कचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात रोज सकाळी रस्त्यांची साफ सफाई तसेच विविध वसाहतींतून झाडलोट करून कचरा वेचणाऱ्या ३० महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या महिलांना साडी-चोळी व शाल भेट देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला.

पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनासंबंधी जनजागृती करताना पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार ठुबे यांच्या हस्ते करण्यात आला.

केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाचे संचालक राज देशमुख, पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, डॉ. ज्योती दीपक, मर्चंटस बँकेच्या संचालक मीना मुनोत, पर्यावरण मंडळाचे तुकाराम अडसूळ, जयसिंगराव जवळ, भरत बिडवे, लायनेस क्लबच्या निलम परदेशी, सुनंदा तांबे, अमल ससे, लायन्स क्लबच्या राजश्री मांढरे, हेमलता बरमेचा आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन झाडाला पाणी देऊन करण्यात आले.

‘पर्यावरण समतोल राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची असून यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. येथे कोणी एकटा काहीच करू शकत नाही, प्रत्येकाची इच्छाशक्ती महत्त्वाची असते,’ असे ठुबे या वेळी म्हणाले.

कचरा वेचण्याच्या कामातून कष्टकरी महिला पर्यावरणाचे संरक्षणाचे काम करीत असल्याने त्यांचा सन्मान कौतुकास्पद उपक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शारदा होशिंग यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब जठार यांनी आभार मानले.

आरोग्य विषयक वृत्त –

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘गुगल मॅप्स’ आणणार नवीन ‘अ‍ॅप’

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती