शिरूर येथे महिलांसाठी हॉलीबॉल प्रशिक्षण सुरू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन : ग्रामीण भागातील महिलांना हॉलीबॉल खेळामध्ये राज्य व देशपातळीवर आपले नाव उंचावण्यासाठी शिरूर शहरात कल्पतरू फौंडेशन च्या वतीने सुरू करण्यात आलेले व्हॉलीबॉल प्रशिक्षण कौतुकास्पद असल्याचे शिरूर च्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी सांगून, महिलांनी या खेळामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले .

शिरूर सेंटर शाळा मैदान येथे संस्था यांच्या वतीने शाळा, कॉलेज तरुणी, व महिलांसाठी हॉलीबॉल प्रशिक्षण सुरू केले याचे उदघाटन नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या .

यावेळी घोडगंगा चे संचालक राजेंद्र गावडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेविका मनीषा कालेवार, उज्वला वारे, रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे कल्पतरू फौंडेशन च्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता कवाद, डॉक्टर, विजय कवाद, रमेश लामखडे, जयश्री जासूद, संगीता शिंदे, रुपाली लामखडे, डॉक्टर नूतन क्षीरसागर, गणेश मराठे उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांना खेळाकडे आकर्षित होऊन राज्य, देश, व जागतिक पातळीवर आपले, देशाचे नाव उंचावे यांसाठी हे हॉलिबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

यावेळी रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी सांगितले की शिरूर शहरांत महिलांसाठी हॉलिबॉल खेळाचे प्रशिक्षण सुरू करून, ग्रामीण भागात महिला खेळाकडे वळतील कॉलेज, शाळा यामधे हॉलिबॉल च्या स्पर्धा असतात परंतु ग्रामीण भागात या खेळाचे प्रशिक्षण नसल्याने कॉलेज, तरुणी’ महिला या खेळाकडे दुर्लक्ष करीत होत्या परंतु कल्पतरू फौंडेशन यामुळे चांगले खेळाडू तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.