27 मार्च राशीफळ : ‘या’ 4 राशींना मिळेल भाग्याची साथ, नोकरी-व्यापरात मिळेल मोठे यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
आजचा दिवस संमिश्र आहे. बँक, व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण ते फेडता येणार नाही. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. कुटुंबाकडून मान सन्मान मिळेल. रात्री एखाद्या मंगल कार्यक्रमाला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल, तरच यश मिळेल.

वृषभ
आजचा दिवस व्यस्ततेचा आहे. धावपळ जास्त होईल. व्यापरात तेजीसाठी नवनवीन उपकरणांचा वापर कराल. निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आज भरपूर लाभ मिळेल. जी कामे मोठ्या कालावधीपासून रखडली होती ती आज पूर्ण होतील. कोणत्याही कामासाठी पैसे खर्च करायचे असतील तर मनापासून करा, कारण भविष्यात त्याचा खुप फायदा होईल. जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल, अन्यथा आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते. संततीकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल, ज्यामुळे मनात समाधानाची भावना असेल. भावाच्या आरोग्याची थोडी चिंता असेल. सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांसोबत विचारविनिमयात घालवाल. भविष्यासाठी काही योजना आखाल.

कर्क
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. कार्यक्षेत्रात जी मेहनत केली आहे तिचा उत्तम लाभ मिळेल. संततीवरील विश्वास मजबूत होईल. मामाच्या बाजूने प्रेम मिळेल. दिखाव्यासाठी खर्च कराल. शत्रू सुद्धा त्रस्त राहतील, परंतु चिंता करण्याची आवश्यकता नाही. आई-वडीलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, जेणेकरून त्यांचे आरोग्य घसरणार नाही. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून आशीर्वाद मिळेल.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. सासरच्या बाजूकडून वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अन्यथा नात्यात कटुता येईल. मित्रांशी संबंधीत काही त्रास असेल तर त्यामध्ये आज निश्चित सुधारणा होईल. एखाद्या मित्राला मदत करावी लागेल. जर एखादा वाद सुरू असेल तर तो आज संपेल. आर्थिक स्थितीमुळे थोडे चिंताग्रस्त व्हाल.

कन्या
आज व्यवसायासाठी काही प्रवास करावे लागतील, ज्याचा लाभ मिळेल. परंतु नोकरीत शत्रूंपासून सावध रहावे लागेल, अन्यथा ते तुमच्या विरूद्ध मोठे षडयंत्र रचू शकतात. जर एखादा कायदेशीर वाद सुरू असेल तर तो आज संपेल. घरच्या दैनंदिन गरजांसाठी काही सामान खरेदी कराल. ज्यामुळे पैसे खर्च होतील. सामाजिक व धार्मिक कार्यात रूची वाढेल.

तुळ
आजचा दिवस मंगलकार्यासाठी आहे. कुटुंबात एखादे मंगलकार्य होऊ शकते, ज्यामध्ये कुटुंबाचे सदस्य व्यस्त दिसतील. एखाद्या कामात गुंतवणूक करावी लागली तर त्यासाठी दिवस चांगला आहे. अधिकार आणि संपत्तीमध्येवाढ होईल. विद्यार्थ्यांना काही पुस्तकांची आवश्यकता असेल. जोडीदारासोबत वाद होऊ शकतो, परंतु त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. रोजगारासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल.

वृश्चिक
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. मन काही अशांततेमुळे त्रस्त राहील. व्यापारासाठी केलेले कामसुद्धा निष्फळ ठरेल. कुटुंबात एखादे भांडण तोंड वर काढू शकते, परंतु संयम ठेवा. नात्यात दरी निर्माण होऊ शकते. सायंकाळपर्यंत कुटुंबातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने कुटुंबातील वाद संपेल. नोकरीत आज प्रमोशन मिळण्याचे भरपूर योग आहेत. सायंकाळ कुटुंबातील लहान मुलांसोबत खेळण्यात घालवाल.

धनु
आजचा दिवस मध्यम लाभदायक आहे. ज्ञान आणि परोपकाराच्या कामाची भावना विकसित होईल. एखाद्या सामाजिक कार्यात भाग घेऊ शकता. आर्थिक स्थिती दृढ होईल. सायंकाळपासून रात्रीपर्यंत पोटाचा आजार होण्याची शक्यता आहे, यासाठी सावध राहा. खाण्या-पिण्यावर संयम ठेवा. आळस सोडून पुढे जावे लागेल, तरच कामात यश मिळेल. जोडीदाराचे भरपूर सहाकार्य मिळेल.

मकर
आजचा दिवस संमिश्र आहे. समोर काही खर्च येतील, जे इच्छा नसतानाही करावे लागतील. सासरच्या बाजूने सन्मान मिळेल. व्यवसायात मन लागेल. अडकलेली कामे होतील. एखाद्या कामात गुंतवणुक करावी लागली तर आवश्य करा कारण भविष्यात त्याचा भरपूर लाभ मिळेल. दुपारी जोडीदाराच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, ज्यामुळे थोडी धावपळ करावी लागेल. पैसे सुद्धा खर्च होतील. संततीचे भरपूर सहकार्य मिळेल. वडीलांचा सल्ला कामात यश मिळवून देईल.

कुंभ
आजचा दिवस मध्यम फलदायक आहे. बुद्धी आणि विवेकाने नवनवीन शोध घेण्यात वेळ घालवाल. आज मर्यादेत आणि आवश्यकतेनुसार पैसे खर्च करा, अन्यथा आर्थिक स्थिती संकटात सापडू शकते. कुटुंबियांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे, यासाठी सावधगिरी बाळगा. सायंकाळपासून रात्रीपर्यंत जवळचा प्रवास करू शकता, जो लाभदायक ठरेल. आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा. तरच कामे होतील.

मीन
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. जर मोठ्या कालावधीपासून मुलगा किंवा मुलीबाबत एखादा वाद रखडलेला असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे कुटुंबात आनंद दिसेल. रात्रीचा वेळ कुटुंबासोबत मजामस्तीत घालवाल. आनंदी व्यक्तमत्व असल्याने लोक तुमच्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतील. यामुळे मित्रांची संख्या वाढेल.