15 मे राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, मेष राशीला फायदा तर मिथुनला धनलाभ, इतरांसाठी असा आहे शनिवार

मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. चारही बाजूचे वातावरण आनंदमय असेल. मोठ्या प्रमाणात पैसा हातात आल्याने समाधान वाटेल. सायंकाळी मित्र-परिवारासोबत पार्टीचे आयोजन कराल. भावांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. करियरमध्ये प्रगती होईल. नवीन लोकांच्या ओळखी होतील.

वृषभ
संमिश्र दिवस आहे. जर एखाद्या व्यक्तीने पैसे कमावण्याचा किंवा व्यापारात प्रगती करण्याचा कोणताही प्रस्ताव ठेवला तर तो स्वीकारू नका, नुकसान होऊ शकते. आरोग्याबाबत सावध रहा. सायंकाळी नवीन लोकांशी मैत्री होईल. व्यक्तिमत्व उजळेल. स्वभावातील हट्टीपणा इतरांना त्रासदायक ठरू शकतो.

मिथुन
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. जमीन, मालमत्तेत गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम. आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात लाभ प्राप्तीसाठी सतर्क रहा. शत्रु नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. बिझनेससाठी महत्वाच्या योजनेस सुरुवात कराल. अचानक रखडलेले पैसे मिळतील, पण निष्काळजीपणा केल्यास हातातून जातील.

कर्क
कोणत्याही कामात भाग्याची साथ लाभेल. मात्र विचारपूर्वक काम करावे लागेल. जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल कराल. कोर्ट कचेरीच्या कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी भविष्यातील योजनांवर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करतील.

सिंह
दिवस ठोस फलदायक आहे. व्यवसायात नि:संकोच गुंतवणूक करा. उत्पन्न वाढेल. दाम्पत्य जीवनात वाणीवर नियंत्रण ठेवा, संबंध बिघडू शकतात. सायंकाळी एखाद्या नातेवाईकाकडून भेटवस्तू मिळू शकते. प्रेमसंबंधात नवीन उर्जा संचारेल. जबाबदार्‍या पूर्ण कराल.

कन्या
दिवस व्यस्ततेचा आहे. कुटुंबात वाद होऊ शकतो, सायंकाळी तो संपेल. कार्यक्षेत्रात एखादी योजना पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सूचना मान्य केल्या जातील. प्रमोशनची शक्यता वाढेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, त्याचा भविष्यात खुप लाभ होईल.

तुळ
दिवस ठोस परिणामांचा आहे. जे काम सुरू कराल, किंवा करण्याचा विचार कराल तेव्हा कुणीतरी न मागता सल्ला देण्यासाठी येईल, यामुळे काहीकाळ द्विधा मनस्थिती होईल. परिचितांकडून धनलाभ होईल. सासरच्या बाजूकडील एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. संततीच्या विवाहातील अडथळे दूर होतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आई आरोग्य सुधारले.

वृश्चिक
घरातील वातावरण क्षणा-क्षणाला बदलेल, ज्यामुळे त्रास सुद्धा होऊ शकतो. वडील किंवा एखाद्या ज्येष्ठाच्या आरोग्यावर खर्च करावा लागेल, डॉक्टराचा सल्ला घ्या. शारीरीक आणि मानसिक अस्वस्थता असूनही जे कार्य धाडसाने कराल त्यामध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना गुरुंचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल.

धनु
दिवस आरामदायक आहे, पण अनावश्यक वक्तव्य टाळा, कारण भविष्यात त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. कुटुंबात प्रसन्नता असेल. मित्राच्या मदतीने पुढे वाटचाल कराल. सायंकाळी घरातील मुलांसोबत मजामस्ती कराल.

मकर
आजचा दिवस कठीण आहे. घरातील महत्वाची कामे करण्यासाठी आळस सोडवा लागेल. परदेशाशी व्यापारात शुभवार्ता समजेल. व्यवसायात कमी लक्ष लागेल, मर्यादित उत्पन्न होईल. भविष्याची चिंता वाटेल. नोकरीत कुणाचेही ऐकून कुणावरही रागावू नका, प्रमोशनवर परिणाम होईल.

कुंभ
सर्व कामामध्ये आळस जाणवेल. घरची कामे सुद्धा रखडतील. नोकरीत घाई करू नका, अधिकार्‍यांची बोलणी ऐकावी लागतील. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान करा. कौटुंबिक संपत्तीत वाढ होईल. घरात आणि बाहेर धाडसाचा परिचय बोलण्यातून द्याल, पण सतर्क सुद्धा रहा. भागीदारीच्या व्यापारासाठी दिवस उत्तम.

मीन
दिवस ठोस परिणामांचा आहे. त्रास देणारी कामे टाळा. एखाद्या कामावर मेहनत करावीच लागेल. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल. वैयक्तिक संबंधात वादा होऊ शकतो, वाणीवर नियंत्रण ठेवा. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. संततीच्या भविष्यासाठी योजना आखाल.