15 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ 4 राशीच्या लोकांना मिळेल भाग्याची ‘साथ’, शनि देवाची राहिल ‘कृपा’दृष्टी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. तुम्ही जे कराल, ते पूर्ण मन लावून कराल, पण तरीही काही तरी राहून गेले असे वाटेल. तुम्ही खुप कष्टाळू बनाल आणि कामाला अधिक महत्व द्याल. धार्मिक कामात मन लागेल. वैवाहिक जीवनात आनंद राहिल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला समजून घ्याल. कुटुंबापासून दूर राहू शकता. संततीसाठी चांगली वेळ आहे. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील.

वृषभ
आजचा तुमचा दिवस कष्ट करण्याचा असेल. प्रयत्न केल्यानंतर यश मिळेल. कामात चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबातील वातावरण ठिक राहिल. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. प्रेमसंबंधात सुख मिळेल. चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आरोग्य बिघडेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. दूरच्या प्रवासाला जाऊ शकता.

मिथुन
आजचा दिवस अभ्यासाठी चांगला आहे. शिक्षणात मेहनत केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात संततीच्या बाबत विचार कराल. प्रेमसंबंधात आज चांगले परिणाम दिसून येतील. प्रिय व्यक्तीशी प्रेमसंबध सुधारतील. वैवाहिक जीवनातही आज चांगले वातावरण असेल, जोडीदाराला काहीतरी भेट द्या. आरोग्य ठिक राहिल. मन आनंदीत राहिल. कामात बुद्धी लावल्याने कौतूक होईल.

कर्क
आज तुमचे पूर्णपणे कुटुंबाकडे लक्ष असेल. आईला काहीतरी भेट द्याल. आज त्यांना सुखाची अनुभूती होईल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. व्यापारात यश मिळेल, पण थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमचा विरोधक तुमच्या विरोधात कुरापती करू शकतो. कामात, नोकरीत चांगले परिणाम मिळतील. भाग्य साथ देईल. यामुळे काही कामे होतील. प्रेमसंबंधात दिवस चांगला आहे.

सिंह
आज तुम्हाला खुप कष्ट करावे लागतील. तुम्ही मनापासून आनंदी व्हाल. आंतरिक शक्ती वाढल्याने कामात यश मिळेल. प्रेमसंबंधात दिवस साधारण आहे. वैवाहिक जीवनात चांगली वेळ आहे. कुटुंबाकडून धनलाभ होऊ शकतो. शिक्षणात चांगले परिणाम दिसून येतील. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. खर्च वाढतील.

कन्या
आज तुम्हाला पैशांचा लाभ होईल. मेहनतीचे फळ मिळेल. बॉस भेट देऊ शकतो. कुटुंबात आनंद राहिल. नोकरीत जास्त मेहनत करावी लागेल. दुसर्‍या नोकरीची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेम मिळेल. प्रेमसंबंधात प्रपोज केल्यास आज यश मिळू शकते.

तुळ
आज तुम्ही खुप आनंदी रहाल. यामुळे कामामध्ये यश मिळेल. कुटुंबातही आनंद राहिल. कामातही चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी चांगली चर्चा होईल. प्रेमसंंबंधात आज थोडी निराशा पदरी पडू शकते. प्रिय व्यक्तीशी एखाद्या गोष्टीवरून नाराजी होऊ शकते. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

वृश्चिक
आज तुमचे खर्च खुप वाढतील. मात्र, सायंकाळनंतर खर्च कमी होईल. मन मजबूत होईल. तणावातून मुक्ती मिळेल. प्रवास टाळणे योग्य राहिल. कुटुंबात भांडणे होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील छोट्यांकडून फायदा मिळेल. तुम्ही बिझनेसमध्ये एखादी नवी रणनिती बनवू शकता. याचा मोठा लाभ होईल. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात प्रेम मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे आजारी पडणे त्रासदायक ठरू शकते.

धनु
आज तुम्हाला खुप फायदा होईल. कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. यामुळे मनोबल वाढेल. तुम्ही स्वतावर विश्वास कराल आणि लोक तुमच्याकडून सल्ला घेतील. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. वैवाहिक जीवनात स्थिती खुप चांगली राहिल. सायंकाळनंतर खर्च अचानक वाढतील. प्रेमसंबंधात आजचा दिवस चांगला आहे. कामामध्ये सहकार्‍यांसोबत चांगले संबंध ठेवा आणि कामही भरपूर करा.

मकर
आजच्या दिवसातील महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्ष कामाकडे द्यावे लागेल, अन्यथा वाईट परिणाम दिसून येतील. यामुळे चिंता वाढू शकते. परंतु, कुटुंबातील वातावरण चांगले राहिल. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. खर्च वाढतील. तुम्ही बाहेर जाऊ शकता. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. मात्र, छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाईट बोलणे टाळले पाहिजे. प्रेमसंबंधात दिवस चांगला रााहिल.

कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या भाग्यात वाढ होईल आणि यामुळे चांगला लाभ मिळेल. कुटुंबातील मोठ्यांकडून चांगला सल्ला आणि आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे थांबलेली कामे पार पडतील. कामात चांगले परिणाम दिसून येतील. आज तुम्ही दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने लक्ष द्या. आरोग्य कमजोर राहिल. प्रेमसंबधात दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात रागाचा अनुभव येऊ शकतो.

मीन
आज एखादी नवीन वस्तू खरेदी कराल, जी तुमचे सौंदर्य वाढवेल. स्वतावर जास्त लक्ष द्याल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. एकमेकांना समजून घ्याल. उत्पन्न वाढेल. मन एखाद्या गोष्टीत गोंधळल्यासारखे होईल. ज्यामुळे कामावर परिणाम होईल. कुटुंबाचे वातावरण चांगले राहिल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.

You might also like