30 ऑक्टोबर राशीफळ : सिंह, कन्या आणि कुंभ राशीवाल्यांनी राहावे थोडे ‘सावध’, इतरांसाठी दिवस ‘शानदार’

 

मेष
आज फिटनेस विषयी नवीन कार्यक्रम सुरू करू शकता. पैसा येईल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामात भूतकाळात केलेल्या मेहनतीचे परिणाम तुमच्यासमोर उमटतील. भाग्याची प्रबळता अनेक ठिकाणी पुढे घेऊन जाईल. विवाहित लोक आपले जीवन सुंदर करण्यासाठी जोडीदाराला सर्व ठिकाणी घेऊन जातील. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसह खरेदी कराल. त्यांच्यासाठी एक छान भेट घ्याल. मन बळकट होईल, यामुळे खूप हलके वाटेल.

वृषभ
दुपारपर्यंत आर्थिक स्थिती चांगली होईल आणि उत्पन्न मिळेल. अडकलेले पैसे परत येऊ शकतात, परंतु दुपारनंतर अचानक खर्चात वाढ होईल, यासाठी लक्ष द्यावे लागेल. विवाहित व्यक्तींना जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रेमसंबंधात रोमँटिक आयुष्य उपभोगाल. दूर फिरायला जाण्यासाठी योजना आखू शकता. मोठ्या भावाच्या मदतीने नवीन घर मिळविण्याचा प्रयत्न करू शकता.

मिथुन
दुपारपर्यंत कामाकडे पूर्ण लक्ष द्याल, जेणेकरून संपूर्ण स्थिती तुमच्या बाजूने असेल. दुपारनंतर स्थिती चांगली होईल आणि कुठूनतरी पैसे मिळतील. आज कोणालाही कर्ज देणे योग्य होणार नाही, म्हणून सावधगिरी बाळगा. कुटुंबाचे वातावरण आनंददायी असेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीबरोबर बोलून लग्नाची तारीख निश्चित करू शकता. कामात चढ-उतार येऊ शकतात, म्हणून लक्ष द्या. दुसर्‍याचे एकून बॉसला असे काहीही बोलू नका जेणेकरून बॉसला वाईट वाटेल. आरोग्य चांगले राहील.

कर्क
भाग्य आणि कर्म यावर आपले जीवन पुढे जाईल. भाग्यावर विश्वास ठेवून मेहनत करा. सकारात्मक परिणाम मिळतील. जोडीदार प्रत्येक टप्प्यावर पाठीशी उभा राहील. आज जोडीदारासोबत सेल्फी घेऊन सोशल मीडियावर आपले लाईक वाढवण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीच्या मनाची स्थिती जाणून घेतल्याने वाईट वाटेल. कारण त्यांना एखाद्या गोष्टीची चिंता असेल. ते आपल्याबरोबर सहजपणे शेयर करणार नाही, म्हणून त्यांच्याशी बोला. कुटुंबात आई-वडिल एखादा कामाचा सल्ला देतील. आरोग्य चांगले राहील. दिवस चांगला ठरेल.

सिंह
आज एकट्याने मोठे काम करणे हानिकारक ठरू शकते, म्हणून आज थोडासा संयम बाळगा. कोणतेही नवीन काम सुरू करू नका, परंतु दुपारनंतर स्थिती बदलेल. त्यानंतर हवे तसे काम करू शकता, त्यामध्ये फायदा होईल. कुटुंबापासून दूर-दूर राहाल. कौटुंबिक जीवनात तणाव असू शकतो. आरोग्यामध्ये चढ-उतार राहील, ज्यामुळे थोडेसे अस्वस्थ वाटेल. विवाहित लोक दुखी असतील. हे टाळण्यासाठी जोडीदाराशी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेमसंबंधात आनंदी असाल.

कन्या
मानसिकदृष्ट्या बळकट व्हा. दुपारपर्यंत कोणतेही महत्त्वपूर्ण काम हाताळा, कारण त्यानंतर समस्या वाढू शकतात. काम बिघडू शकते, म्हणून थोडेसे नियोजन करा. आर्थिकदृष्ट्या, दिनमान चांगले आहे. पैसाही येईल, ज्यामुळे काम हाताळणे सोपे होईल. विवाहित लोक तणावापासून मुक्त राहतील. जोडीदाराकडून प्रशंसा प्राप्त करतील. प्रेमसंबंधात नात्यात पुढे जाल, परंतु कदाचित प्रवासामुळे भावंडांशी भांडण होऊ शकते. कामासाठी दिनमान आपल्या बाजूने असेल.

तुळ
जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, पैसा खर्च करावा लागू शकतो. वेळेवर उपचार करण्याकडे लक्ष द्या. बुद्धिमत्तेच्या बळावर व्यवसाय वाढविण्याचा एक नवीन मार्ग शोधू शकाल. नोकरदार लोक मेहनत करतील. भविष्य मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न कराल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला काही अशा गोष्टी सांगाल ज्यामुळे तुमच्यात वाद होऊ शकतो. विरोधकांना मागे टाकाल. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक
आज बुद्धीमत्तेने काम कराल आणि संततीच्या भल्यासाठी काहीतरी कराल. मित्रांसमवेत वेळ घालवाल आणि कोठेतरी घराबाहेर जाण्याची योजना आखू शकता. खर्च वाढेल. मनात काहीतरी लपविण्याचा प्रयत्न कराल, जे आपल्या चेहर्‍यावर दिसेल आणि तुमचीच माणसे ते ओळखतील. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. कामासाठी धावपळ होईल.

धनु
आजचा दिवस उत्तम आहे, जे काम करण्याचा प्रयत्न कराल ते यशस्वी होईल. यामुळे केवळ दिवसच चांगला जाईल. चांगले आर्थिक लाभही मिळतील. नोकरीत मन लावून काम कराल. व्यापरात बुद्धीचा वापर करून तो पुढे न्याल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसबंधात नात्यात प्रेम वाढेल. एकमेकांच्या जवळ याल, नाते मजबूत होईल.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. प्रवास संपवून दुपारपर्यंत घरी परत येऊ शकता. कामात कुटुंबातील सदस्यांचा आधार मिळेल. नोकरीत उत्कृष्ट काम कराल. प्रत्येक गोष्ट प्रतिष्ठेचा विषय बनवू नका, अन्यथा स्वाभिमान गमावू शकता. उत्पन्न ठीक होईल, खर्च वाढेल. मित्राचे आगमन घरात आनंद आणेल. विवाहित लोक समाधानी दिसतील, तर प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ
आज दुपारपर्यंत कौटुंबिक तणाव त्रास देऊ शकतो, परंतु नंतर दुपारी स्थिती बदलेल. बहिण-भावासोबतच्या चांगल्या संबंधाचा फायदा घेऊन त्यांना सहलीला घेऊ शकता. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समरसतेचे वातावरण राहील. विवाहित लोकांना चांगले वाटते. कोठेतरी खरेदीसाठी जाऊ शकता. प्रेमसंबंधात नात्यावर समाधानी दिसाल. दुपारनंतर प्रवास करू शकता.

मीन
आज वेगवेगळ्या रंगात दिसाल. आरोग्य मजबूत राहील. विवाहित लोक जीवनात प्रेमाचा आनंद घेतील. जोडीदारास एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहताना आनंद होईल. त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधात थोडे निराश होऊ शकता. कारण प्रिय व्यक्तीचे वागणे आवडणार नाही. कामासाठी दिनमान मदत करेल. मेहनत यशस्वी होईल. शिक्षण क्षेत्रात केलेले काम अधिक लाभ मिळवून देऊ शकते. सुज्ञ आणि अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.

You might also like