‘या’ नैसर्गिक उपायांनी करा हार्मोन्सचे नियंत्रण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – शरीरात हार्मोन्सची पातळी बिघडल्यानंतर विविध लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ओळखता यायला हवीत. अनियमित मासिक पाळी, मूड खराब होणे, थकवा येणे, वारंवार पोट खराब होणे यांसारखी लक्षणे हार्मोन्सशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे बहुतांश महिलांना हे माहित नसते. हार्मोन्समध्ये झालेले हे बदल नियंत्रित करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीपेक्षा नैसर्गिक उपायांनाच प्राधान्य दिले पाहिजे.

महिलांना अनियमित मासिक पाळी, मूड खराब होणे, थकवा येणे, वारंवार पोट खराब होणे, अशी लक्षणे आढल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर काही चाचण्या केल्यानंतर यावर तपासणी व उपाय करतात. ही समस्या उद्भवण्यामागे तणावसुद्धा कारणीभूत आहे. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक सायकलला तणाव प्रभावित करतो.

ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो, त्यापासून दूर राहिले पाहिजे. रात्री पुरेशी झोप घ्यावी. रिलॅक्स होण्यासाठी ध्यानसाधना करावी. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे नियमित सेवन करावे. सुका मेवा, सर्व प्रकारच्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. तसेच नियमित व्यायाम केल्यास चांगला फरक दिसून येईल.