहमंत्री उद्या काश्मीरला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे केंद्रीय राखील पोलीस दलाच्या ताफ्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे ३० जवान शहीद झाले आहेत. त्याच प्रमाणे २८ जवान जखमी झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या भीषण हल्ल्याच्या पाहणीसाठी सरकारी प्रतिनधी म्हणून गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या काश्मीरला जाणार आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्याचा बिहार दौरा रद्द केला आहे. त्या बदल्यात ते श्रीनगरला जाणार आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजनाथ सिंह यांनी सीआरपीएफचे पोलिस महासंचालक आ.आर.भटनागर यांनी या हल्ल्याची माहिती घेतली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री उद्या काश्मीरला जाणार आहेत.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सुरक्षा समितीची तातडीची बैठक दिल्लीत बोलावली असून या हल्ल्याचा सरकार बदला घेण्याच्या पवित्र्यात असल्याचे यामधून दिसते आहे. तसेच केंद्र सरकारने भूतान दौऱ्यावर असणारे भारताचे गृह सचिवांना तातडीने मायदेशी परतण्याचे निर्देश देण्यात आले आहे.