21 एप्रिल राशीफळ : आज चंद्र स्वराशीत, ‘या’ 5 राशींचे चमकणार नशीब, इतरांसाठी असा आहे बुधवार

मेष
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. व्यापारात सुधारणा होईल. नव्या संधी मिळतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. सायंकाळी रखडलेले काम मार्गी लागेल. ओळखीच्या व्यक्तीची भेट होईल, ज्यातून बिझनेसला लाभ होईल. संततीकडून एखादी आशादायक बातमी समजेल. सामाजिक क्षेत्र वाढेल. प्रसिद्धी वाढेल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. राजकीय क्षेत्रात प्रयत्न यशस्वी होतील. जनसमर्थन मिळेल. कुटुंबात मंगलकार्य होऊ शकते. सायंकाळी काही नावडत्या व्यक्ती भेटल्याने त्रास होऊ शकतो. व्यापारात नवीन करार होऊ शकतो. पद, प्रतिष्ठेत वाढ होईल. संततीचे महत्वाचे काम एखाद्या मोठ्या अधिकार्‍याच्या माध्यमातून पूर्ण होईल. आईच्या प्रकृतीत घसरण होऊ शकते, लक्ष द्या.

मिथुन
आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामात निष्काळजीपणा नको, अन्यथा वेळेत काम होणार नाही. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधात सुखद अनुभव येईल आणिच चर्चेतून समाधान मिळेल. सायंकाळी रखडलेले काम पूर्ण होईल. मंगलकार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबात तुमच्यावर एखादा आरोप होऊ शकतो, गैरसमज होऊ शकतो.

कर्क
आजचा दिवस संमिश्र आहे. उपजिविकेच्या क्षेत्रात अपयश येईल. नवीन संधी मिळतील. बुद्धी आणि विवेकाने काम करा, अन्यथा प्रकरण गंभीर होईल. ज्येष्ठांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यामुळे कामे यशस्वी होतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. सायंकाळी प्रियव्यक्तीची भेट आणि शुभवार्ता समजू शकते. वडीलांच्या मार्गदर्शनाने सर्व कामे यशस्वी होतील. मित्र मदतीसाठी पुढे येतील.

सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कुटुंबाच्या मदतीने उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील, पैसा वाढेल. पार्ट टाइम जॉबसाठी वेळ काढू शकता. घरातील वातावरण संमिश्र राहील. घरातील सदस्य कामात व्यस्त असतील. भावाच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आर्थिकस्थिती मजबूत होईल.

कन्या
आजचा दिवस उत्तम यशदायक आहे. सरकारी नोकरीत प्रमोशन मिळू शकते. व्यापारासाठी प्रवास करू शकता. भविष्यात यातून लाभ होईल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदार कौटुंबिक बिझनेसमध्ये मदत करेल. आरोग्याबाबत सावध रहा. बाहेर खाणे टाळा.

तुळ
आजचा दिवस ठोस परिणामांचा आहे. आरोग्यात थोडी घसरण होऊ शकते, मात्र सायंकाळी त्यामध्ये सुधारणा होईल. घरात एखादे शुभकार्य होऊ शकते. कुटुंबातील सदस्य आनंदी असतील. बिझनेसमध्ये आई-वडीलांचे सहकार्य मिळेल, यामुळे तणावमुक्ती होईल. मित्रांसोबत प्रवासाला जाऊ शकता. आवश्यक प्रमाणात पैसा मिळेल, ज्यातून कुटुंबाच्या गरजचा पूर्ण कराल.

वृश्चिक
आज आरोग्य थोडे कमजोर राहील. कार्यक्षेत्रात एखाद्या कमजोरीमुळे चिंतेत दिसाल. उत्पन्न आणि खर्च दोन्हीमध्ये संतुलन ठेवावे लागेल, अन्यथा भविष्यात संकट येऊ शकते. भावाच्या विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील. जोडीदारासाठी भविष्याची योजना बनवाल. घरातील कामे टाळली तर आई नाराज होऊ शकते, यासाठी तिला समजवा. संततीच्या अभ्यासाची चिंता संपेल.

धनु
आजचा दिवस संमिश्र आहे. व्यापारात वाढ होईल, परंतु आर्थिक लाभ फारसा होणार नाही. पुढील कामे प्रभावित होतील. यासाठी धोरण बनवून काम करा. सासरच्या बाजूच्या एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते आज परत मिळतील. शासनाकडून लाभ मिळेल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्याल. महत्वाच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका, अन्यथा निराशा हाती येईल. कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी असतील, परंतु ज्येष्ठ तुमच्या खर्चामुळे थोडे त्रस्त असतील.

मकर
आजचा दिवस थोडा गोंधळाचा आहे. धावपळीशिवाय कोणतेही काम पूर्ण होणार नाही, यासाठी मेहनत करत राहा. घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. आई-वडीलांचा आशीर्वाद मिळेल आणि कुठेही जाताना पूर्ण तयारी करून जा. सायंकाळी कोणत्याही वादात पडू नका. कौटुंबिक आर्थिक प्रकरणांमध्ये यश मिळेल. उपजिविकेच्या क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात जोडीदाराचा सल्ला उपयोगी ठरेल.

कुंभ
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल. परदेशी नोकरीच्या कामासाठी दिवस उत्तम आहे. प्रेमसंबंधात नवीन सुरुवात होईल आणि नाते आणखी मजबूत होईल. सायंकाळी कुटुंबासोबत देवदर्शन करू शकता. वैचारिक शक्ती वाढेल, परंतु तिचा योग्य ठिकाणी वापर केला तर भविष्यात भरपूर लाभ मिळेल. एखादी वाईट बातमी ऐकून अचानक प्रवास करावा लागू शकतो. दाम्पत्य जीवन तणावपूर्ण राहील.

मीन
आजचा दिवस संमिश्र आहे. दाम्पत्य जीवनातील अडथळे दूर होतील. नातेसंबंधात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, संबंध बिघडू शकतात. संततीच्या विवाहाचा प्रस्ताव स्वीकारू शकता. व्यापारासाठी धावपळ करावी लागेल, ज्यामुळे अंगदुखीचा त्रास होईल. छोट्या मुलांसोबत वेळ घालवाल. भविष्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणुक यशस्वी ठरेल. प्रवासातून धनलाभ होऊ शकतो.