16 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींच्या उत्पन्नात होईल वाढ, इतरांसाठी असा आहे रविवार

मेष
दिवस उत्तम फलदायक आहे. धनप्राप्ती होईल. धनवृद्धीसाठी पार्ट टाइम कामाचा विचार करू शकता. मित्र आणि नातेवाईकांचे आगमन झाल्याने उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात खुप मेहनतीनंतर यश मिळेल. जमीन, घराच्या देखरेखीसाठी खर्च कराल.

वृषभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कुटुंबात शुभकार्यावर विचार होईल. विवाहातील बाधा संपेल. नोकरी, व्यवसायाठी जास्त वेळ देऊ शकणार नाही, तरीही थोड्या वेळात खर्च काढण्यात यशस्वी व्हाल. महत्वाची कामे पुढे ढकलू नका. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ शकतो. खास पाहुण्याचे आगमन होईल. वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे.

मिथुन
कालच्या पेक्षा आजचा दिवस चांगला आहे. घरातील काही कामांमुळे इतर कामे टाळावी लागतील. व्यवसायात दुपारनंतर धनलाभ होईल. जोडीदारासाठी भेटवस्तू घ्यावी. आईच्या आरोग्याबाबत सतर्क रहा. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात नवीन उर्जा मिळेल.

कर्क
रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. वडीलांशी मतभेद होऊ शकतात, वाणीवर नियंत्रण ठेवा, त्यांचे म्हणणे ऐका. दाम्पत्य जीवनात आर्थिक स्थितीवर विचार कराल. ज्यात जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. व्यापारासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल. सायंकाळ कुटुंबात घालवाल.

सिंह
संमिश्र दिवस आहे. कुटुंबातील समस्या संपेल. कार्यक्षेत्राचा विस्तार कराल. समाजात सन्मान मिळेल. भावांच्या सल्ल्याने प्रगती होईल. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल. कुटुंबातील वाद संपेल. ऑफिसमध्ये अधिकार्‍यांशी संबंध वाढतील. प्रेमजीवन आनंदात व्यतीत होईल. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाल.

कन्या
इच्छापूर्ती होईल. व्यवसायात नवीन आयडिया वापरल्याने लाभ होईल. प्रगती कराल. व्यवसायातील समस्या दूर होतील. एखाद्या कामासाठी खुप धावपळ करावी लागेल. कुटुंबाचे काम पूर्ण कराल. भागीदारीतील व्यापारात यश मिळेल.

तुळ
चारही बाजूचे वातावरण आनंददायी राहील. मंगलमय बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्षेत्रात केलेले बदल सकारात्मक परिणाम देतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. भाऊ तसेच मित्रांच्या मदतीने महत्वाची कामे पूर्ण कराल. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा, काही वाटले तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वृश्चिक
दिवस काहीसा धावपळीचा आहे. कुटुंबातील सदस्यांचे वागणे तुमच्या स्वभावावर अवलंबून असेल. तुम्ही आनंदी राहिलात तर ते आनंदी राहतील. ज्येष्ठांच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. व्यवसायिक प्रगती होईल. आत्मविश्वास वाढेल. दाम्पत्य जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराचे ऐका, त्यांना नाराज होऊ देऊ नका.

धनु
दिवस धावपळीचा आहे. कुटुंबातील सदस्यांचे वागणे तुमच्यावर अवलंबून राहील. सायंकाळी एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. जोडीदार नाराज झाला तर त्याला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. कोणतेही काम आत्मविश्वासाने कराल. कुणाला दिलेले पैसे खुप दिवसांपासून परत मिळत नसतील तर ते आज परत मिळतील.

मकर
धार्मिक, सामाजिक कार्यात भाग घ्याल. संततीच्या भविष्याचा महत्वाचा निर्णय घ्याल. व्यवसायात लाभ होईल. शुभवार्ता दिवसभर मिळतील. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. सायंकाळी घरातील लोकांशी महत्वाच्या विषयावर चर्चा कराल.

कुंभ
दिवस संमिश्र आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांशी संबंध वाढल्याने लाभ घेण्याची संधी मिळेल. गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे खर्च कराल. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन ठेवा. रोजगाराची चांगली संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस उत्तम.

मीन
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात जास्त मेहनत करावी लागेल, नंतर मनासारखे यश मिळेल. धनलाभ होईल. मित्रांकडून आनंददायक बातमी समजेल. आई-वडीलांची सेवा करण्याची संधी मिळेल. मित्र, कुटुंबासोबत भोजन कराल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.