18 ऑक्टोबर राशीफळ : मेष, मिथुन आणि सिंहराशीसह ‘या’ 3 राशींसाठी रविवार ‘शुभ’

मेष
आजचा दिवस व्यवसायात जबरदस्त यश देऊन जाईल. तुम्हाला समजणार नाही की, कसा इतका चांगला दिवस बघायला मिळाला. नोकरी करणारे सुद्धा आज मेहनतीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतील. काही खर्च होईल, पण तो आनंद देईल. धार्मिक विचारही मनात भरपूर येतील. देवळात जाण्याची इच्छा होईल. आरोग्य थोडे कमजोर असू शकते किंवा ताप येऊ शकतो. वैयक्तिक आयुष्यात आनंद कायम राहील.

वृषभ
आजचा दिवस विरोधकांच्या नावावर असेल. ते थोडा त्रास देतील. आज त्यांच्याबद्दल खूप विचार कराल. घराच्या गरजांवर बराच खर्च होईल, ज्यामुळे पैशाची कमतरता भासू शकते. वैयक्तिक जीवनात वेळ देणे आवश्यक आहे. बर्‍याच काळापासून घरात आवश्यक असलेला वेळ दिलेला नाही. आज कुटुंबासमवेत बसा, जोडीदाराबरोबर बसा आणि त्यांच्याशी संवाद साधा. कामाची स्थिती खूप चांगली आहे.

मिथुन
प्रेमसंबंधात नात्यात गांभीर्य दर्शवाल आणि प्रिय व्यक्ती आणि तुमच्यात जे काही सुरू आहे ते सुधारण्याचा प्रयत्न कराल. विवाहित लोकांचे जीवन देखील परस्पर समन्वयाच्या आधारे पुढे जाईल आणि जोडीदाराला कार्यालयात काही लाभ मिळाल्याने आनंद होईल. कामाचा खूप आनंद घ्याल आणि पदोन्नती होऊ शकते. पोटदुखी होऊ शकते.

कर्क
कौटुंबिक जीवनावर पूर्ण लक्ष असेल, तर कामातील काही चढ-उतारांकडे दुर्लक्ष कराल. आईला एखाद्या समस्येचा त्रास होऊ शकतो, म्हणून चांगल्या डॉक्टरकडे पाठवा. अपेक्षा वाढतील आणि नवीन व्यवसाय हात टाकण्यास पूर्णपणे तयार असाल. नोकरी करणारे कामात चांगली कामगिरी करतील. वैयक्तिक जीवनासंबंधी स्थिती सामान्य असेल, परंतु जबाबदार्‍यांपासून दूर जाण्याची गरज नाही.

सिंह
आज प्रवासाचा वेळ व्यतीत होईल. काही जुन्या मित्रांनाही सोबत घ्याल. प्रवासात काही नवीन लोक भेटतील. सोशल मीडिया अपडेट करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मनाला आनंद होईल. आज अत्यंत सहज आयुष्य जगू शकाल. कोणतीही समस्या जाणवणार नाही. वैयक्तिक जीवन देखील आनंदी करेल. विवाहित जीवनात आणि प्रेमसंबंधात जोडीदारावर पूर्ण प्रेम दिसेल. आरोग्य चांगले राहील.

कन्या
आज बोलण्याची पद्धत लोकांच्या समजण्यापलिकडील असू शकते. यासाठी विचारपूर्वक बोला आणि गोंधळू नका. दोन्ही हातांनी खर्च होईल, ज्यामुळे खिस सैल होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या. घरातील वातावरण शांत असेल आणि कुटुंबातील वडीलधार्‍यांचे आशीर्वादाने उपयोगी पडतील. घरगुती जीवनात काही आव्हानांचा सामना करण्यास तयार राहा. प्रेमसंबंधात परस्पर भांडणाचे बळी बनू शकतात.

तुळ
एखाद्या गोष्टीवरून मनात संभ्रम निर्माण होईल. हे काम करावे की, करू नये असा प्रश्न त्रास देईल. जोडीदाराला काही सांगायचे असेल तर जास्त विचार न करता सांगून टाका. लव्ह लाइफमध्ये नात्यात रोमान्स असेल. प्रिय व्यक्तीसोबत फिरण्याची योजना आखू शकता. बहुतेक वेळ कामात घालवाल.पण आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. गाडी काळजीपूर्वक चालवा.

वृश्चिक
खर्चामुळे आज चिंताग्रस्त असाल. वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर, आज मन खूप व्यस्त असेल. अनेक महत्वाची कामे आणि विषय समोर असतील, त्यापैकी कशाला प्राधान्य द्यावे याचा विचार करावा लागेल. वैयक्तिक आयुष्य सुधारण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या रागामुळे अस्वस्थ होऊ शकता. विवाहित लोक सामान्य जीवन जगू शकतात. कामात मन थोडे गोंधळात पडू शकते म्हणून कामाकडे अधिक लक्ष द्या.

धनु
मानसिकदृष्ट्या बळकट राहाल. ग्रहांची स्थिती आर्थिक फायदा मिळवून देईल. अनेक ठिकाणांहून पैसे मिळू शकतात. विरोधकही प्रशंसा करताना दिसतील. कामातील स्थिती खूप चांगली असेल. बॉस कार्यक्षमतेचे कौतुक करेल. वैयक्तिक आयुष्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. लव्ह लाइफमध्ये किंवा घरगुती जीवनात जोडीदाराचे सहकार्य आणि प्रेम तुमचे मन जिंकेल. कुटुंबात एखाद्याचे बिघडलेले आरोग्य चिंता निर्माण करू शकते.

मकर
गंभीर विचार मनात ठेवून आज ऑफिसला जाल. एखाद्याशी भांडण होऊ शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. लो प्रोफाइलसह काम करा, ज्यामुळे हलके वाटेल. धैर्य जास्त असेल आणि व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. कुटुंबातील लहान सदस्याला अडचणीचा सामना करावा लागेल. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मदत करावी लागेल. खर्च कमी करा.

कुंभ
आज लांबच्या प्रवासाला जाण्याचे नियोजन करू शकता. हा प्रवास एका विशिष्ट हेतूसाठी असेल. कौटुंबिक जीवनात आजचा दिवस खूप रोमँटिक असेल. लव्ह लाइफमध्ये प्रिय व्यक्तीकउे लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. यामध्ये यशही मिळू शकता. मानसिक ताण टाळा कारण यामुळे होणारी कामे सुद्धा बिघडू शकतात. आरोग्य चांगले राहील. बेकायदेशीर कामांपासून दूर रहा.

मीन
सासरचे लोक आपल्याला भेटायला उत्सुक असतील आणि आज त्यांना भेटण्याची संधी मिळेल. अनेक चर्चा होतील आणि दिवस खूप आनंददायक असेल. कामाबद्दल खूप सावध रहाल आणि अगदी सहजपणे चांगले काम करण्यासाठी प्रयत्न कराल. धैर्य आज शिखरावर असेल, यासाठी व्यवसायात नवीन जोखीम देखील घेऊ शकता. वैयक्तिक आयुष्यात रागावर नियंत्रण ठेवले तर बिघडलेले काम सुद्धा होईल.