2 एप्रिल राशिफळ : आज शिवयोग, ‘या’ 5 राशीवाल्यांसाठी अतिशय भाग्यशाली दिवस, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरी आणि व्यापारात कामाचा भार जास्त असेल, परंतु व्यस्तता असून प्रेमासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे जोडीदार खुश होईल. ऑफिसमध्ये ज्या कर्मचार्‍यांशी मोठ्या कालावधीपर्यंत बातचीत होत नव्हती, आज त्यांच्याशी मैत्रिची सुरूवात होईल. व्यापारात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता, परंतु आरोग्याबाबत जागृत रहा. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. सामाजिक कार्यात गुंतलेले राहाल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे भरपूर सहाकार्य मिळेल. व्यापाराला गती देण्यासाठी एखाद्या ज्येष्ठाच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही खर्च होतील, जे इच्छा नसतानाही करावे लागतील. संततीकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. सायंकाळ मित्रांसोबत फिरण्यात घालवाल.

मिथुन
व्यापारासाठी दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात एखादी नवीन डिल फायनल होईल. यामुळे मन आनंदी होईल. जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. व्यापारात धनलाभ होऊ शकतो. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि चिंता कमी होईल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. सायंकाळ कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मंगल कार्याक्रमात घालवाल.

कर्क
आजचा दिवस सामान्य आहे. व्यापारात मन आज दुखी राहू शकते कारण शत्रु आज एखादे षडयंत्र रचू शकतात, यासाठी सतर्क राहावे लागेल, तरच वाचू शकता. नोकरीत धनलाभाची शक्यता आहे. मित्रांसोबत संबंधात थोडा दुरावा येऊ शकतो, परंतु वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक दृष्टिकोणातून दिवस संमिश्र आहे.

सिंह
आज नोकरी व व्यवसायात प्रगतीची संधी प्राप्त होईल. आज तुम्ही बनवलेल्या योजनांवर लोकांना काम करताना पहाल, ज्यामुळे मनात आनंदाची भावना राहिल. घाईगडबडीत केलेल्या कामामुळे अडचणी वाढतील. कुटुंबात सौम्यता कायम राखा आणि वेळेत सर्व कामे पूर्ण करा. आर्थिक दृष्टिकोणातून दिवस चांगला आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात एखादा मंगल कार्यक्रम होऊ शकतो.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. संततीच्या भविष्याची चिंता सतावू शकते, परंतु सायंकाळी ही चिंता ज्येष्ठांच्या सल्ल्याने संपेल. आरोग्यात गडबड होऊ शकते, यासाठी धावपळ करावी लागेल आणि पैसे सुद्धा खर्च होतील. विद्यार्थ्यांना आज गुरूंची सेवा करण्याची संधी मिळेल. मामाच्या बाजूने काही वाद होऊ शकतो.

तुळ
आजचा दिवस रखडलेली कामे पूर्ण करण्याचा आहे. जर एखादी गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे आणि भाग्याची सुद्धा भरपूर साथ मिळेल. बँक कर्मचार्‍यांच्या वेतनात आज वाढ होऊ शकते. एखाद्या दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कृषी कार्याशी संबंधीत लोकांना आज विशेष लाभ होऊ शकतो. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांमध्ये एखादा वाद होऊ शकतो.

वृश्चिक
आजचा दिवस अडचणींचा आहे, यासाठी विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या, अन्यथा अडचणीत सापडू शकता. व्यापारात येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी वडीलांचा सल्ला आवश्यक असेल. जर एखादी डिल फायनल करणार असाल तर, ती आज थोड्या अडचणीनंतरच पूर्ण होईल. प्रतिक्षा करावी लागेल, परंतु सायंकाळी काही अडचणींमध्ये मार्ग निघेल, तेव्हा मनात आनंद निर्माण होईल.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर तो आज समाप्त होईल. सकाळपासूनच पाहुण्यांची ये-जा राहिल, ज्यामध्ये धनलाभ होईल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. जर कुणाकडून उधार पैसे घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका कारण ते परत करणे अवघड होईल. जी कामे अर्धवट आहेत ती पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे, यासाठी आळसाचा त्याग करून पुढे जा. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता आहे.

मकर
व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. कार्यक्षेत्रात काही चांगल्या संधी प्राप्त होतील, ज्यांच्याबाबत जास्त विचार करत बसू नका, अन्यथा हातातून निसटून जातील. ताबडतोब निर्णय घेवून कार्यवाहीवर फोकस करा. राजकीय क्षेत्रात सुद्धा आज तुमची ख्याती होईल. नोकरी करत असलेल्या जातकांना आपल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहावे लागेल, अन्यथा विरोधक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करू शकतात. रोजगाराच्या क्षेत्रातील जातकांना उत्तम संधी मिळेतील.

कुंभ
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. व्यवसायातील अडचणींवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. वीमा फायनान्सर प्लॅनिंगच्या कामाशी संबंधीत जातकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मामाच्या बाजूने धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आज आपल्या मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनवू शकतात. जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या कामात यश प्राप्त होईल. जर एखाद्या कामात गुंतवणुक करायची असेल तर दिवस उत्तम आहे.

मीन
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. चतुराईने सर्व समस्यांवर मार्ग काढावा लागेल, तेव्हाच मन आनंदी होईल. लोक आज तुमचे यश पाहून द्वेषाची भावना बाळगतील, परंतु तुम्हाला त्यांची पर्वा करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही पुढे वाटचाल करत राहा. संयम कायम ठेवा. आईच्या आरोग्यात घसरण होऊ शकते. आज एखादा वाद उत्पन्न होऊ शकतो, परंतु त्यापासून दूर राहा, अन्यथा कायदेशीर होऊ शकतो.