9 ऑगस्ट राशीफळ : रविवारीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल ? वाचा आजचे भविष्य

मेष
आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. आरोग्यात चढ-उतार होईल, परंतु तरीही आत्मविश्वासात कमतरता येणार नाही. कामासाठी दिनमान चांगले आहे, फक्त लोकांशी चांगले वागा. वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रेमसंबंधात कुटुंबासमवेत दिवस घालवाल.

वृषभ
आज खूप मुक्तपणे जीवन जगाल. उत्पन्न वाढेल. काही इच्छा पूर्ण होतील. मित्रांसमवेत वेळ घालवाल. स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. काहीतरी चांगले खाल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल. प्रेमसंबंध चांगले राहतील, प्रिय व्यक्तीसोबत कुठेतरी जाण्याची योजना आखाल. वैवाहिक जीवनात आनंदाचा दिवस आहे. कामात मेहनतीला यश येईल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. कामासह, उत्पन्न मजबूत बनविण्यासाठी एखादा चांगला मार्ग सापडेल. त्यानुसार स्वत: ला वळवण्याचा प्रयत्न कराल. घरगुती जीवन विलक्षण असेल. जोडीदाराबरोबर प्रेम वाढेल. प्रेमसंबंधात आजचा दिवस अपेक्षांनी भरलेला असेल आणि प्रिय व्यक्तीसोबत खुलेपणाने बोलाल.

कर्क
आजचा दिवस अध्यात्म आणि आनंदासह घालवाल. कामात चांगले परिणाम मिळतील. आनंद होईल. उत्पन्न चांगले मिळेल. खर्च खूप वाढेल, तरीही खर्चातून आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात निराशा जाणवेल. जोडीदाराच्या वागण्यात काहीतरी कमतरता भासेल. प्रेमसंबंधात सुखी रहाल.

सिंह
आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. मानसिक ताण आणि बिघडलेले आरोग्य त्रास देऊ शकते. कामासाठी दिनमान चांगले आहे. मेहनतीला यश येईल. प्रेमसंबंधात रोमान्स अनुभवाल, प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवाल, काहीतरी चांगली भेटवस्तू द्याल. वैवाहिक जीवन ठीक असेल, पण जोडीदारांचे आरोग्य बिघडू शकते.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात घरातील कार्यात व्यस्त राहाल. प्रेमसंबंधात समजून घेण्यात गैरसमज होऊ शकतात. कामात दिनमान चांगले आहे, स्वतःवर विश्वास ठेवा.

तुला
आजचा दिवस सामान्य आहे. विरोधकांवर विजय मिळवा, त्यांना योग्य उत्तर द्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक असेल. आरोग्य चांगले राहील. कामासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दीनमान चांगले आहे. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंध आनंदी करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. वैवाहिक जीवन चांगले राहील. सासरकडील लोकांना भेटाल, तेथे एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. कामासाठी दिनमान मजबूत आहे. नोकरीत बदलीचा योग आहे.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. आनंदाचा अनुभव घ्याल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन आनंद, प्रेम आणि रोमान्सयुक्त असेल. कामात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्य चांगले राहील. धार्मिक विचार मनात येतील.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. मित्रांकडे एखाद्या कामासाठी मदत मागू शकता. उत्पन्न सामान्य असेल, परंतु खर्च जास्त असेल, काळजी घ्या. वैवाहिक जीवन शांततामय राहील. मनात अनेक गोष्टी येत राहतील, त्या जोडीदाराला सांगा. प्रेमसंबंधात दिवसाचा आनंद लुटाल. कामासाठी दिनमान चांगले आहे, विरोधकांपासून जरा सावध रहा, ते चिंता वाढवतील.

कुंभ
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. मनोबल परत येईल. पूर्वीपेक्षा आरोग्यामध्ये किंचित सुधारणा होईल. वैवाहिक जीवन सामान्य असेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे, मनातील गोष्ट खुलेपणाने आपल्या प्रिय व्यक्तीला सांगाल. कामात चांगले परिणाम मिळतील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. मनाने बळकट होऊन प्रत्येक कामात पुढे जाल. कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. प्रेमसंबंधात दिवसाचा आनंद लुटाल. वैवाहिक जीवन परस्पर प्रेमाने पुढे जाईल. कामासाठी दिनमान चांगले आहे.