26 फेब्रुवारी राशिफळ : या 4 राशींचे बदलणार भाग्य, भौतिक सुखात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

मेष
आजचा दिवस कोणत्याही धार्मिक वादात अडकण्यासाठी शुभ नाही. आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. जो व्यवसायात सुरु केला आहे त्यामध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. जास्त काम आहे म्हणून कुटुंबाची उपेक्षा करू नका, यासाठी काळजी घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा त्रास सहन करावा लागू शकतो. कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण कराल. भावाच्या सल्ल्याने प्रगती होईल. संततीला भविष्यासाठी काम करताना पाहून मनात आनंदाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण होतील. भावाच्या सल्ल्याने प्रगती होईल.

वृषभ
विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाच्या अनुभवातून नवीन संधी मिळतील, यासाठी गुरूंचा आशीर्वादही मिळेल. तसेच परीक्षेसाठी केलेले श्रम अर्थपूर्ण ठरतील. एखादा व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस सर्वात चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी वेळ अनुकूल नाही. व्यस्ततेमुळे काही काळ दुरावा येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल.

मिथुन
जे विवाहासाठी इच्छूक आहेत त्यांना आज चांगले प्रस्ताव येतील. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आनंद होईल. व्यवसायात सकारात्मक बदल केल्यास नफ्याची स्थिती निर्माण होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अधिक मेहनतीची आवश्यकता आहे. एखादे काम अनेक दिवसांपासून रखडलेले असेल तर ते आज पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. भावांना आणि मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. शक्ती वाल्याने संपत्ती व समृद्धी मिळेल.

कर्क
व्यवसायात योजनांना चालना मिळेल. पैशाच्या समस्येला त्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक संबंध दृढ होतील. परंतु कुटुंबाच्या खर्चाची देखील काळजी घ्यावी लागेल. अन्यथा आर्थिक स्थिती डगमगू शकते. कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु यशस्वीरीत्या आव्हानांना सामोरे जाल. बोलण्यावर संयम राखला तर यश मिळेल. आरोग्याबद्दल जागरुक रहा आणि बाहेर खाणे-पिणे टाळा.

सिंह
आज संध्याकाळी वाहन वापराताना सावधगिरी बाळगा. व्यवसायामध्ये मनासारखी बातमी मिळाल्याने आनंद होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित एखादा वाद सुरू असल्यास तो आज संपुष्टात येईल. मित्र आणि भावांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल. कनिष्ठ कर्मचारी किंवा नातेवाईक यांच्यामुळे ताण येऊ शकतो. कुणाशीही व्यवहार करणे टाळा. सासरच्या बाजूने फायदा होईल. घरातील उपयुक्त वस्तू वाढतील. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे भविष्यातील योजना बळकट होतील.

कन्या
विद्यार्थी भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये निवडतील, ज्यामुळे भविष्य उज्ज्वल बनेल. आर्थिक स्थितीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. बोलण्यातील कोमलता प्रतिष्ठा वाढवेल, मित्रांची संख्याही वाढेल. कौटुंबिक स्थिती अनुकूल राहील. वडिलांचे मार्गदर्शन देखील वेळोवेळी उपलब्ध होईल. भावंडांसोबत नात्यात सुधारणा होईल. प्रेमसंबंधात एखादी भेट मिळेल. स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बहारच्या खाण्या-पिण्यावर संयम ठेवावा लागेल. जोडीदार सर्व प्रयत्नांमध्ये सहाकार्य करेल. रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगली संधी मिळेल.

तुळ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. धार्मिक कामात रुची वाढेल. सामाजिक कार्य केल्याने प्रतिष्ठा वाढेल. संततीच्या विवाहाची चिंता त्रास देत होती, ती आज संपुष्टात येईल. व्यवसायात एखाद्या वयस्क व्यक्तीचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे सर्व समस्यांपासून मुक्तता होईल. नवीन योजना सुरू करण्यासाठी वेळ चांगली आहे. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. कार्यक्षेत्रात सकारात्मक विचारसरणीमुळे नवी ऊर्जा येईल. अधिकार्‍यांकडून कौतुक होईल. वैवाहिक जीवनात सुखद अनुभूती मिळेल.

वृश्चिक
रोजगाराच्या क्षेत्रात बदल करण्याचा विचार करत असाल तर वेळ योग्य नाही. भाग्याची साथ लाभणार नाही, म्हणून असे करू नका. प्रेमसंबंधात उत्साहवर्धक अनुभव येईल. कार्यक्षेत्रात एखाद्या मैत्रिणीमुळे प्रगतीची संधी मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांमुळे अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे आर्थिक ओझे वाढेल. एखादे जुने कर्ज असेल तर आज त्यापासून मुक्त व्हाल. आज महत्वाचे व्यवहार टाळा. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. त्यांच्या समस्या सोडविण्यातही मदत कराल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ कार्याबद्दल चर्चा कराल.

धनु
आज कार्यक्षेत्रातील गुप्तशत्रू आणि मत्सर करणार्‍यांपासून सावध राहावे लागेल, अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भविष्याचा पाया मजबूत करण्याच्या प्रयत्नांविषयी परिवारासोबत चर्चा कराल. यामुळे मनावरील ओझे हलके होईल. व्यवसायातील अनुभव उपयुक्त ठरतील. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला यश देईल. आर्थिक स्थितीही बळकट होईल. संध्याकाळी भांडण किंवा वाद टाळा. अन्यथा कायद्याच्या कचाट्यात सापडाल. आरोग्यासाठी काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर संयम ठेवा.

मकर
प्रेमसंबंधात एखादी भेट मिळू शकते. दुसर्‍याचा आधार घेतल्यास यश मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सुखद व फायदेशीर ठरेल. परंतु जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ज्येष्ठ सदस्यांसमवेत कुटूंबाच्या समस्या दूर करण्यासाठी चर्चा कराल, ज्यामुळे मनाचे ओझे कमी होईल. सामर्थ्याच्या बळावर रखडलेली कामे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना गुरुंचे आशीर्वाद प्राप्त होतील, परीक्षेत यश मिळेल. कार्यक्षेत्रातील एखाद्या सहकार्‍यामुळे विश्वासघाताला सामोरे जावे लागू शकते, परंतु वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील.

कुंभ
राजकारणात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. शासनाचे सहकार्य लाभेल. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात ताजेपणा येईल. कौटुंबिक जीवनात गोंधळ होईल आणि चर्चेतून मतभेद सुद्धा दूर होतील. काही मित्रांची भेट होऊ शकते, ज्यांच्यासोबत दुरच्या प्रवासाला सुद्धा जाऊ शकता. संततीला चांगली कामे करताना पाहून आनंद होईल. जोडीदार काही कारणामुळे नाराज असेल तर त्यास समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

मीन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. जर काही कामे दीर्घकाळ अर्धवट राहिली असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आज वेळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांना एकता टिकवून ठेवावी लागेल, तरच परीक्षेत यश मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याचा योग आहे. कोर्ट कचेरीचे काही प्रकरण चालू असेल तर चांगले यश मिळेल. सासरच्या बाजूकडून तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात गोडवा राहील. जुन्या भांडणातून मुक्त व्हाल, ज्यामुळे शांती लाभेल. मोकळे वाटेल.