25 जून राशीफळ : गुरूवारी शुक्र मार्गस्थ झाल्याने ‘या’ 5 राशींना होणार ‘लाभ’, धनसंपत्तीत होणार वाढ

पोलीसनामा ऑनलाइन

मेष
आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. कामात कठोर परिश्रम कराल, चांगले निकाल मिळतील. वैवाहिक जीवन प्रेमाने परिपूर्ण असेल. जोडीदार एखाद्या गोष्टीवरून राग व्यक्त करू शकतो. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

वृषभ
आजचा दिवस व्यस्त राहाल. बाहेर फिरायला जाऊ शकता. मंदिरात जाण्याचा बेत ठरवाल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. नात्यात प्रेम राहील. आरोग्यही मजबूत राहील. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामासाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
आजचा दिवस फलदायी आहे. मानसिकदृष्ट्या चिंताग्रस्त रहाल, याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामात थोडा विलंब होऊ शकतो. वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहील, जोडीदार आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. प्रेमसंबंधात चांगला काळ आहे.

कर्क
आजचा दिवस सामान्यपणे फलदायी आहे. मानसिकदृष्ट्या बळकट राहाल. कामात यश मिळेल. व्यवसाय वेगाने पुढे जाईल. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. उत्पन्न वाढेल. थोडा खर्च राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

सिंह
दिवस सामान्य आहे. खर्चामुळे अस्वस्थ होऊ शकता, परंतु चांगले उत्पन्न मिळवाल. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. कामाचा आनंद मिळेल. वैवाहिक जीवन तणावात राहू शकते. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

कन्या
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारपर्यंत प्रकृती चांगली राहील, परंतु त्यानंतर खर्च वाढू शकेल. एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल. कामासाठी दिनमान चांगले आहे. बुद्धीचा वापर करून यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात तणाव दिसून येईल. प्रेमसंबंधात आयुष्य पुढे जाईल. नात्यात एकमेकांबद्दलची जबाबदारी वाढेल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. भाग्याची साथ मिळेल, यामुळे कामे लवकर यशस्वी होतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव राहील. प्रेमसंबंधात खुलेआम आनंद घ्याल.

वृश्चिक
आजचा दिवस सामान्य आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल. वरीष्ठ खुश होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स देखील राहील. नात्यात आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात काही चांगल्या क्षणांचे साक्षीदार व्हाल. प्रिय व्यक्तीला मनातील उघडपणे सांगाल. आरोग्य चांगले राहील. फक्त खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.

धनु
आजचा दिवस उत्तम आहे. दूरच्या प्रवासाचा बेत कराल. घरात प्रॉपर्टीशी संबंधित चर्चा होईल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण राहील. प्रेमसंबंधासाठी दिनमान चांगले आहे. दृढ राहाल. नोकरीत चांगले काम कराल.

मकर
आज अतिशय समजूतदारपणे वागण्याचा दिवस आहे. मानसिक चिंता वाढतील. अनावश्यक खर्चही त्रास देतील. आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. नोकरीत काम सामान्य होईल. नोकरीत बदली शक्यता आहे. वैवाहिक जीवनात घरी चांगले काम कराल. प्रेमसंबंधात आनंददायक बातमी मिळेल.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. कामाचा आनंद घ्याल, कामाशी संबंधित चांगले फळ मिळेल. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद लाभेल. जोडीदार मनातील गोष्टी सांगेल. प्रेमसंबंधात दिनमान चांगले आहे. प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न कराल.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. बुद्धिमत्तेचा उपयोग केल्यास अनेक गोष्टी यशस्वी होतील. उत्पन्न वाढेल. आरोग्य बळकट होईल. कामात थोडा चढउतार राहील. वैवाहिक जीवन आता काही प्रमाणात तणावातून मुक्त होईल. प्रेमसंबंधात दिनमाना खूप चांगले आहे. लग्नाबद्दल बोलणी होईल.