20 मे राशीफळ : ‘या’ 5 राशींकडे येईल पैसा, अन्य क्षेत्रात सुद्धा होईल लाभ, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
दिवस संमिश्र आहे. जोडीदारासोबतचा तणाव आज संपेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी सिनियर्सच्या मदतीने दूर होतील. व्यापारात रखडलेली कामे पूर्ण होतील. संततीचे चांगले काम पाहून आनंद होईल, ज्यामुळे किर्ती वाढेल.

वृषभ
दिवस उत्तम फलदायक आहे. नोकरीत मैत्रिणीच्या सहकार्याने धनलाभ होईल. प्रेमसंबंधात आज प्रियव्यक्तीची कुटुंबियांशी भेट घडवून आणू शकता. सासरकडून धनलाभ होऊ शकतो. मित्राच्या सहकार्याने व्यापारातील अडथळा दूर होईल. व्यापारात लाभाच्या नवीन संधी मिळतील.

मिथुन
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. व्यवसायात सावध रहा, निर्णय विचारपूर्वक घ्या, भविष्यात त्रास होऊ शकतो, म्हणून कोणतीही जोखीम विचारपूर्वक घ्या. आईला शारीरीक त्रास होऊ शकतो. सायंकाळी बहिण-भावाशी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करू शकता. सामाजिक कार्यात भाग घ्याल.

कर्क
दिवस सुख-शांतीचा आहे. व्यापारात जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल. कुटुंब आणि व्यवसायातील तणाव संपेल. धाडसात वाढ होईल. जमीन, मालमत्तेच्या प्रकरणात विजय होईल. पत्नीसाठी भेटवस्तू खरेदीक करू शकता.

सिंह
दिवस उत्तम फलदायक आहे. व्यवसायात मोठा लाभ होईल. भविष्याची चिंता कमी होईल. भाऊ किंवा बहिणीकडून आनंद वाढवणारी बातमी समजू शकते. रात्री मंगलकार्यात सहभागी व्हाल. मित्राला पैसे देताना विचारपूर्वक द्या, परत येण्याची शक्यता कमी आहे.

कन्या
दिवस व्यस्तता आणि धावपळीचा आहे. व्यवसायात अस्ताव्यस्त पडलेले सामान ठिक करण्यासाठी दिवसभर व्यस्त रहाल. प्रेमसंबंधासाठी वेळ काढाल. आनंददायक बातमी समजेल. सायंकाळी पाहुण्यांचे आगमन होईल. ज्यामुळे कुटुंबातील सदस्य व्यस्त दिसतील.

तुळ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. राजकारणात नवीन संधी मिळतील, प्रसिद्धी वाढेल. जनसमर्थन वाढेल. सायंकाळी विशेष सोहळ्यात सहभागी व्हाल, ज्यामध्ये मोठ्या व्यक्तींची भेट झाल्याने लाभाच्या नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात मंगलकार्याबाबत विचार होईल. संसारिक सुखाच्या साधनांवर पैसे खर्च कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक
दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. संततीच्या विवाहाबाबत महत्वाचा निर्णय घ्याल, यात जोडीदार आणि आई-वडीलांचा सल्ला आवश्यक असेल, ज्यानंतर तणावमुक्त व्हाल. रोजगाराची संधी मिळेल. आरोग्य सुद्धा हलके-फुलके राहील आणि बाहेरचे खाणे टाळा. जवळच्या लोकांशी वाद टाळा, नुकसान होऊ शकते.

धनु
दिवस शांतताप्रिय आहे. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल, ज्यातून लाभ होईल. वडीलांच्या सल्ल्याने रखडलेली डील फायनल होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. संततीचे सामाजिक कार्य पाहून आनंद होईल. कर्ज सहज मिळेल. सायंकाळी आईशी वाद होऊ शकतो, परंतु वाणीवर नियंत्रण ठेवा.

मकर
दिवस प्रभाव आणि प्रताप वाढवणारा आहे. उच्च अधिकार्‍यांच्या कृपेने नोकरीत प्रमोशन किंवा धनलाभ होऊ शकतो. रखडलेले काम मार्गी लागेल. दाम्पत्य जीवन सुखात राहील. विवाहाचे उत्तम प्रस्ताव येतील. सायंकाळी आई-वडीलांची सेवा कराल.

कुंभ
उत्तम लाभाच्या संधी मिळतील, पण संधी ओळखावी लागेल. अन्यथा संधी हातातून जाईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. शत्रु त्रास देऊ शकतात, सावध रहा. जुन्या मित्राची भेट होईल. सायंकाळ कुटुंबातील लहान मुलांशी मजामस्तीत घालवाल.

मीन
दिवस फलदायक आहे. सुरू असलेल्या समस्यांमधून मुक्ती मिळेल. गमावलेला पैसा परत मिळेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांसोबत मजामस्ती कराल. कठिण समस्यांवर मार्ग काढाल. संपत्ती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.