चांगली बातमी ! लवकरच बाजारात येणार 80 % सुरक्षा पुरवणारे ‘अँटी बॅक्टेरियल’ मास्क

हाँगकाँग : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हेच यावरील उपाय सध्यातरी आहेत. कोरोना विरुद्धच्या विविध औषधांची चाचणी देशभर सुरु असून शास्त्रज्ञांनी नवीन मास्क तयार केल्याचा दावा केला आहे.Graphene मास्क असे या मास्कचे नाव असून हा मास्क अँटी बॅक्टेरियल असून सूर्यप्रकाशात 10 मिनिटे ठेवल्यास तो स्वच्छ होतो.

ACS Nano या जर्नलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या दोन चाचण्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या दोन प्रजातींना नष्ट करण्यात या मास्कचा मोठा फायदा झालेला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी येणारा खर्च हा खूप कमी आहे. तसेच या मास्कची विल्हेवाट लावणे देखील सोपे आहे. त्यामुळे वापरलेले मास्क नष्ट करण्याचे कोणतेही टेन्शन नाही. अशी माहिती हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकाने सांगितले आहे.

संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, सध्या वापरात असलेल्या मेडिकल मास्क अँटी बॅक्टेरियल नसून हे मास्क फेकून दिल्यास अथवा ठेवल्यास याला कुणी स्पर्श केल्यास व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे. या संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ. ये रुक्वान ग्राफीन हे त्यांच्या अँटी बॅक्टेरिया संबंधी संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी ओळखले जातात.

82 टक्के अँटी बॅक्टेरियल

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबर मध्ये laser-induced असणारे मास्क ग्राफिन यांनी तयार करण्याचे काम आणि संशोधन सुरु केले होते. या संशोधनासाठी या टीमने laser-induced graphene मास्क हे टेस्ट करताना त्यांना हा मास्क 82 टक्के अँटी बॅक्टेरियल आढळला. सर्व मास्कमध्ये कायम वापरल्या जाणाऱ्या कार्बन फायबर आणि melt- blown fabrics चा या मास्कमध्ये खूप कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे. याचे प्रमाण 2 आणि 9 टक्के आहे.

8 तासात विषाणू नष्ट होतो

संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, या मास्कवर जमा होणारा व्हायरस 8 तासात नष्ट होतो. तर इतर मास्कवर विषाणू तसाच जिवंत राहतो. त्यामुळे अँटी बॅक्टेरियासाठी हा मास्क खूप उपयोगी असून इतर मास्कच्या तुलनेत व्हायरसचा सामना हा मास्क जास्त करत असून कोरोना व्हायरसच्या संकटात हा मास्क अधिक सुरक्षा पुरवणारा आहे.

उन्हात ठेवताच कार्यक्षमता वाढते

मागील काही संशोधनात असे दिसून आले आहे की, कडक उन्हामध्ये कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे या टीमने त्यादृष्टीने संशोधन केले. त्यावेळी त्यांना आढळून आले कि, हे मास्क उन्हात ठेवल्यानंतर 10 मिनिटांतच ग्राफीन मटेरियलची अँटी-बक्टेरियाची कार्यक्षमता वाढलेली दिसली. त्यामुळे सध्याच्या मास्कच्या तुलनेत हा मास्क अधिक सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे.

लवकरच येणार बाजारात

ग्राफिन यांची टीम सध्या चीनमधीलल लॅब्रोट्ररीबरोबर मानवी कोरोना व्हायरससह ग्राफिन मटेरिअलची चाचणी करत आहे. तसेच हा मास्क पुन्हा स्वच्छ करुन वापरता येऊ शकतो कि नाही याचे देखील संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर हे मास्क लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.