18 एप्रिल राशीफळ : ‘या’ 5 राशीच्या लोकांना मिळेल ग्रहांची साथ, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीशी संबंधीत जातकांना ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार दिले जातील आणि प्रमोशन सुद्धा मिळू शकते. संततीसंबंधी चिंता समाप्त होईल, परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. आईशी काही वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबात अशांततेचे वातावरण राहू शकते. मामाच्या बाजूने धनलाभ होऊ शकतो. सायंकाळ कुटुंबातील लहान मुलांसोबत मजामस्तीत घालवाल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. प्रेमसंबंधात काहीसा तणाव असू शकतो, ज्यामुळे मन कामात लागणार नाही, परंतु अस्वस्थ होऊ नका. सायंकाळपर्यंत तणाव संपेल. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालू नका. व्यापारात एखादी नवीन डील फायनल करणार असाल तर ती हानिकारक ठरू शकते, यासाठी सावध राहा.

मिथुन
दुकान किंवा घर खरेदी करण्याचा विचार केला असेल तर त्यामध्ये यश मिळू शकते. भविष्यात यातून भरपूर लाभ मिळेल. मोठ्या कालावधीपासून अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे पैसा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणत्याही अनैतिक कामापासून दूर राहा, अन्यथा नुकसान होऊ शकते. नोकरीत काही शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील, यासाठी कामात घाई करू नका, धैर्य ठेवा.

कर्क
व्यापारात एखाद्या ज्येष्ठाच्या सल्ल्याने मोठा लाभ मिळू शकतो. परदेशाशी व्यापार करत असाल तर शुभवार्ता समजेल. राजकीय लोकांशी संबंध वाढतील आणि सामाजिक क्षेत्रात नाव मोठे होईल. यासाठी प्रयत्न करत राहा. कोणताही गैरसमज पसरू देऊ नका. सायंकाळ मित्रांसह आनंदात घालवाल. पार्ट टाइम बिझनेस सुरू केला असेल तर त्यामध्ये लाभ होईल. घरात काही आवश्यक वस्तु खरेदी करून आणाल.

सिंह
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे आर्थिक ओझे कमी होईल, आनंदी व्हाल. कापड व्यापार्‍यांना लाभ होईल. प्रेमसंबंध आनंददायी राहतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. कार्यक्षेत्रात एखाद्या शत्रुचा तुमच्या प्रगतीमुळे जळ्रफळाट होऊ शकतो, यासाठी सर्वांशी चांगले वागा, अन्यथा ते नुकसान करू शकतात.

कन्या
आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबात चांगले वातावरण राहील. नात्यात मजबूती येईल. कुटुंबात एखादा वाद सुरू असेल तर तो संपेल. सरकारी नोकरीत महिला सहकारी आणि अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. आजूबाजूचे वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात नवीन परिवर्तन होऊ शकते, ज्यामुळे आश्चर्य वाटेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.

तुळ
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. कार्यक्षेत्रात जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. व्यवहारिक विचाराने प्रतिष्ठा वाढेल. मोठ्या कालावधीपासून घरातील एखादे काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. रोजगाराच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील. नेतृत्व क्षमतेचा सुद्धा विकास होईल. वागण्यात केलेले बदल उपयोगी ठरतील. संततीला भविष्यात पुढे जाताना पाहुन मन आनंदी होईल.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र आहे. रोजगाराच्या क्षेत्रात अस्थिरता असल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. भाऊ तसेच मित्रांच्या मदतीसाठी नवीन संधी मिळेल, ज्यामुळे भविष्य मजबूत होईल. नातेवाईकांशी संबंधात गोडवा येईल. सायंकाळी धार्मिक कार्यात मन लागेल. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागेल. विवाहासाठी इच्छुक जातकांना चांगले प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात घरातील सर्व जबाबदार्‍या पूर्ण कराल.

धनु
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. व्यापारात नवीन गोष्टींचा समावेश करण्याची स्थिती तुमच्या बाजूने आहे. जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. लव्ह लाईफमध्ये एखादी भेट मिळू शकते, ज्यामुळे नवीन उर्जेचा संचार होईल. प्रेमसंबंध आनंदी असतील. घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी कराल, परंतु खिशाचा विचार करा. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेक्टमध्ये तुमच्या सुचनांचे स्वागत होईल. त्यामध्ये नेतृत्व करण्यास सांगितले जाऊ शकते. बहिण-भावासाठी विवाहाचा प्रस्ताव पक्का होऊ शकतो.

मकर
आजचा दिवस आळस दूर सारून पुढे जावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रलंबित असलेली कामे पूर्ण करावी लागतील. अधिकारी सुद्धा यामध्ये मदत करतील. जर एखाद्या कायदेशीर प्रकरणातून जात असाल तर स्थिती आज तुमच्या बाजूने असेल आणि आपल्या बोलण्याने सर्वांना समाधानी करण्यात यशस्वी व्हाल. नातेवाईक किंवा मित्राला उधार देणे टाळा, पैसे परत येण्याची शक्यता कमी आहे. घरातील सदस्य एखाद्या विवाह सोहळ्यात सहभागी होऊ शकतात. जोडीदाराशी प्रेम कायम ठेवा.

कुंभ
आजचा दिवस प्रेमसंबंधासाठी यशदायक आहे. नात्यात सन्मान वाढेल. जोडीदाराने त्याच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली नसेल तर आज भेट होऊ शकते. शेजार्‍यांसोबत चांगला वेळ जाईल. एखाद्या कामात त्यांची मदत सुद्धा मिळेल. धार्मिक कामात सहकार्य मिळाल्याने प्रसिद्धी वाढेल. परदेशात कुणी भाऊ किंवा बहिण राहात असेल तर त्यांच्याशी आज भेट होऊ शकते. सायंकाळचा वेळ आपल्या भावा-बहिणीसोबत घालवाल.

मीन
आजचा दिवस व्यावसायिक स्पर्धेसाठी हानिकारक ठरू शकतो. हरवलेली वस्तू किंवा पैसे मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नवीन व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी दिवस उत्तम आहे. परंतु कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवावे लागेल, अन्यथा भविष्यात अडचणी येऊ शकतात. आई-वडीलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतल्याने लाभ होऊ शकतो. वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्या, डॉक्टरांचा सल्ला घेत राहा.