5 जानेवारी राशिफळ : वृषभ, मिथुन व कर्क राशीला मिळेल ‘यश’, इतरांसाठी ‘असा’ आहे मंगळवार

मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरणार आहे, म्हणून सावधगिरी बाळगा. चिंता आणि शारीरिक समस्यांना तोंड देत दिवस घालवाल, परंतु बुद्धिमत्तेच्या, कौशल्याच्या आणि कार्यक्षमतेच्या बळावर कामात आणि नात्यात ताळमेळ ठेवून प्रत्येक स्थिती आपल्या बाजून करणे तुम्हाला जमते आणि याच खुबीने आज तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. प्रेमसंबंधात तणाव असूनही, स्थिती नियंत्रणात राहील. कामासाठी आजचा दिवस भक्कम आहे.

वृषभ
आजचा दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधात आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न कराल. प्रिय व्यक्तीशी खूप चांगल्या प्रकारे बोलाल, जेणेकरून त्यांना प्रेम वाटेल आणि नाते अधिक दृढ होईल. आज वैवाहिक जीवन खूप चांगले राहील आणि नातेसंबंधातील जवळीक आणि प्रणय वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रगती वाढू शकते. वर्कलोड वाढू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जे परदेशात राहतात त्यांना काही चांगले फायदे मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील.

मिथुन
आजचा दिवस यशदायक आहे. स्वतःवर विश्वास असेल आणि काम चांगल्या प्रकारे हाताळाल, जेणेकरून काम सहज पूर्ण कराल. कामात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन सुखकारक असेल. प्रेमसंबंधात बुद्धिमत्ता, कौशल्यांनी दिवस चांगला बनवाल. दाम्पत्य जीवन नेहमीप्रमाणे व्यतीत होईल. नोकरीत थोडे जास्त काम करावे लागेल. चिंतांपासून मुक्त व्हावे लागेल.

कर्क
आजचा दिवस भक्कम आहे. मित्राशी किंवा शेजार्‍यांशी काही खास चर्चा करू शकता, ज्यात आपण त्यांचे मत घेऊन काम कराल. उत्कृष्ट परिणाम मिळतील. नोकरीत यश मिळेल. काम नजरेत येईल. व्यापारी वर्गासाठीही आजचा दिवस चांगला असेल. आरोग्य चांगले राहील. खूप ऊर्जावान वाटेल. वैवाहिक जीवनासाठी चांगला दिवस आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस रोमँटिक असणार आहे.

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मालमत्ता संबंधित एखादा लाभ मिळू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव असेल. जोडीदाराला थोडा राग येईल, ज्यावर लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात थोडी सावधगिरीने वाटचाला करा. नात्यातही कंटाळा राहील. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. कुटुंबात प्रेम वाढेल. एकत्र बसून चित्रपट पाहाल. कामात चांगले परिणाम मिळतील. व्यवसाय वाढेल. खर्च जास्त होईल.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. सामर्थ्याने विजयी व्हाल. आत्मविश्वास वाटेल. भाग्य प्रबळ राहील, ज्यामुळे कमी मेहनतीत यश मिळेल. नोकरीत बुद्धीचे फळ मिळेल. व्यापारी वर्गास नवीन डील मिळू शकते. ज्यात फायदा होईल. खर्च थोडा होईल. परंतु उत्पन्न चांगले होईल. आरोग्य कमजेार असू शकते.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्च अधिक होईल. मानसिक ताण वाढेल. घरातील चिंता त्रासदायक ठरू शकते. कामाचे फळ योग्य मिळणार नाही किंवा पगार कमी मिळेल असे वाटत राहील. यामुळे आपण थोडे चिंताग्रस्त होऊ शकता. व्यापारी वर्गाला चांगला फायदा होईल. सरकारकडूनही एखादा फायदा मिळू शकतो. यावेळी कर बचतीचा सुद्धा एखादा फायदा मिळू शकतो. वैवाहिक जीवन चांगले असेल. प्रेमसंबंधात तणावपूर्ण स्थिती असेल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्न वाढेल. उत्पन्न पुढे कसे वाढवायचे याबद्दल बराच विचार कराल. प्रेमसंबंधात आनंदी होईल, खूप सर्जनशील असाल आणि प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, ज्यामुळे नाते दृढ होईल. वैवाहिक जीवन समाधानी असेल. दिवस चांगला जाईल. कुटुंबात नवीन खरेदीची चर्चा होऊ शकते. आरोग्य बळकट राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. सहकार्‍यांची काळजी घ्या, कारण ते आपल्यासाठी उपयोगी पडतील.

धनु
आजचा दिवस मजबूत आहे. कामाकडे अधिक लक्ष द्याल आणि त्यामध्ये अधिक व्यस्त रहाल. ज्यामुळे इतर क्षेत्रापासून थोडे दूर रहाल. या मेहनतीचे फळ मिळेल. उत्पन्नही वाढेल. काही लोक नवीन नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस सामान्य राहील. कोणाशीही बोलताना थोडे विचारपूर्वक बोला. कारण आज असे काहीतरी बोलू शकता, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात मोजून मापून बोला.

मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. दीर्घ प्रवासाच्या नियोजनात व्यस्त आहात, परंतु लक्षात ठेवा प्रवासासाठी अद्याप योग्य वेळ आलेली नाही. थोडी विश्रांती घ्या आणि योग्य वेळ येईल तेव्हा काम करा, परंतु आपण तयारी सुरू करू शकता. नोकरदार लोकांना खूप चांगले परिणाम मिळतील. मेहनत वाढेल. व्यापारी वर्गासाठीही आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबात समजूतदारपणा वाढेल. एकमेकांप्रती प्रेम वाढेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमसंबंधात आपल्या मनातील गोष्टी प्रिय व्यक्तीला सांगणे सोपे जाईल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक चिंतांपासून मुक्त होण्यासाठी आधी विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण समस्यांपासून मुक्त होऊ शकता. आरोग्य कमजोर राहील, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात राग वाढल्याने स्थिती बिघडू शकते, काळजी घेणे आवश्यक असेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. कामात चांगले परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वास बाळगा आणि आवश्यक असल्यास एखाद्यास मदत करा.

मीन
आजचा दिवस अनुकूल आहे. वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. यामुळे नात्यात प्रणय आणि आपलेपणा वाढेल. प्रेमी युगुलासाठी आजचा दिवस थोडा कमजोर आहे. तरीही प्रिय व्यक्तीला आपले म्हणणे सांगणे सोपे जाईल, ज्यामुळे समजूतदारपणा वाढेल. आरोग्य मजबूत होईल. खर्च वाढेल. उत्पन्नही चांगले होईल. नोकरीत चांगले काम करण्याची संधी मिळेल आणि कौतुक होईल.