5 डिसेंबर राशिफळ : शनिवारी ‘या’ 4 राशीवाल्यांनी रहावे ‘सावध’, होऊ शकते ‘आर्थिक नुकसान’

 

मेष
आजचा दिवस मध्यम आहे. वैवाहिक जीवनात तणाव कायम राहील. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून नाराज होऊ शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कुटुंब तुमच्यासोबत आनंदाने दिवस घालवेल. आईवर देखील खुप प्रेम कराल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सूख आणि शांती प्राप्त होईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात मन लागेल.

वृषभ
आजचा दिवस धावपळीचा असेल. मानसिक ताण वाढेल. कामात यश मिळेल, पण उशीर झाल्याने कधी आनंद तर कधी वाईट वाटेल. कुटुंबातील लहानांशी संबंध मजबूत होती. त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल. जुन्या मित्राशी चर्चा होईल, जुन्या आठवणींना उजळा मिळेल. कामासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. पैसा येईल, आनंद देईल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानंतर चांगले वाटेल. वैवाहिक जीवन तणावमुक्त राहील, जे तुम्हाला आनंदी करेल. कामात यश मिळेल. संततीकडून आनंद मिळेल. समाधानी लाभेल. उत्पन्नामध्ये वाढ होईल. शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात दिनमान अपेक्षेपेक्षा जासत अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीसोबत आपले भविष्य पहाल.

कर्क
आजचा दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात आनंद होईल, दोघांमध्ये प्रेम आणि आकर्षण वाढेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी सौदा करू शकता. विरोधकांवर मात कराल. प्रेमसंबंधात यश मिळेल. कामात मेहनत कराल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात आजपासून लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य कमजोर होऊ शकते. सर्दी होऊ शकते, म्हणून स्वत:ची काळजी घ्या. कारण यामुळे कामात आणखी विलंब होईल आणि मानसिक ताण वाढेल. विरोधक प्रबळ होतील. मानसिक शांततेची कमतरता असू शकते. उत्पन्न ठीक होईल, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल.

कन्या
आजचा दिवस अनुकूल आहे. प्रयत्नांना यश येईल. कष्टाचे फळ मिळेल. उत्पन्न वाढेल. सोबत काम करणार्‍यांकडून चांगले सहकार्य मिळेल, यामुळे काम करताना आनंद मिळेल आणि याचे जबरदस्त परिणाम मिळतील. कौटुंबातील मोठ्यांचे प्रेम मिळेल. प्रेमसंबंधासाठी चांगला कालावधी आहे. प्रिय व्यक्ती तुम्हाला आनंदी ठेवेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील.

तुळ
आजचा दिवस धावपळीचा आहे. आज अनावश्यक कामात खुप व्यस्त रहाल, दिवस कसा गेला हेदेखील समजणार नाही, यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल आणि मानसिक ताण वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद मिळेल आणि कौटुंबिक वातावरण समाधान देईल. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. कुटूंबात लहानांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या मित्राशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवन सामान्य राहील. लव्ह लाइफमध्ये आपले वर्तन सुधारणे आवश्यक आहे आणि प्रिय व्यक्तीशी चांगले वागावे लागेल.

वृश्चिक
आजचा दिवस मध्यम आहे. अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास दिवस चांगला बनवू शकता. खर्च जास्त होईल, परंतु घाबरू नका. मिळकतही चांगली होईल. शरीरात सुस्ती किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. कुटुंबातील मोठ्यांचा आदर कराल. कामात चढउतार होतील. बदलीचे सुद्धा योग आहेत, म्हणून थोडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबियांना प्रिय व्यक्तीबाबत सांगण्याची संधी मिळेल.

धनु
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा आणि धार्मिक आचरण करा. कोणत्याही प्रकारची गुंतवणुक करणे हानिकारक ठरू शकते. शॉर्टकटमध्ये अडकू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. कामात चढ-उतार येतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदाराच्या बोलण्याकउे लक्ष द्या. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला एखादे गिफ्ट देऊन त्यांचा मूड ठिक करण्यासाठी दिवस चांगला आहे.

मकर
आजचा दिवस मध्यम आहे. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत जासत मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी असेल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. एखाद्या गोष्टीबद्दल मनात द्विधावस्था असेल, यावर मात करण्यासाठी मन कुणाकडे तरी मोकळे करा.

कुंभ
आजचा दिवस मध्यम आहे. कार्यक्षमता आणि बुद्धिमत्तेद्वारे कामात चांगले परिणाम प्राप्त कराल. उत्पन्न देखील वाढेल, ज्यामुळे आनंद होईल. लव्ह लाईफसाठी दिवस थोडा कमजोर आहे. वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील. आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका.

मीन
आजचा दिवस धावपळीचा आहे. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असू शकतो. कामाच्या वातावरणाशी जुळवून घ्याल, ज्यामुळे कामात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरण नवा आनंद देईल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते.

You might also like