5 जून राशीफळ : आज सौभाग्य योग, 6 राशींची चांदी, होईल भरपुर लाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
June 5 horoscope : दिवस शुभ फलदायक आहे. शासनाद्वारे सन्मानित केले जाऊ शकते. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य आणि सान्निध्य मिळेल. आज कर्ज घेणे टाळा, परतफेड अशक्य होईल. जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल. नवे मित्र होतील. घरात शुभकार्यावर चर्चा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. June 5 horoscope

वृषभ
आव्हानांचा दिवस आहे. काम पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु आव्हाने स्वीकाराल आणि पुढे जाल, यश मिळेल. संतती, भावा-बहिणीशी संबंधीत महत्वाचा निर्णय घ्याल. सायंकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. व्यस्त असाल. धावपळीमुळे सायंकाळी थकवा जाणवेल.

मिथुन
खर्चाचा दिवस आहे. काही आजार असेल तर त्रास होईल, डॉक्टरांचा सल्ला घ्या. सायंकाळी अचानक धनलाभ होईल. संततीकडून आनंदाची बातमी समजेल. मन प्रसन्न राहील. परदेशातील आप्तांकडून शुभवार्ता समजेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

कर्क
दिवस भाग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. प्रॉपर्टीत गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. संततीच्या कार्याचा अभिमान वाटेल. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. कुणाच्या तरी मदतीसाठी पुढे जावे लागेल. आर्थिक सुख-सुविधांसाठी पैसे खर्च कराल. शत्रु त्रास देतील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. त्रास होऊ शकतो.

सिंह
दिवस संमिश्र फलदायक आहे. संपत्ती खरेदीत यश मिळेल, सर्व बाजू तपासा. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला यश देईल. डोळ्यासंबंधीत त्रास होऊ शकतो. सासरच्या बाजूशी वाद होऊ शकतो. परंतु जोडीदार तुमच्या बाजूने राहील. घरातील तणाव संपेल.

कन्या
ठोस परिणामांचा दिवस आहे. सर्व कामे पूर्ण होतील. जोडीदाराला शारीरीक त्रास होऊ शकतो. यासाठी धावपळ करावी लागेल. खर्च होईल, डॉक्टरांचा सल्ला घ्या. परोपकार टाळा. कामाकडे लक्ष द्या. आत निर्भिडतेचा भाव राहील. कठिण काम पूर्ण कराल.

तुळ
सुखद परिणामांचा दिवस आहे. अधिकार आणि संपत्तीत वाढ होऊ शकते. गुरुनिष्ठा यश देईल. नवीन कामात गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. रूसलेल्या जोडीदाराला समजावण्याचा प्रयत्न कराल. आईशी वाद होऊ शकतो. वाणी मुधर ठेवा. नोकरीत पदोन्नती मिळेल.

वृश्चिक
दिवस त्रास देणारा ठरू शकतो. व्यापारात वाढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
वाद मार्गी लागेल. नोकरीत शत्रु त्रास देईल
वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेने समस्येतून बाहेर याल.
पैशांची बचत करू शकता.
भावाच्या मदतीची आवश्यकता असेल.

धनु
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
सायंकाळी आरोग्यात घसरण होऊ शकते.
अनियंत्रित खाणे-पिणे पोटासाठी त्रासदायक ठरेल.
दान, पुण्याची भावना राहील. आई-वडीलांचे सान्निध्य लाभेल.
सर्व लोकांपासून योग्य अंतर राखून रहा. जुन्या मित्राची भेट झाल्याने आनंद होईल.

मकर
ठोस परिणामांचा दिवस आहे. सासरच्या बाजूने मान सन्मान मिळेल.
व्यापारात नवीन प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
काही कामे रखडली असतील तर ती पूर्ण होतील. नवीन कामांना यश मिळेल.
मौल्यवान वस्तुंसाठी काही पैसे विनाकारण खर्च करावे लागतील.

कुंभ
दिवस फायद्याचा सौदा घेऊन येईल. संसारिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. सायंकाळी प्रवास कराल. रोजगार मिळेल. मर्यादित पैसा खर्च करा. जवळची व्यक्ती विश्वासघात करू शकते, सावध रहा. बुद्धी आणि विवेकाने नवीन शोध लावाल, यश मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीनुसार फलप्राप्ती होईल.

मीन
दिवस उत्तम फलदायक आहे. घरातील रखडलेले विवाहाचे प्रकरण मार्गी लागेल. रात्री कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. सामाजिक क्षेत्रात विस्तार होईल, अनंद वाढेल. सामाजिक सन्मान मिळाल्याने मनोबल वाढेल. लाभ होईल. जोडीदारा कुठेतरी फिरायला घेऊन जाल.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !