1 मार्च राशिफळ : मार्चचा पहिला दिवस देईल 5 राशींना आनंदाची भेट, वाढेल बँक बॅलन्स, इतरांसाठी असा आहे सोमवार

मेष
आज अचानक घरी एखादा पाहुणा येईल, परंतु तुम्ही त्यांचे मनापासून स्वागत कराल. कुटुंबातील सर्व सदस्य आदरातिथ्यात व्यस्त असतील. लहान मुले मजा करतील. प्रवासातून फायदा होईल. एखाद्या उच्च अधिकार्‍याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु ते टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी मेहनत करावी लागेल. जोडीदाराशी छोटा-मोठा वाद होऊ शकतो.

वृषभ
आज जोडीदारासोबत मौजमस्ती आणि पार्टीत काही वेळ घालवाल. व्यवसायात सावधगिरी बाळगली पाहिजे, तरच लाभ होईल. भौतिक सुखाची साधने वाढतील आणि शुभ परिणाम होतील. शब्द ठामपणे लोकांसमोर मांडण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक मालमत्तेसंदर्भात कुटुंबात वाद होऊ शकतात परंतु त्यामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वडिलांच्या सल्ल्याने संध्याकाळी वाद मिटेल. विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा जागृत होईल.

मिथुन
जे लोक व्यापर करतात, त्यांचा दिवस नवीन योजना बनविण्यात व्यतीत होईल. कर्ज कमी होईल. संततीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विरूद्ध लिंगाच्या मित्राशी कटुता येऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना नवीन कला शिकण्याची संधी मिळेल. आज जे रोजगार शोधत आहेत त्यांनी वेळ वाया घालवू नये. चांगली बातमी मिळेल. जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता.

कर्क
आज सायंकाळ ते रात्रीपर्यंतचा वेळ अध्यात्म, धार्मिक कार्यात जाईल, ज्यासाठी पैसे खर्च करावे लागतील, परंतु मन आनंदी होईल, ज्यामुळे सन्मान वाढेल. सर्व कामे पार पडतील. अनेक दिवसांपासून ज्याचा विचार करीत आहात ते काम आज पूर्ण होईल. भौतिक सुख आणि समृद्धी वाढेल. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. भावंडांना एखादा सल्ला देऊ शकता, जो उपयुक्त ठरेल. जीवनात प्रेम वाढेल.

सिंह
आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ एखाद्या राजकीय समारंभात घालवाल, ज्यामुळे मन शांत होईल. कार्यक्षेत्रात वातावरण अनुकूल असेल. विरोधक प्रबळ राहतील. बुद्धीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, भाग्य उजळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास ते करू शकता. वडिलांच्या तब्येतीत थोडी घसरण होऊ शकते. विद्यार्थ्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळेल.

कन्या
आपल्या मागील काही समस्या आज संपतील. शत्रुसोबतचे वादही संपुष्टात येतील, ज्यामुळे आनंद होईल. कुटुंबात मंगल कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. खर्च कमी झाल्यामुळे आर्थिकस्थिती सुधारेल. वाहनाचे सूख सुद्धा आज मिळेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीमुळे वैर वाढू शकते. तुमची सर्व कामे पूर्ण झाल्याने नातलगांना इर्षा वाटेल, परंतु काळजी करू नका कारण ते तुमचे काही वाकडे करू शकणार नाहीत. जोडीदाराचा सल्ला कौटुंबिक व्यवसाय पुढे घेऊन जाईल.

तुळ
नोकरीत अधिकारामध्ये आज वाढ होईल. नातेवाईकाडून एखाद्या प्रकरणात खुशखबर मिळू शकते. व्यवसायात आज पैशांचा पाऊस पडेल. यामुळे संपत्ती वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या मंगल सोहळ्याला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी सुरू करावी लागेल. तसे केले नाही तर नुकसान होऊ शकते.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. आज तुमची भेट एखाद्या अशा व्यक्तीशी होईल, ज्यास भेटण्याचा विचार तुम्ही बर्‍याच कालावधीपासून करत होतात. आज दूरचा किंवा जवळचा प्रवास करू शकता. ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आनंद होईल. खाण्या-पिण्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे पदार्थ उपलब्ध होतील. परंतु खाण्यापिणे नियंत्रित ठेवा. अन्यथा पोटाची समस्या उद्भवू शकते. संततीच्या भविष्याबाबत चिंता वाटू शकते.

धनु
आज व्यापरात नवी योजना मार्गी लागतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल आणि भविष्यातील चिंता कमी होतील. भावा-बहिणींचे सुख आणि सहकार्य लाभेल. यामुळे मनामध्ये आनंदाची भावना राहिल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत खास चर्चेत संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा वेळ घालवाल. आध्यात्मिक आणि ज्ञान मिळवण्यासाठी दिवस व्यतीत होईल. पूजा पाठात रस वाढेल.

मकर
आज पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. कारण भाग्य साथ लाभणार नाही. कोणावरही विश्वास ठेऊ नका. शक्ती वाढेल, शत्रूंचा नाश होईल. मानसिक चिंता त्रास देऊ शकते. काही कारणामुळे आजारी देखील पडू शकता. हवामानामुळे आरोग्य बिघडू शकते. स्वतःची काळजी घ्या. विद्यार्थ्यांची मेहनत यशस्वी होईल. परीक्षेचा चांगला निकाल मिळेल. जोडीदाराचे कौटुंबिक व्यवसायात पूर्ण सहकार्य मिळेल.

कुंभ
आजचा दिवस कायदेशीर कामांसाठी फलदायी आहे. जी कामे अडकली होती ती आज पूर्ण होतील. व्यवसायात आपले म्हणणे इतरांसमोर मांडू शकाल आणि लोक तुमचे म्हणणे ऐकतील ज्यामुळे मान सन्मान वाढेल. शत्रूपक्षाचे खच्चीकरण होईल. एखाद्या धार्मिक समारंभात जाण्याची संधी देखील मिळू शकते. जोडीदारास कुठेतरी फिरण्यासाठी देखील घेऊन जाऊ शकता.

मीन
धार्मिक कार्यात रस खूप वाढेल. कुटुंबात एखादी नवीन उपासना देखील करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील मोठे सदस्य व्यस्त असतील. आजचा दिवस चांगला आहे. विद्यार्थी गुरुंची सेवा करतील आणि गुप्त विद्या घेतील. आरोग्यात घसरण होऊ शकते. म्हणून आरोग्याबाबत जागरूक रहा. आज कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील. संततीकडून यशदायक बातमी मिळू शकते, ज्यामुळे मनात समाधानाची भावना असेल.