28 फेब्रुवारी राशिफळ : ‘या’ 5 राशीचे जातक भाग्याचे मानतील ‘आभार’

पोलीसनामा ऑनलाइन : –

मेष
दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. तुमची अनेक कामे मार्गी लागतील, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक कामे होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहिल. संततीसाठी चांगली वेळ आहे. प्रेमात यश मिळेल. कायद्याविरोधात कोणतेही काम करू नका, अन्यथा अडचणीत सापडू शकता. नोकरीत बदलीचे योग आहेत.

वृषभ
दिवस तुमच्यासाठी कमजोर आहे, लक्ष द्या. मानसिक तणाव वाढेल. आरोग्य कमजोर राहू शकते. खर्च वाढल्याने आर्थिक स्थितीवर जोर पडेल. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. परंतु, सासरच्या लोकांकडून वाद होऊ शकतो. विरोधकांना शांत करू शकता. आज कार्यकुशलता उच्च असेल, ज्यामुळे तुमचे काम सर्वांच्या नजरेत भरू शकते आणि त्यांचा लाभ मिळू शकतो.

मिथून
दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. आज तुम्हाला एखादा नवीन मार्ग सापडू शकतो. यामुळे उत्पन्न वाढू शकते. प्रेमसंबंधात यश मिळेल, परंतु उतावळेपणा आणि घाईगडबड करूनका. प्रेमाने प्रिय व्यक्तीच्या गोष्टी ऐकून घ्या. संततीकडून प्रेम मिळेल. दाम्पत्य जीवनात काही आव्हाने असली तरी प्रेम कायम राहिल. कार्यक्षेत्रात बदल करू शकता. काही लोकांना नोकरी मिळवण्यात यश येईल.

कर्क
दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. आज तुमचे संपूर्ण लक्ष कामावर असेल आणि चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. प्रॉपर्टीच्या प्रकरणात लाभ होईल. कुटुंबातील वातावरण थोडे गरम होऊ शकते. परंतु, स्थिती नियंत्रणात राहिल. विरोधकांपासून सावध राहा. संततीसाठी आजचा दिवस चांगला असेल. प्रेमसंबंधात चांगले क्षण अनुभवता येतील. दाम्पत्य जीवनात सुख मिळेल.

सिंह
दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. एखाद्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. प्रवासा सुखाचा होईल. मान सन्मानात वाढ होईल. कार्यक्षेत्रात थोडा तणाव राहू शकतो. प्रेमसंबंधात सावध राहा. एखाद्या तिसर्‍या व्यक्तीचा तुमच्या प्रेमात हस्तक्षेप त्रासदायक ठरू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. दाम्पत्य जीवन चांगले राहिल आणि तुम्ही जोडीदाराचे म्हणणे समजून घ्याल.

कन्या
दिवस थोडा कमजोर राहिल. मन थोडे बेचैन राहू शकते. मानसिक तणाव वाढेल. कामात यश मिळण्याबाबत थोडी शंका वाटेल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. छोटा भाऊ आणि बहिणीचे सहकार्य मिळेल. कुटुंबात तणाव राहिल आणि आई-वडीलांचे आरोग्य कमजोर झाल्याने मानसिक चिंता वाढेल. कामात सहकार्‍यांवर विश्वास ठेवणे तुमच्यासाठी चांगले ठरेल.

तुळ
दिवसभरात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्ही आनंदी राहाल. दाम्पत्य जीवनात प्रेम आणि आनंद वाढेल. आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. एखादा पाहुणा तुमच्या घरी येऊ शकतो. मित्रमंडळींना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबातील लोकांचे संपूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक
दिवस तुमच्यासाठी थोडा कमजोर आहे. मानसिक तणावात थोडी वाढ होईल, परंतु कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्याल. कामात यश मिळेल. दाम्पत्य जीवनात चढ-उतार राहिल. तुमच्या धाडसाच्या बळावर तुम्ही अनेक आव्हानांतून मुक्त व्हाल. एखाद्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत.

धनु
दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. प्रेमसंबंधात आज चांगले अनुभव येतील. उत्पन्नात वाढ होण्याची संधी लाभेल. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. एखाद्या कलात्मक कामात रूची वाढेल, जी तुमच्यासाठी उत्पन्नाचे साधन होऊ शकते. वडीलांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य कमजोर राहू शकते. विद्यार्थ्यांचे मन आज अभ्यासात लागेल.

मकर
दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे. कामात आज यश मिळेल. तुमचे म्हणणे ऐकुण आणि समजून घेतले जाईल, तसेच बढतीसुद्धा मिळू शकते. कौटुंबिक जीवनात शांतता राहिल आणि मातेबाबत अधिक प्रेम जाणवले. तुम्ही मानसिकदृष्ट्या प्रसन्न राहाल. याचा परिणाम कामात दिसून येईल. एखादी प्रॉपर्टी घेण्याची संधी मिळू शकते.

कुंभ
दिवस चांगला राहिल. एखाद्या प्रवासाचा योग आहे. प्रवास आरामदायक आणि धनप्राप्तीसाठी सहायक ठरेल. बहिण-भावासोबत वेळ चांगला जाईल. भाग्याची आज साथ मिळेल. विरोधक आज तुम्हाला त्रास देऊ शकतात, यासाठी लक्ष द्या. तुमच्या सहकार्‍यांच्या मदतीमुळे कामात तुम्हाला सन्मान मिळेल. आज एखाद्या मित्राची भेट होऊ शकते.

मीन
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र अनुभव देणारा आहे. कुटुंबात सुखशांती राहिल. चांगल्या भोजनांचा आनंद घ्याल. जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आजारी पडू शकता. दुखापत होण्याची शक्यता आहे, यासाठी वाहन सावधगिरीने चालवा. प्रयत्न केल्यास धनप्राप्ती होऊ शकते. संततीकडू सुख आणि सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम दिसून येतील. दाम्पत्य जीवनात थोडा तणाव राहू शकतो. जोडीदाराच्या मदतीने मान सन्मान मिळेल.