11 मे राशीफळ : सूर्य आणि चंद्र दोन्ही ग्रह मेष राशीत, ‘या’ 5 राशींना होणार लाभ, इतरांसाठी असा आहे मंगळवार

मेष
प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. सुखशांतीचा शोध घ्याल पण विपरित मिळेल, ज्यामुळे थोडे अस्वस्थ व्हाल. व्यापारात नवीन लोकांना भेटणे भविष्यासाठी लाभदायक ठरेल. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, मनात आनंद राहील. दाम्पत्य जीवन आनंददायी राहील. सायंकाळ मित्रांसोबत घालवाल. नवी माहिती मिळेल.

वृषभ
संमिश्र फलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक भार कमी होईल. परदेशातील नातेवाईकांकडून शुभवार्ता समजेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कार्यक्षेत्रात पहिल्यासारखी अनुकुलता नसेल पण छोट्या कामांतून आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्यात घसरून होऊ शकते, सतर्क रहा. त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जा.

मिथुन
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कौटुंबिक खर्चात कपात करणे आवश्यक आहे. हे केले नाही तर आर्थिक स्थिती संकटात येऊ शकते. संपत्ती खरेदी करताना कागदपत्र व्यवस्थित तपासून पहा, नुकसान होऊ शकते. सायंकाळी घरातील कामात भाग घ्याल. रखडलेली कामे पूर्ण करा. सासरकडून सन्मान मिळेल.

कर्क
धावपळ आणि व्यस्ततेचा दिवस आहे. नोकरी, व्यवसायात धनलाभाची संधी मिळेल. सुख-सुविधांसाठी पैसा खर्च कराल, ज्यामुळे पैसा साठणार नाही. आर्थिक स्थिती बिघडू शकते. नोकरीसाठी आरामदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी दिवस उत्तम. कार्यक्षेत्रात कार्यभार तुमच्याकडे आल्याने सहकारी नाराज होतील, सावध रहा.

सिंह
व्यवसायाठी दिवस महत्वाचा आहे. लाभ आणि हानी एकसमान होईल, ज्यामुळे धनलाभास विलंब होईल. रखडलेली डील फायनल होईल. सायंकाळी जुन्या मित्राची भेट होईल. कुटुंबात शांतता राहील. रखडलेली कामे पूर्ण करा, अन्यथा भविष्यात नुकसान होईल. संतती संबंधी चांगली माहिती मिळेल.

कन्या
दिवस ठोस फलदायक आहे. नोकरीत भार वाढेल, पण मेहनतीने काम केल्यास सर्व काम संपवाल. घरात तणाव राहील. भाऊ-बहिणीची समस्या सोडवाल. कार्यक्षेत्रात वेळ काढाल. संततीकडून शुभवार्ता समजेल. आरोग्याबाबत सतर्क रहा, आरोग्यात घसरण होऊ शकते.

तुळ
संमिश्र दिवस आहे. व्यापारी वर्ग नवीन कामात नशीब अजमावू शकतो, ज्यात यश मिळेल. कार्यक्षेत्रात निर्णय घेताना घाई करू नका. दाम्पत्य जीवनातील तणाव दूर होईल. मनशांती लाभेल. गैरसमजातून कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. परंतु, ज्येष्ठांच्या मदतीने सामान्य होईल.

वृश्चिक
समाजिक क्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नवे मित्र होतील. लोकप्रियता वाढेल. राजकीय व्यक्तीशी मैत्री होईल. घरात आवश्यक पुरवठा केल्याने शांतता राहील. कार्यक्षेत्रात वरिष्ठांकडून वेळ काढण्यात यशस्वी व्हाल. वडीलांच्या तब्येतीत घसरण होऊ शकते, सावध रहा. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. सायंकाळ घरातील छोट्या मुलांसोबत घालवाल.

धनु
शांततामय दिवस आहे. कोणताही वाद थोड्या वेळातच सामान्य होईल. नोकरीत शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील, सतर्क रहा, कामावर लक्ष द्या. एखाद्या अधिकार्‍याशी वाद होऊ शकतो. सतर्क रहा. राजकीय क्षेत्रात मनासारखे काम होईल. घरातील सदस्याच्या मनातील कटूता दूर होईल.

मकर
विशेष परिणामांचा दिवस आहे. प्रेमसंबंधात भेटवस्तू मिळेल, नवी ऊर्जा मिळेल. दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होईल. रोजगाराची नवी संधी मिळेल. सायंकाळ शांततेत जाईल, प्रकृतीत बदल झाल्याने अस्वस्थ व्हाल. व्यापारात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. संपत्तीचे प्रकरण तुमच्या बाजूने होईल. व्यापारात मैत्रिणीच्या सहर्याने लाभ होईल.

कुंभ
अनेक महिन्यानंतर आजचा दिवस यशदायक ठरेल. संततीबाबत आनंदाची बातमी मिळेल. मोठ्या प्रमाणात पैसा आल्याने बचत वाढेल. विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. महत्वाच्या कामात दूसर्‍यांकडून सहकार्य मिळवाल. सायंकाळी मित्रांसोबत प्रवास कराल. परंतु, प्रवासात काळजी घ्या आवडती वस्तू हरवू शकते.

मीन
दिवस संथ गतीने सुरू होईल. व्यवसायात आज डिल फायनल केली तर भविष्यात भरपूर लाभ होईल. जोडीदाराचे सहकार्य, सहवास दिवसभर लाभेल. सायंकाळी थकवा जाणवेल. आईशी मतभेद होऊ शकतात, त्यांचे ऐका आणि समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. भागीदाराच्या व्यापारात भरपूर लाभ होईल.