9 मार्च राशिफळ : आज मकर राशीत चंद्र, या 5 राशींना होतील मोठे लाभ, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास लाभेल. नोकरी आणि व्यवसायात आलेली कटुता गोडव्यात बदलण्याची कला शिकावी लागेल, ज्यामुळे कामे होतील. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. अनेक दिवस रखडलेले काम सायंकाळी पूर्ण होईल. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत चर्चेत घालवाल. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणखी वाढविणे आवश्यक आहे.

वृषभ
आज समाधान आणि शांततेने लोकांकडून कामे करून घ्यावी लागतील. राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. नोकरीत पद व प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदार तुमच्या अपेक्षांवर यशस्वी ठरेल, ज्यामुळे तुमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होईल. रात्री काही अप्रिय लोक भेटल्यामुळे अनावश्यक त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या. भावंडांशी संबंध चांगले राहतील.

मिथुन
आज काळजी घ्यावी लागेल कारण एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची भीती आहे, म्हणून काळजी घ्या. कौटुंबिक व्यवसायात मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी प्रभावी ठरेल, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा होईल. संततीने एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यात एक अनपेक्षित यश मिळेल ज्यामुळे आनंदित व्हाल. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळेल.

कर्क
आज व्यवसायासाठी प्रवास करायचा असेल तर तो करा, कारण यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. संततीची जबाबदारी पार पाडाल. जोडीदाराशी प्रेमाच्या गप्पागोष्टी होतील. आज सायंकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीचे दर्शन होईल. उपजिविकेच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. आईशी वाद होऊ शकतो, म्हणून बोलण्यावर संयम ठेवा.

सिंह
नोकरी आणि व्यवसायात बोलण्यातील सौम्यतेमुळे विशेष सन्मान मिळेल, ज्यामुळे शत्रूंना त्रास होईल परंतु त्यांची काळजी करण्याची गरज नाही कारण ते तुमचे सामर्थ्य पाहूनच नष्ट होतील. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि कर्तव्य क्षेत्रात केलेल्या कामात विशेष यश मिळेल. आज थोडी जास्त धावपळ करावी लागेल, पण लक्षात ठेवा डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. संध्याकाळी शेजार्‍यांशी वादविवाद होऊ शकतात.

कन्या
आज एखाद्या सामाजिक किंवा मंगलकार्यासाठी पैसे खर्च करू शकता. ज्यामुळे कीर्ती वाढेल. रोजगार आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सतत प्रयत्न केल्यान यश मिळेल. संततीला धार्मिक कामे करताना पाहून आनंद होईल. दुपारी कायदेशीर वाद किंवा खटल्यातील विजय आनंदाचे कारण बनू शकतो. कार्यक्षेत्रात एखाद्या स्त्रीला मदत करू शकता.

तुळ
आज तुमच्या कुटुंबात एखादे मंगलकार्य होऊ शकते. यामुळे सभोवतालचे वातावरण आनंदी राहिल. घरातील सर्व सदस्यांचा आनंद वाढलेला दिसेल. चांगल्या प्रमाणात पैसे मिळतील. हे पैसे आल्याने अनेक दिवसांपासून असलेली व्यवहारांची समस्या सुद्धा संपेल. प्रेमसंबंध प्रबळ होतील. आईच्या भविष्याची चिंता सतावू शकते. संध्याकाळी जवळ किंवा लांबच्या प्रवासाची शक्यता वाढेल आणि नंतर रद्द होईल.

वृश्चिक
आजचा दिवस आरोग्यासाठी खराब संकेत दर्शवत आहे. आज काही अंतर्गत आजार त्रास देऊ शकतात. आरोग्यासाठी तपासणी आणि चांगल्या डॉक्टरांचा सल्ला यासाठी खर्च कराल. शारीरिक मेहनतीमुळे सुद्धा तुमचे चालणे-फिरणे जास्त होईल. आरामाकडे लक्ष द्यावे लागेल. भावाचा सल्ला कौटुंबिक व्यवसायासाठी प्रभावी ठरेल.

धनु
पैशाच्या बाबतीत आजचा दिवस चांगला आहे. सासरच्या लोकांकडूनही पुरेशा प्रमाणात पैसा येऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायात कोठूनतरी रखडलेले पैसे मिळू शकतात. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. विरोधकही प्रशंसा करताना दिसतील. संध्याकाळपासून रात्री पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा.

मकर
आज आई आणि वडिलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश दिसेल. आज संध्याकाळी कोणत्याही वादात अडकू नका, अन्यथा हा वाद कायदेशीर होऊ शकतो. उपजिविकेच्या क्षेत्रात सुरू असलेले प्रयत्न फलदायी ठरतील. कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांकडून खूप सहकार्य मिळेल, यामुळे बिघडलेली कामेही होऊ लागतील. विद्यार्थ्यांना गुरुंचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ
आजचा दिवस थोडा धावपळीचा आहे. अचानक एखादी बातमी ऐकून प्रवासाला जावे लागेल, म्हणून सावध रहा आणि कोणाशीही भांडण करू नका. आज आरोग्याच्या काही अडचणी होऊ शकतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करु नका, काळजी घ्या. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. कुटूंबातील सदस्याशी थोडा वाद होऊ शकतो. व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. एखादी मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

मीन
वैवाहिक जीवनात काही अडथळा सुरू असेल तर तो संपेल. आज सासरच्यांशी कोणताही व्यवहार करू नका, अन्यथा संबंध बिघडू शकतात. धार्मिक क्षेत्रात प्रवास करण्यावर आणि पवित्र कामांवर खर्च होऊ शकतो. प्रवासात सावध रहा. काही मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचा धोका आहे. आजचा दिवस संततीच्या कामाच्या चिंतेत व्यतीत होईल.