15 फेब्रुवारी राशिफळ : सोमवारी साध्य योगात 6 राशिना लाभ, पैसा, नोकरी आणि व्यापारातील कामे होतील पूर्ण

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. आज संतती व पत्नीकडूनसुद्धा चांगले सूख मिळेल, यामुळे आनंदी व्हाल. धाडस वाढेल आणि मनात संतोष राहील. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करण्याची आवश्यकता आहे, तरच स्पर्धेत यश मिळू शकते. आनंदात दिवस घालवाल. जवळच्या मित्राच्या मदतीने आणि सल्ल्याने बिघडत असलेली कामे योग्य वेळी पूर्ण करू शकता, म्हणून वेळेचा फायदा घेऊन पुढे जा.

वृषभ
आज कार्यक्षेत्रात अधिक पैसा मिळू शकेल. लाभही पूर्णणे मिळेल. आर्थिकस्थिती मजबूत राहील. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य त्रास देऊ शकते. दिवस मौजमजेचा आहे. सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्त करणारा आजचा दिवस ठरणार आहे. बिघडलेल्या कामांमध्ये विशेष योगदान मिळेल, भाग्याची भरपूर साथ मिळेल. एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने वाटचाल केल्यास धनप्राप्ती होईल.

मिथुन
आज कामात इतरांवर अवलंबून राहू नये. असे केल्यास कामे रखडतील. संततीकडून आज एखादी चांगली बातमी देखील ऐकायला मिळेल. कुटुंबातील लहान सदस्यांसमवेत थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. दिवस उत्तम लाभदायक आहे. आज कुठूनतरी अचानक मोठ्या प्रमाणात पैसा मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती वाढ होईल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत रहा, यामुळे कायमस्वरूपी यश मिळेल.

कर्क
भाग्य सुद्धा आज जास्त व्यस्ततेचे संकेत देत आहे. व्यवसायाकडे लक्ष देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. आई-वडीलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. भावाच्या सल्ल्याने केलेले काम लाभदायक ठरेल. आजचा धावपळीचा आहे. आज विस्कटलेला व्यवसाय दुपारपर्यंत निटनेटका करणे चांगले ठरेल, कामाचा व्यवस्थित हिशेब ठेवा. अन्यथा, भविष्यात नुकसान सहन करावे लागू शकते.

सिंह
आज भाग्याची चांगली साथ मिळेल. यश आणि कीर्तीमध्ये वाढ होईल. शत्रुंची चिंता आज संपेल. विरोधक असूनही विजय मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत छोट्या प्रवासाचा आनंद घेऊ शकता. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. मनात सूखद भावना असेल. दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळतील आणि व्यवसायातही नफा मिळेल.

कन्या
आज धार्मिक कार्यात रस घ्याल. मनामध्ये एक आनंददायक भावना निर्माण होईल. रात्रीचा काही वेळ कुटुंबासमवेत घालवला तर चांगले होईल. मनातील उदासपणा दूर होईल. एक मजबूत अस्तित्व जाणवेल. आज इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आहे. घरगुती स्तरावर सुद्धा मंगल कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. कुटुंबातील सर्व सदस्य मनापासून मेहनत करताना दिसतील.

तुळ
आज कामात व्यस्त राहाल. जास्त धावपळ करावी लागेल, म्हणून आरोग्याची काळजी घ्या. आज कौटुंबिक जीवनात थोडी तणावाची स्थिती राहील. परंतु आई-वडीलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज संततीची एखादी चिंता असू शकते. मित्रांचा पाठिंबा देखील मिळेल. व्यावहारिक आणि संसारिक दृष्टीकोन देखील आज बदलल्यासारखा वाटेल. आज सावधगिरीने तिच कामे करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल.

वृश्चिक
आज मानसन्मान वाढेल. आदर आणि मानसन्मान मिळाल्याने आनंद होईल. गुंतवणूक करायची असेल तर त्यामध्ये नफा देखील मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह काही आनंदाचे क्षण घालवाल. उत्तम धन मिळण्याची आशा आहे, ज्यामुळे मन आनंदी होईल. भाग्याची चांगली साथ लाभेल. कार्यक्षेत्रात नवीन सहकार्‍यांची साथ मिळेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती बळकट होईल.

धनु
आज सावधगिरी बाळगली पाहिजे. मात्र, यामुळे आनंद मिळेल. मुलांकडून सुद्धा सूख मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन उपकरणांचा वापर करा, यातून फायदा होईल. संध्याकाळी मित्रांसह छोट्या प्रवासाची योजना आखू शकता. आजचा दिवस धावपळीत व्यतीत होईल. विशेष चिंता राहील. पैसेही जास्त खर्च होतील. पाहुणे देखील आज घरात राहू शकतात, घरात जास्त पैसे खर्च करावे लागतील.

मकर
आज भाग्याची भरपूर साथ लाभेल. एखादे काम थांबले असेल तर ते आजच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण काळ तुमच्या बाजूने आहे आणि काम पूर्ण होण्याची आशा आहे. चांगली संपत्ती मिळण्याची चिन्हे आहेत. आज कदाचित काही पैसे खर्च करावे लागतील. परंतु यामुळे मानसन्मान मिळेल. संततीकडून आज आनंद वाढवणारी बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

कुंभ
आज गोड बोलण्याने लोकांची मने जिंकाल, पण ही गोष्ट कायम स्वीकारावी लागेल, तरच लोकांच्या मनावर राज्य करू शकाल. आज संध्याकाळी एखाद्या मंगल कार्याक्रमाला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी बदल करण्याचा विचार कराल, ज्यामुळे आगामी काळात कारकीर्दीत मोठा लाभ होईल. व्यवसायातही जवळच्या सहकार्‍यांशी व्यवहार केल्याने लाभ होऊ शकतो.

मीन
आजचा दिवस परोपकारात घालवाल. परंतु भाग्याची भरपूर साथ लाभेल. आज भरपूर सन्मान मिळेल, आणि हेच लोक पुढे तुमच्या उपयोगी येतील. पत्नीबरोबर आज काही वाद होऊ शकतो, म्हणून तिला समजावण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस नोकरीसाठी फारसा चांगला नाही. म्हणून शांतपणे काम करा, ज्यामुळे चांगले परिणाम मिळतील. कोणत्याही वादविवाद आणि भांडणात पडू नका. कामास प्राधान्य द्या.