17 फेब्रुवारी राशिफळ : या 3 राशीवाल्यांनी रहावे सावध, होऊ शकते नुकसान, इतरांसाठी असा आहे बुधवारी

मेष
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. नोकरीत उच्च पद मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, एखादे काम वेळेत पूर्ण न झाल्याने स्वभावात थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो, म्हणून सावधगिरी बाळगा. आज मामाकडून धनप्राप्तीचे योग आहेत. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकता. संततीच्या भविष्याची चिंता आज थोडी कमी होईल. कौटुंबिक जीवनात शांतता राहील. आज काहीतरी नवीन करायचे असेल तर त्यात भाग्याची साथ मिळेल.

वृषभ
आज कुटुंबात सूख आणि शांतीचे वातावरण असेल. कुटुंबात एखादे मंगल कार्य होऊ शकते. आज एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर भाग्याची साथ मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज संध्याकाळी एखाद्या खास कार्यक्रमास मित्रांसह उपस्थित राहाल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. संततीने केलेल्या कामामुळे आनंदित व्हाल. आज राहणीमानाच्या स्तरातही सुधारणा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सुंदर कपडे घेण्याकडे कल असेल. नोकरी आणि व्यवसायातही भागीदाराकडून आणि सहकार्‍यांकडून खुप सहकार्य मिळेल. परंतु आळस सोडून आज सक्रियपणे पुढे जावे लागेल, तरच दिवसातील कामे शुभ ठरतील. नोकरीत उच्च पद मिळू शकते.

कर्क
आजचा दिवस प्रवासाचा आहे. व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल, ज्यामध्ये लाभ होईल. संतती सूखात वाढ होईल. एखाद्या नातेवाईकाकडून वस्त्र इत्यादी भेट मिळू शकते. आज उत्तम मित्रांच्या मदतीने मनातील निराशेची भावना दूर होईल. संध्याकाळी मन वाचनात व्यस्त असेल. रात्री चांगली झोप घ्याल.

सिंह
आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल कारण पोट खराब होऊ शकते. पचनक्रिया मन, वायूमुळे त्रास होऊ शकतो, म्हणून खाण्यापिण्यावर ताबा ठेवा. कुटुंबात आज एखाद्या मंगल कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आणि लहान मुले आनंदी दिसतील. आज मित्रांच्या मदतीने व्यवसायाचे नवीन स्त्रोत तयार होतील. उत्पन्न वाढीमुळे आणि मोठ्या प्रमाणात हातात पैसे मिळाल्याने मनोबल प्रचंड वाढेल.

कन्या
आज भाग्याची भरपूर साथ मिळेल. कार्यक्षेत्रात खुप मेहनत करावी लागेल, पण सर्व होताना दिसतील. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल. जे लोक वाचन-लेखन व्यवसायाशी निगडित आहेत, त्यांचे उत्पन्न आज वाढेल, परंतु राग टाळावा लागेल. संततीकडून आज आनंदाची बातमी येईल. उच्च शिक्षणाशी संबंधित निकाल मिळेल. चांगल्या मालमत्तेतूनही एखादे उत्पन्न मिळू शकते.

तुळ
आजचा दिवस थोडा कठीण असू शकतो, शिवाय काही कामे इच्छेविरूद्ध होऊ शकतात, ज्यामुळे मन अस्वस्थ राहील. परंतु जर कुटुंबात सर्व काही ठीक असेल तर मनोबल वाढेल, ज्यामध्ये भाग्य साथ देईल. आज अनावश्यक खर्च नियंत्रित करावा लागेल. नोकरीत अधिकार्‍यांकडून भरपूर सहकार्य मिळले. विद्यार्थ्यांमध्ये संध्याकाळी वाचन आणि लिखाणातील आवड वाढेल. रात्रीचा वेळ आयोजनात व्यतीत होईल.

वृश्चिक
आज प्रियजनांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे एखादे मोठे काम होण्याची सुद्धा मोठी आशा आहे, ज्यामुळे मन आनंदित होईल. आईचा आशीर्वाद आज आपल्यासाठी विशेष फलदायी ठरेल. आज रखडलेले पैसे एखाद्या महान व्यक्तीच्या मदतीने मिळतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज संततीकडून आणि बौद्धिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. स्थिती आणि प्रतिष्ठाही वाढेल.

धनु
आजचा दिवस खुप व्यस्तते जाईल. कार्यक्षेत्रात आज बरीच धावपळ करावी लागेल, परंतु यांचे परिणाम अत्यंत फलदायी असतील. कार्यक्षेत्रात अडचण व मेहनतीने काम करावे लागेल तेव्हाच यश मिळेल. बोलण्यावर संयम ठेवा. एखाद्या मालमत्तेवरून आज वादाची स्थिती उद्भवू शकते, अशा गुंतागुंतीपासून स्वतःला दूर ठेवा. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत जवळच्या प्रवासाचे योग आहेत, परंतु आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मकर
आज तुमचा भाग्योदय होईल. संपत्ती आणि कीर्ति वाढेल. यासह, आज शत्रूंचा नाश होईल. शेवटी, विजय तुमचााच असेल. प्रत्येक कामात मनोइच्छा पूर्ण होईल. अनेक दिवसांपासून काही काम करण्याचे ठरवत असाल तर आज सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे, ज्यामध्ये कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल.

कुंभ
आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा सर्व कामे बिघडू शकतात. जर लक्ष दिले तर कामे कोणत्याही अडथळ्या शिवाय पार पडत राहतील. आज जोडीदाराबरोबर काही वैचारिक मतभेद उद्भवू शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. आजचा दिवस थोडी धावपळीचा असू शकतो.

मीन
आज मालमत्तेची सुधारणा आणि देखभालीसाठी खर्च करू शकता, ज्यामध्ये भाग्याची भरपूर साथ मिळेल. मित्र आणि नातेवाईकांचे आज घरी आगमण होऊ शकते. संपत्तीतही उपत्नाचे नवीन स्त्रोत विकसित होतील. राजकारणात वाढत्या संपर्काचा लाभ मिळेल. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी खुप लाभदायक आहे, ज्यामुळे फायदा होईल. यासाठी गुंतवणूक आवश्य करा. धार्मिक कामांमध्ये सुद्धा श्रद्धा वाढेल. प्रेमसंबंधात आज भरपूर प्रेम राहिल.