23 एप्रिल राशिफळ : मकर-मीनसह 5 राशींना होणार लाभच लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल शुक्रवार

मेष
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. समाजात कीर्ती वाढेल. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीला दूरच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता. संततीकडून एखादा तणाव होऊ शकतो, परंतु अस्वस्थ होऊ नका. वडीलांच्या सहकार्याने हा तणाव सायंकाळपर्यंत संपेल. दाम्पत्य जीवनात सुखद स्थितीचा अनुभव मिळेल. रोजगारासाठी प्रयत्न करणार्‍यांना नवीन संधी मिळतील. सायंकाळी मंगल कार्यात सहभागी व्हाल. कार्यक्षेत्रात रचनात्मक बदल प्रेरणा देईल.

वृष
आज प्रेमसंबंधात भेटवस्तू आणि सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात तुमचे लक्ष नवीन योजनांकडे लागेल. यासाठी आज दिवसभर त्याच धावपळीत रहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत देवदर्शनाला जाऊ शकता, यातून समाधान मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांसाठी पैसे खर्च कराल. जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल. एखाद्या मित्राच्या सल्ल्याने व्यापारात लाभ होईल.

मिथुन
आजचा दिवस संमिश्र आहे. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे भरपूर सहकार्य मिळेल. सहकारी सुद्धा तुमच्या सल्ल्याने काम करतील, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, निर्णय घेण्याची क्षमता आज प्रबळ होईल. तेच काम करा जे पूर्ण होण्याची आशा आहे. कामात रिलॅक्स होण्याची संधी मिळेल. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते, यासाठी सावध रहा. जर कुणाला पैसे उधार दिले असतील तर परत मिळतील.

कर्क
आज घरात एखादे मंगल कार्य होऊ शकते. ऑफिसमध्ये मनासारखे वातावरण राहील. भाऊ-बहिणीसोबत चांगला वेळ जाईल. प्रेमसंबंधात नवीन उर्जेचा संचार होईल. सायंकाळी एखाद्या मंगल सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. रिकाम्या वेळात घरातील सर्व अर्धवट कामे पूर्ण कराल. काही शॉपिंग सुद्धा कराल. उत्पन्न आणि खर्चाचे संतुलन ठेवा. अन्यथा भविष्यात आर्थिक संकट येऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात येत असलेले अडथळे दूर होतील.

सिंह
आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरीत शत्रुसुद्धा तुमच्या समोर मितभाषी बनतील, परंतु पाठीमागे गडबड करू शकतात. व्यस्ततेचा दिवस आहे, तरी जोडीदारासाठी वेळ काढाल. यामुळे जोडीदार खुश होईल. विद्यार्थ्यांना एखादी अप्रिय बातमी ऐकायला मिळेल. यासाठी अभ्यास एकाग्रतेने करा. नवीन संपत्ती खरेदी करण्यासाठी दिवस उत्तम आहे. सायंकाळ कुटुंबातील मुलांसोबत घालवाल.

कन्या
आजचा दिवस विशेष फलदायक आहे. व्यापारात जेवढी मेहनत केली असेल तेवढे फळ न मिळाल्याने नाराज व्हाल, परंतु वाणी आणि वागण्यात संयम ठेवा. व्यापारात धनलाभाची शक्यता असतानाच काहीतरी अडचणी येतील, यासाठी कुणालाही उधार देऊ नका. सायंकाळी मित्रांच्या सहकार्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जवळपासच्या लोकांशी वादाचा प्रसंग येऊ देऊ नका.

तुळ
आजचा दिवस नवीन उर्जा घेऊन येईल. कार्यक्षेत्रात जर काही वाद सुरू असेल तर तो आज सुटेल. काही नवीन प्रोजेक्टवर सुद्धा काम करू शकता, ज्याचा भविष्यात लाभ होईल. जमीन मालमत्तेच्या प्रकरणात एखाद्या कागदपत्रामुळे त्रस्त व्हाल, यासाठी सतर्क रहा. व्यवसायात चढ-उताराची स्थिती राहील, तरी सुद्धा प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जास्त लाभाच्या संधी मिळतील. संततीला पुण्यकार्य करताना पाहून मन आनंदी होईल. जोडीदाराशी वाद सुरू असेल तर तो आज संपेल.

वृश्चिक
आजचा दिवस उत्तम आहे. कुटुंबातील सदस्य तुमच्या टाळाटाळ करण्याच्या नीतीने नाराज होतील, परंतु सर्व कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. आज तुमच्यात धार्मिक भावनांचा उदय होईल, ज्यातून काहीवेळ पूजेत घालवाल. नोकरी किंवा व्यापारात एखाद्या नाविन्य आणू शकलात तर भविष्यात लाभ होईल आणि कामात उत्साह येईल. बाहेरच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, परंतु अनावश्यक वादात पडू नका. सायंकाळ कुटुंबासोबत मजामस्तीत घालवाल.

धनु
आज काही समस्यांचा सामना करावा लागेल. आरोग्यात काही समस्या असेल तर ती वाढू शकते, यासाठी ताबडतोब डॉक्टरांकडे जा. कार्यक्षेत्र काम करताना सावधानता आणि सतर्कता बाळगा, कारण शत्रु नुकसान करू शकतो. बँक लोन किंवा उधार घेण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. पैसे कमावण्यासाठी पार्टटाईम कामासाठी वेळ काढू शकाल. बिझनेसच्या बाबतीत एखादी जोखीम घ्यायची असेल तर वडीलांचा सल्ला घ्या.

मकर
आजचा दिवस कुटुंबात आनंद घेऊन येईल. भाऊ किंवा बहिणीच्या विवाहात काही समस्या येत असतील तर त्या आज संपतील, ज्यामुळे घरात आनंद असेल. भागीदारीच्या व्यापारात भरपूर लाभ होईल. संततीच्या शिक्षणाबाबत एखादा निर्णय घ्यावा लागेल. सरकारी नोकरीत इमानदारीने काम करा आणि नियमांचे पालन करा. रोजची घरगुती कामे करण्यासाठी वेळ मिळेल, परंतु आळस सोडावा लागेल.

कुंभ
आजचा दिवस विशेष फलदायक आहे. आरोग्यात काही अडचणी येऊ शकतात, यासाठी खाण्या-पिण्याची काळजी घ्या, कारण पोटदुखीची समस्या होऊ शकते. कार्यक्षेत्रात घाई करू नका, अन्यथा चूक होऊ शकते, यासाठी विचारपूर्वक काम करा. कुटुंबात एखाद्या सदस्यामुळे शांत वातावरण एकदम बिघडू शकते. बाहेर जाण्यापूर्वी आपल्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करून बाहेर पडा. संततीच्या विवाहाबाबत एखादी शुभवार्ता समजू शकते, यामध्ये जोडीदाराचे भरपूर सहकार्य मिळेल.

मीन
आजचा दिवस उत्तम लाभदायक आहे. व्यापारात जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर दिवस उत्तम आहे. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल, परंतु उत्पन्न थोडे कमी होईल. तरीसुद्धा आर्थिक स्थिती सामान्य राहील. कुटुंबातील वाद धैर्य आणि सौम्य वागण्याने ठिक करता येऊ शकतो, यासाठी रागावर नियंत्रण ठेवा. मोठे काम करायचे असेल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या, यामध्ये भरपूर यश मिळेल.