29 ऑक्टोबर राशिभविष्य : मेष, सिंह आणि धनुसह ‘या’ 4 राशींना मिळतील ‘नव्या संधी’, असा असेल गुरुवार

मेष
आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास देईल. आव्हाने कमी होतील, आणि धाडसाच्या बळावर अनेक कामात यश मिळवाल. आरोग्यात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलांबाबत सावधगिरी बाळगा. कामात खूप सक्रिय व्हाल. परिणामी, चांगले परिणाम मिळतील. नशीब साथ देईल, ज्यामुळे खूप आनंद होईल. वैयक्तिक जीवन आनंदाने भरले जाईल. कुटुंबाच्या वाढीचा विचार कराल.

वृषभ
स्वत:वर अतिविश्वास टाळा. काळजीपूर्वक वाटचाल केली तर शत्रूही मित्र बनतील. उत्पन्न वाढेल. मालमत्तेशी संबंधित कामात धनलाभ होईल. धार्मिक विधी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. लांबचा प्रवास शक्य होईल. विरोधकांबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. विवाहित व्यक्तींना कौटुंबिक जीवनाविषयी थोडा त्रास जाणवेल. कारण जोडीदाराची वागणूक आकलनापलीकडे असेल. प्रेमसंबंधात आज खूप आनंदी दिसाल. प्रिय व्यक्तीच्यात आणि तुमच्या जवळीक वाढेल.

मिथुन
आरोग्य मजबूत राहिल्याने उत्साह दुप्पट होईल. घरात शांतता असेल. सणात घराच्या सजावटीसाठी काहीतरी नवीन वस्तू आणाल. वीजेशी संबंधीत उपकरणे आणू शकता. कार्यालयात तुमचे वलय निर्माण होईल आणि तुमची कार्यक्षमता लोक पाहतील. विवाहित लोक जीवनाबद्दल समाधानी राहतील. जोडीदारासोबतचे संबंध चांगले असतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनात येईल. प्रेमात थोडे चिंताग्रस्त दिसाल.

कर्क
आज सशक्त रहाल. प्रत्येक काम सभ्यतेने आणि समंजसपणे पूर्ण कराल, कामात स्थिरता दिसून येईल. बदललेल्या वागणुकीने लोकांना चकित कराल. मित्रांसोबत चांगल्या गप्पागोष्टी करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती मिळेल. उत्पन्न वाढेल. विवाहित लोक जीवनाबद्दल काहीतरी नवीन योजना आखतील. प्रेमसंबंधात प्रेयसीच्या बोलण्यामुळे फारसा परिणाम होणार नाही आणि त्यांच्या मनात चलबिचल राहील.

सिंह
आज संततीबाबत एखादा मोठा निर्णय घेतला जाईल. त्यांच्या भविष्यासाठी नवीन पॉलिसी घेऊ शकता किंवा चांगल्या शाळेत प्रवेश घेऊ शकता. कौटुंबिक वातावरण काहीसे चिंताजनक असेल. एखाद्याची तब्येत बिघडू शकते. स्पर्धा परीक्षेसाठी आजचा दिवस चांगला आहे. चांगल्या भोजनाचा आनंद घ्याल, जास्त खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. रक्तदाबाची समस्या त्रासदायक ठरू शकते. कामासाठी दिनमान सामान्य राहील. विवाहित लोक जीवनात व्यस्त असतील.

कन्या
मनामध्ये आनंद असेल. प्रेमसंबंधात आनंद असेल. प्रिय व्यक्तीशी लग्नाची बोलणी करू शकता. विवाहित लोक समाधानी दिसतील. जिव्हाळा वाढेल. कामासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात साईडने काही कमवाल ज्यामुळे बँक बॅलन्स वाढेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाचे आशीर्वाद आणि चांगले मार्गदर्शन मिळेल. तब्येत सुधारेल.

तुळ
खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च करू नका. सणाच्या काळात खिसा सांभाळून काम करा अन्यथा त्रास होऊ शकतो. आरोग्याबाबत जागरूक रहा. स्पर्धा परीक्षेच्या संबंधात यश मिळेल. मनात चांगले विचार येतील. लोकांचे चांगले करण्याचा विचार कराल. कुटुंबात असंतुलन असू शकते. मित्रांसह तीर्थस्थळांच्या सहलीची योजना आखली जाऊ शकते. कामासाठी चांगला दिवस आहे.

वृश्चिक
आज मन लव्ह लाइफला सावरण्यात लागेल. प्रिय व्यक्तीच्या आनंदासाठी काही चांगले काम कराल. त्यांच्यासाठी एखादी भेटवस्तू देखील आणाल. विवाहित लोक जीवन सुखी करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. जोडीदार सुद्धा तुमच्या प्रत्येक कामात साथ देईल. कामासाठी दिवस खूप चांगला आहे. कामासाठी खूप प्रवास करावा लागेल, म्हणून आजचा दिवस धावपळीचा असेल. उत्पन्न चांगले होईल. थोडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जीवन आनंद देईल.

धनु
आत्मविश्वास उच्च स्तरावर असेल. ज्यामुळे जग मुठीत घेण्याची इच्छा जागृत होईल. कामाबद्दलचा आत्मविश्वास स्पष्ट दिसेल. काम चांगले होईल. जमीन संबंधित बाबी आकर्षणाचे केंद्र बनेल. एखादा व्यवहार पक्का होऊ शकतो. विवाहित लोक जीवनात आनंदी असतील. जोडीदार व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल. आज पैशाचा लाभ होणार नाही. प्रेमसंबंधात गोंधळलेले असाल.

मकर
आज मित्रांसह मजा करायला आवडेल. त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवाल. कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता. संध्याकाळपर्यंत मित्रांसह काही चांगले क्षण घालवण्याची संधी मिळेल. उत्पन्नासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. नोकरीत काम थोडे कमजोर होऊ शकेल. धार्मिक कामावर खर्च होईल. प्रेमसंबंधात खूप आनंदी दिसाल. विवाहित लोक जीवन चांगले करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.

कुंभ
कौटुंबिक स्थिती लक्ष वेधून घेईल. कौटुंबातील लोकांना तुमची आवश्यकता असेल. चांगल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्याल. काही नातेवाईक घरी येतील, ज्यामुळे घरात गजबज होईल. भाग्य खुप कमजोर असू शकते, ज्यामुळे मोठे काम करण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा, काम अडकले जाऊ शकते. धैर्य ठेवा. कामासाठी दिवस थोडा कमजोर आहे म्हणून कामाकडे थोडेसे लक्ष द्या. विवाहित लोक जीवनात समाधानी असतील. जोडीदाराशी कामाबद्दल बोलाल. प्रेमसंबंधात आनंदी राहाल.

मीन
आज खूप मजबूत दिसाल. प्रत्येक आव्हानाला ठामपणे सामोरे जाल. कामात अनुभव खूप उपयुक्त ठरेल. विवाहित लोक जीवनात खूप आनंदी असतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. एकमेकांप्रती प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात नातं पुढे नेण्याचा विचार कराल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

You might also like