6 एप्रिल राशीफळ : गुरुच्या गोचरमुळे ‘या’ 7 राशींना होणार जोरदार लाभ, पैसा येईल, इतरांसाठी असा आहे मंगळवार

0
28
horoscope today 07 March 2021 dainik rashifal daily horoscope aaj che rashifal astrology today in marathi
file photo

मेष
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. सामाजिक कार्यामुळे लोकांमध्ये प्रिय व्हाल, ज्यामुळे मित्रांची संख्या वाढेल. जमीन मालमत्तेच्या क्षेत्रात लाभ होईल. सायंकाळी आईला शारीरीक त्रास होऊ शकतो, ज्यामुळे काही काळ त्रासाचा सामना करावा लागू शकतो, परंतु सर्व सामान्य होईल, अस्वस्थ होऊ नका. वडीलांच्या आशीर्वादाने शासनाकडून सन्मानित होऊ शकता.

वृषभ
नोकरीत काही शत्रु उत्पन्न होऊ शकतात, ते तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील, परंतु अस्वस्थ होऊ नका कारण चतुर बुद्धीने शत्रुला शांत कराल. भागीदारीत व्यापार करण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. संततीच्या विवाहासंबंधी एखादी समस्या असेल तर ती समाप्त होईल, ज्यामध्ये जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध सुखमय राहतील. सायंकाळी आई-वडीलांना एखाद्या धार्मिकस्थळी नेण्याचा विचार कराल.

मिथुन
आजचा दिवस पैशाच्या बाबतीत उत्तम आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ज्यामुळे आनंद होईल. जोडीदारासाठी एखादी भेट खरेदी करू शकता. दैनिक गरजांसाठी काही खर्च कराल. नोकरीत समोरच्याला तुमची एखादी गोष्ट वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. वागण्यासह खाण्या-पिण्याकडे सुद्धा लक्ष द्या.

कर्क
आजचा दिवस संमिश्र आहे. स्वभावाच्या बाबतीत गंभीर राहा. कठोर मेहनतीनेच यश मिळेल. काही शत्रु प्रबळ होतील, परंतु ते यशस्वी होणार नाहीत. रात्रीच्या वेळी एखाद्या आध्यात्मिक महापुरुषाशी चर्चा होऊ शकते. तुम्ही एक आनंदी व्यक्ती असल्याने अनेक लोक तुमच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतील.

सिंह
आज दिवस संमिश्र परिणामांचा आहे. परोपकार आणि दानधर्माची भावना वाढेल, विश्वासाच्या बळावर केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. परंतु आळस सोडावा लागेल. शत्रु तुमचे धाडस पाहून शांत होईल. व्यापारासाठी बनवलेल्या योजनांवर आज काम सुरू होऊ शकते.

कन्या
आजचा दिवस भाग्याच्या दृष्टीने चांगला आहे. मागील काही दिवसापासून शारीरीक समस्या सुरू असेल तर ती आज संपेल. संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आज एखाद्या त्रस्त मित्राला मदत कराल, ज्यामुळे मनाला सुखद अनुभव मिळेल. संततीच्या भविष्यासंबंधी एखादी शुभवार्ता समजेल, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होईल. सायंकाळचा वेळ घरातील ज्येष्ठांसोबत सल्ला मसलतीमध्ये घालवाल.

तुळ
आजचा दिवस व्यवसायाच्या कामासाठी उत्तम आहे. व्यस्तता आणि धावपळीसह बिझनेसच्या काही रणनिती यशस्वी करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत एखाद्या गोष्टीचा आरोप लागू शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका. काही असे होईल की तुमचे म्हणणे सत्य ठरवण्यात यशस्वी व्हाल. सायंकाळी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा कारण दुखापत होऊ शकते.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी स्थिती राहिल, यासाठी विचारपूर्वक पुढे जावे लागेल. जर असे केले नाही तर, भविष्यात त्रास होऊ शकतो. संततीने केलेल्या चांगल्या कार्यामुळे मानसन्मानात वाढ होईल. सायंकाळचा वेळ मित्रांसोबत मजामस्तीत घालवाल. धैर्याने शत्रुपक्षावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना सिनियर्सच्या सल्ल्याची आवश्यकता असेल.

धनु
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबात सुरू असलेला वाद संपवावाच लागेल, अन्यथा मानसिक तणाव कायम राहिल. एखाद्या बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका कारण दिवस उत्तम नाही, कर्ज फेडणे अवघड होईल. राजकीय क्षेत्रात विस्तार वाढेल. मामाच्या बाजूने काही वाद होऊ शकतो, परंतु वाणीवर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दरी पडू शकते.

मकर
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. पूर्वजांचा काही पैसा मिळण्याची भरपूर शक्यता आहे. सहकारी किंवा जोडीदाराला न मागता सल्ला देऊ नका कारण उलटा परिणाम होईल, यासाठी सावध राहा. रात्री धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न राहिल. व्यापारात काही नवीन रणनिती बनवाल, जी पुढे जाऊन लाभ देईल. विवाहासाठी इच्छूक जातकांसाठी चांगले प्रस्ताव येतील.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. सासरच्या बाजूकडून धनलाभाची भरपूर आशा आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी काही काम केले, तर यश मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेच्या तयारी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने बिझनेसमध्ये चांगला लाभ मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य कमजोर होऊ शकते, यासाठी धावपळ करावी लागेल.

मीन
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. आजीच्या बाजूकडून मानसन्मान मिळेल. नोकरीत शत्रुंपासून सावध राहा, कारण ते त्रास देण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. सासरच्या बाजूकडून तसेच जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यापारात एखादी नवी डिल फायनल होऊ शकते, जिची मोठ्या कालावधीपासून प्रतिक्षा होती. सायंकाळी कोणत्याही वाद-विवादात पडू नका.