26 जानेवारी राशिफळ : मेष, कन्या आणि कुंभ राशीवाल्यांनी आज टाळावेत पैशांचे व्यवहार, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
आज धाडस आणि पराक्रम वाढेल. प्रवासाला विलंब होईल. केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात, म्हणून सावधगिरी बाळगा आणि कामावर पूर्ण लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये थोडी अडचण येऊ शकते. व्यवसायात नातलग किंवा जवळच्या व्यक्तीमुळे अडचणीत येऊ शकता. सोबत काम करणार्‍यांना लोकांकडून थोडा तणाव जाणवू शकतो, परंतु आपण आपल्या क्षमतेने कठीण स्थिती सुलभ करू शकता. आज, अशी स्थिती निर्माण होईल की तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, परंतु तरीही कोणाशी पैशांचा व्यवहार करणे टाळा. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि जोडीदाराला समजून घेण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात निराशा असू शकते.

वृषभ
आज खर्चात जास्त वेळ घालवाल. खरेदीसाठी जाऊ शकता. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. चांगले जेवण खायला आवडेल आणि काही नवीन पदार्थ करायला सांगाल. घरातील खर्चावर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत एखादी पात्रता वाढू शकते, ज्याचा फायदा होईल. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. काही नवीन ऑर्डर मिळू शकतात. काम जास्त चांगले करण्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. हे चांगले ठरेल. लोकांच्या प्रयत्नातून आनंद मिळेल. राजकारणातील लोक समर्थन करू शकतात, जेणेकरून काम पूर्ण होईल. आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. जिभेवर नियंत्रण ठेवा. विरोधकांवर मात करायला वेळ लागेल.

मिथुन
मानसिक तणावातून बाहेर पडून काहीतरी चांगला विचार कराल. विद्यार्थ्यांना आतापासून भविष्याबद्दल काही विचार करावा लागेल आणि योग्य धोरण बनवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कुटुंबातील लहान सदस्यांकडून सहकार्य मिळेल. त्यांच्याबरोबर वेळ घालवल्याने आनंद मिळेल. वैयक्तिक जीवनात जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्या मदतीने काही नवीन कामात फायदा होईल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्ती एखादी भेट देऊ शकते. प्रियजनांशी संबंध मधुर होतील. व्यावसायासाठी अनुकुल आहे.

कर्क
मानसिक त्रास होईल. तरीही, जी कामे हातात घ्याल ती पूर्ण होतील, आणि यश मिळेल तसेच प्रशंसा देखील मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. दिवस अनुकूलआहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. अनावश्यक वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला एकटे समजू नका, इतरांसोबत रहा. याचा फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. कर्जमुक्ती होऊ शकते. गुंतवणूकीत यश मिळेल आणि यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता.

सिंह
आज उत्तम धनलाभ होईल. परदेशी व्यापारातून सकारात्मक परिणाम मिळतील. प्रभाव वाढेल. एकाग्रतेसह पुढे गेल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. मालमत्तासंबंधित काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सासरच्या लोकांकडून सन्मान किंवा भेट मिळू शकते. दुसर्‍यांकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळेल. जोडीदारसुद्धा तुमच्याबरोबर उभा असल्याचे दिसून येईल.

कन्या
व्यवसायात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. एखादी नवीन संधी मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती बळकट होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्याने आनंद व आदर मिळेल. एखाद्या चांगल्या मित्राची साथ मिळू शकते. कुटुंबासमवेत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ द्याल. प्रेमजीवनात गोडी कायम राहू शकते. अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर खाण्यापिणे टाळा. अन्यथा, आजारी पडू शकता. कामात यश मिळेल. भावासारख्या एखाद्या व्यक्तीचे उत्तम मार्गदर्शन मिळू शकते.

तुळ
कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून मोठा फायदा मिळू शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी कधीही न भेटलेल्या एखाद्या व्यक्तीस भेटू शकता परंतु त्याला भेटणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. जर राजकारणात असाल तर प्रयत्न यशस्वी होतील आणि एखादे पद मिळू शकते. प्रशासनाकडून सहकार्य मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न आणि खर्चात संतुलन ठेवावे लागेल. अडकलेली कामे होतील, ज्यामुळे पैसे येऊ शकतात.

वृश्चिक
आपल्या मनात चाललेल्या गोष्टी आपल्या खास लोकांना सांगाल की, मनात काही गोष्टी ठेवल्या तर आजारी पडू शकता. कुटुंबातील ज्येष्ठ आणि विशेषतः आई-वडीलांचे प्रेम मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. वैयक्तिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल, परंतु त्यांची तब्येत ढासळल्यामुळे थोडी चिंता वाटेल. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासनाचे सहकार्य मिळेल. जुने अडकलेले पैसे मिळविण्यासाठी आज अनुकूल दिवस आहे, फालतू खर्चापासून दूर रहा. अन्यथा स्थिती आणखी बिकट होऊ शकते. वडिलांच्या मदतीने व्यवसायात यश मिळेल. नोकरीत अडचणीपासून मुक्तता मिळेल. एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते किंवा हरवू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा.

धनु
दिवस रोमँटिक असेल. विशेषत: वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. जोडीदाराशी जवळीक जाणवेल. भागीदारीत यश मिळेल. आव्हानांतून बाहेर पडाल. आर्थिकबाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. परंतु गुंतवणूकीसाठी दिवस कमजोर आहे, म्हणून काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता आणि सभ्यता कायम ठेवली तर सामाजिक कार्यात यश मिळेल. विवाहितांना सासरच्या लोकांकडून फायदा होईल, परंतु खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा, आरोग्य बिघडू शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस आनंदाचा आहे.

मकर
विरोधकांवर मात कराल, पण अनावश्यक चिंता त्रास देईल. अनावश्यक खर्चापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना इच्छित निकाल मिळवण्यासाठी आज खूप मेहनत करावी लागेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि नवीन योजनेवर काम करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात चांगली बातमी मिळल्याने घरात आनंद होईल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. कामाचा ताण जाणवेल. व्यवसायात योजनांना चालना मिळेल, चांगले स्थिती येईल. विरोधकांवर मात कराल. धर्माशी संबंधित विषयांमध्ये दिवस जाईल.

कुंभ
प्रेमसंबंधाला वेग येईल. नात्यात प्रेम असेल. एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण कराल. वैवाहिक जीवनात संततीकडून चांगली बातमी मिळेल. आनंद मिळेल. व्यवसायात नवीन कामाबद्दल खूप उत्साही असाल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्नच यशाची शिडी चढण्यास मदत करतील. कामात कोणाशीही भांडण टाळा. कामाशी संबंध ठेवा. जोडीदाराच्या मदतीने व्यवसायात यश मिळवू शकता. भाऊ-बहिणीशी संबंध सुधारतील.

मीन
आज विद्यार्थी भविष्यातील योजनांवर काम करतील, मेहनत करतील. व्यवसायात अडचणींपासून मुक्ती मिळेल. छोटा-मोठा प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत केलेले प्रयत्न यशस्वी होतील. काही राजकीय लोकांचे सहकार्य देखील मिळेल. कार्यक्षेत्रात वाहनांची कमतरता भासते. नोकरीत मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल, परंतु कुटुंबातील सदस्याचे बिघडलेले आरोग्य त्रास देऊ शकते. संसंर्गापासून दूर राहाणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडी वाढेल. प्रेमसंबंधात चढ-उतार होईल.