23 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींसाठी आजचा दिवस मंगलमय, अपूर्ण इच्छा पूर्ण होतील, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष 
आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीत एखाद्या मोठ्या अधिकार्‍यासोबत मतभेद होणे हानिकारक ठरू शकते, म्हणूनच रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक सन्मानही मिळेल. मित्रांसह दूरच्या प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवन सुखी होईल. संततीच्या समस्या सोडवण्यात संध्याकाळ घालवाल.

वृषभ 
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यापार्‍यांना आज अनावश्यक किंवा जास्त मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल. नोकरीत अधिकार्‍यांच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. संध्याकाळी सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. व्यवसायासाठी एखादी नवीन योजना तयार करत असल्यास भविष्यात ती सर्वोत्तम लाभ देईल.

मिथुन 
नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित काही समस्या सुरू असतील तर त्या संपतील. व्यवसायात प्रगती होण्यासाठी वडीलधार्‍यांच्या अनुभवाची आवश्यकता भासेल. संध्याकाळी मित्रांसह आणि कुटूंबासमवेत पार्टीला जाऊ शकता. परदेशाशी व्यापार करणार्‍या लोकांना नफ्याच्या नवीन संधी मिळतील. आईकडून विशेष प्रेम मिळेल.

कर्क 
आज सामाजिक वर्तुळाचाही सर्व बाजूने रूंदावेल. मित्रांची भेट घेतल्यास तणावही कमी होईल. आज आनंद घ्याल. आज आपण विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देणार नाही, ज्यामुळे यश पायाशी असेल. धनवृद्धीसाठी जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. आज संततीला त्रास होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या.

सिंह 
आज अज्ञात व्यक्तीशी व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर अजिबात करू नका, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास खूप फायदेशीर ठरेल. शत्रू प्रबळ राहतील, पण ते नुकसान करू शकणार नाहीत. व्यवसायात नवीन यश फक्त मेहनतीनेच प्राप्त होईल, म्हणून कष्टात कमतराता आणू नका. संततीचा सामाजिक कार्यात रस वाढेल.

कन्या 
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कुटुंबात एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त दिसतील. संततीच्या भविष्यासाठी नियोजन कराल. आजूबाजूला वाद होऊ शकतो, परंतु बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तुळ 
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. पद, प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल. जवळचा किंवा दूरचा प्रवास स्थगित होऊ शकतो. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. समस्यांचे निराकरण न झाल्यास मनात अशांततेची भावना राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मेहनत कराल.

वृश्चिक 
विद्यार्थी अभ्यासामध्ये गुंतलेले दिसतील. पैशाअभावी आज थोडी चिंता वाटू शकते. सासरच्या बाजूकडून आज धनलाभ होऊ शकतो. रोजगाराशी संबंधित जातकांना आज एखादी शुभ संधी मिळू शकते. सामाजिक सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांना एखाद्या छोट्या प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता.

धनु 
आजचा दिवस संमिश्र आहे. वाहन वापराताना काळजी घ्यावी लागेल, एखादे अज्ञात वाहन बिघडल्याने पैसे खर्च होऊ शकतात. संततीसाठी एखादी भेटवस्तू आणू शकता. एखादी गुंतवणूक करायची असेल तर त्या दिवसासाठी हा दिवस खूप चांगला आहे. भाग्याची मोठी साथ मिळेल. संध्याकाळ मित्रांसह पार्टीमध्ये घालवाल.

मकर 
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. अडकलेले पैसे अचानक मिळतील, ज्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. थांबलेली कामे पूर्ण कराल. दाम्पत्य जीवनात सौम्यता राहील. जोडीदार भरपूर साथ देईल. नोकरीत आणि व्यवसायात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून लाभ होईल. विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून खुप काही शिकायला मिळेल.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र फलदायक आहे. आज रूसलेल्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. आई-वडीलांकडून विशेष प्रेम मिळेल. आज भाऊ किंवा बहिणीची तब्येत अचानक बिघडू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. संध्याकाळी एखादा पाहुणा येऊ शकेल, ज्यामुळे पैसेही खर्च होतील.

मीन
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर चांगले यश मिळेल. एखाद्या विशेष संधीने आनंदी व्हाल. कायदेशीर वाद सुरू असल्यास तो आज पुन्हा डोके वर काढू शकतो, जो समस्या बनू शकतो. कार्यक्षेत्रात कठोर मेहनतीने यशस्वी होऊ शकता.