4 एप्रिल राशिफळ : 7 राशींसाठी दिवस चांगला, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता वाटू शकते, पैसे खर्च होतील. ताण राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहकार्य कराल. भावाच्या सल्ल्याने व्यवसायाची वाढ होईल. प्रेमसंबंधात तणाव असू शकतो, म्हणून बोलणे आणि वागणे या दोन्ही गोष्टींवर संयम ठेवण्याचा प्रयत्न करा, नाराज जोडीदाराला समजावण्याचा प्रयत्न करा. भावाबरोबरचे संबंध दृढ होतील. विवाहित लोकांसाठी सर्वोत्तम काळ आहे.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. आईबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थ होऊ शकता. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात दैनंदिन गरजांवर पैसे खर्च करू शकता ज्यामुळे अडचणीत येऊ शकता. जर काही समस्या येत असेल तर संध्याकाळी ती दूर करण्यासाठी शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. संततीला धार्मिक कार्यात गुंतलेले पाहून आनंद होईल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. नवीन कामात गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर ती यशस्वी होईल. आज कुटूंबातील सदस्यांमध्ये परस्पर विवाद होऊ शकतो. संततीच्या भविष्याची काळजी सतावू शकते. भाऊ किंवा बहिणीच्या लग्नाचा विषय पक्का होऊ शकतो. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल. संध्याकाळ कुटुंबातील छोट्या सदस्यांसह खेळण्यात घालवाल.

कर्क
आजचा दिवस प्रगतीची नवी आशा घेऊन येईल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. आळसाचा त्याग करावा लागेल. जे परदेशाशी संबंधीत व्यापार करतात, त्यांना कामात यश मिळण्याचा योग आहे. कार्यक्षेत्रात अधिकारी तुमच्या कार्याने प्रभावित होतील. बुद्धी आणि विवेकाने केलेल्या कामात यश मिळेल. कुटुंबातील छोट्या मुलांसोबत वेळ चांगला व्यतीत होईल. अचानक धनलाभाचा योग आहे.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. परदेशात राहणार्‍यांच्या कुटुंबियांकडून शुभवार्ता समजेल. विवाहासाठी इच्छूक जातकांना चांगले प्रस्ताव येतील. गरीबांच्या मदतीसाठी काही खर्च कराल. ज्यामुळे मनाला शांती मिळेल. या कामात जोडीदार सहकार्य करेल. यश मिळेल. सायंकाळी धर्म आणि अध्यात्मात रूची वाढेल. कार्यकुशलतेने इतर लोकांना आकर्षित कराल. विद्यार्थ्यांना पैशांची गरज भासेल.

कन्या
आज असे खर्च करावे लागती, जे करण्याची इच्छा नसेल. परंतु तरीसुद्धा आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रभाव वाढेल, वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात सुखद अनुभव येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले गुण मिळतील. संततीच्या भविष्याची चिंता संपेल.

तुळ
आज कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्याने समस्या कमी होतील. जास्त मेहनत केल्याने आरोग्यात घसरण होऊ शकते. नोकरीत अधिकारांमध्ये वाढ होईल आणि आत्मबळ वाढेल. कार्यक्षेत्रात प्रोजेक्ट यशस्वी झाल्याने सर्वजण धैर्य आणि धाडसाचे कौतूक करतील. विद्यार्थ्यांची आर्थिक संकटातून सुटका होईल. सायंकाळी कोणतेही जोखमीचे काम करू नका, अन्यथा निराशा हाती लागू शकते.

वृश्चिक
आज धावपळ होईल, आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावे लागेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाशी संबंधीत आजार होण्याची शक्यता आहे. व्यापारात काही योजना बनवाल, ज्यामुळे भविष्यात लाभ होईल. व्यापारात काही नवनवीन बदल कराल, ज्यांचा भविष्यात लाभ मिळेल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहाचा प्रस्ताव पक्का होऊ शकतो. संतती संबंधी एखादी शुभवार्ता समजू शकते.

धनु
आज पदोन्नती होऊ शकते आणि अधिकारी वर्गाचे पूर्ण सहकार्य मिळेल, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात नवीन उर्जेचा संचार होईल आणि दाम्पत्य जीवनात नाते आणखी मजबूत होईल. अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सहकार्य मिळेल. सायंकाळी रखडलेली कामे पूर्ण होतील, परंतु हे तेव्हाच होईल जेव्हा आळसाचा त्याग कराल.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. मोठ्या कालावधीपासून रखडलेली कामे पूर्ण होताना दिसतील आणि धार्मिक कार्यात सुद्धा सहभाग वाढेल. कार्यक्षेत्रात व्यस्त असूनही प्रेमसंबंधासाठी वेळ काढण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे जोडीदार आनंदी होईल. कौटुंबिक संपत्तीशी संबंधीत एखादे प्रकरण सुरू असेल तर आज एखाद्या मोठ्या अधिकार्‍याच्या मदतीने ते मार्गी लागेल. निर्णय घेण्याच्या क्षमतेमधून लाभ होईल. सायंकाळी एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल आणि ओळख वाढेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे.

कुंभ
आजचा दिवस भविष्यातील नवीन योजनांसाठी उत्तम लाभदायक आहे. जर आज एखादे काम करण्यासाठी जात असाल तर त्यामध्ये आई-वडीलांच्या आशीर्वादाने यश प्राप्त होईल. चांगल्या कर्मांमुळे तुमच्या कुटुंबाचे नाव मोठे होईल. व्यापारात विद्यार्थ्यांमुळे काही स्थितींचा सामना करावा लागू शकतो, परंतु आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. कुटुंबात एखाद्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. आपल्या मातेच्या आरोग्याबाबत सावध राहा.

मीन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. संतती आणि जोडीदाराप्रती प्रेमभावना वाढेल. नोकरी करणार्‍या जातकांचे प्रमोशन होण्याची मोठी शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आज एखाद्या अन्य व्यक्तीमुळे अचानक चिंता वाढू शकते, परंतु आपल्या बोलण्याने ती ताबडतोब दूर कराल. वडीलांच्या आरोग्याची काळजी घ्या. जनसमर्थन मिळेल. सासरच्या बाजूकडून लाभ मिळण्याची आशा आहे. नोकरीत कामाचा भार वाढू शकतो.