Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Honey Trap | कोल्हापूरच्या (Kolhapur) एका साखर व्यापाऱ्यास हनीट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकवून त्याच्याकडून तब्ब्ल तीन कोटींची खंडणी (ransom) उकळल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने फॅशन डिझायनर महिलेसह (fashion designer) दोन सराफांना (Two bullion) अटक केली आहे. तर अन्य एका महिलेचा शोध सुरु आहे.

 

लुबना वझीर (४७), अनिल चौधरी (४२) आणि मनीष सोदी (४८, सर्व रा अंधेरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूरचे साखर व्यापारी (Kolhapur Trader) २०१६ मध्ये कामानिमित्त गोव्याला गेले होते. त्यावेळी त्यांची लुबना हिच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. दरम्यान २०१९ मध्ये कामानिमित्त संबंधित व्यावसायिक कामानिमित्त मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (Mumbai Fivestar Hotel) थांबले होते. त्यावेळी लुबना हिने मैत्रिणीसह सोबत जेवण्याचा आग्रह केला.

 

दोघीही त्यांच्या रूम मध्ये पोहोचल्या. जेवण उरकल्यानंतर यातील एक जण कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बाहेर लॉबीमध्ये गेली. थोड्यावेळाने ती महिला परतली त्यावेळी संबंधित व्यावसायिक दरवाजा उघडण्यासाठी गेले. दरम्यान, रूममध्ये असणाऱ्या महिलेने (Honey Trap) काही समजण्याच्या आतच अचानक कपडे बदलून टॉवेल गुंडाळून व्हिडीओ करण्यास सुरुवात केली. पुढे हेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याची धमकी देत मार्च २०१९ ते आतापर्यंत ३ कोटी २६ लाख रुपये उकळले. दरम्यान संबंधित महिला आणखीन पैशाची मागणी करू लागल्याने त्यांनी थेट गुन्हे शाखेत (Crime Branch) तक्रार दिली.

या प्रकरणाचा कक्ष १० ने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. १८ नोव्हेंबरला व्यावसायिकाकडे १७ लाखाची मागणी केली होती.
अंधेरीतील एका कॉफी शॉपमध्ये पैसे देण्यासाठी बोलावले होते. व्यावसायिक ते पैसे घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचला.
त्यावेळी गुन्हे शाखेच्या (Mumbai Police Crime Branch) पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली.
तर अन्य एक महिला फरार झाली. तिचा पोलीस शोध घेत आहे.

 

Web Title :- Honey Trap | kolhapur trader in honey trap and ransom rs 3 crore mumbai police crime branch arrest three with one woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | ‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’ ! 31 वर्षीय पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ; पुण्यातील धक्कादायक घटना

Interfaith Marriage Registration | आंतरधर्मीय विवाह नोंदणीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश

Radhika Madan | गर्भनिरोधक गोळ्या घेऊन पूर्ण करावं लागलं शूटिंग; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा