22 एप्रिल राशिफळ : या 5 राशीच्या जातकांच्या भाग्यात लाभ, प्रत्येक कामात होतील यशस्वी, इतरांसाठी असा आहे गुरुवार

मेष
आजचा दिवस उत्तम फलदायक आहे. कौटुंबिक वातावरण शांत, सौहार्दपूर्ण राहील. कार्यक्षेत्रात संघर्षानंतर समस्यांपासून दिलासा मिळेल. संततीची प्रगती पाहून आनंद वाटेल. अचानक आलेल्या कामांमुळे दिवसातील कामांमध्ये बदल करावा लागेल. आर्थिक संकटात असाल तर दिलासा मिळू शकतो. व्यापारात ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून लाभ होईल. सायंकाळी घरगुती कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल.

वृषभ
आजचा दिवस संमिश्र आहे. भाऊ-बहिणीच्या सहकार्याने सर्व कामे हळुहळु पूर्ण होतील. मित्रांसोबत दूरच्या प्रवासाची योजना बनवाल, परंतु यामध्ये कुणीतरी विघ्न टाकू शकतो. कार्यक्षेत्रात काम करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा शत्रु त्रास देण्याचा प्रयत्न करतील. सायंकाळी अचानक लाभदायक बातमी मिळाल्याने आनंदी व्हाल. घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी कराल, परंतु खिशाचा विचार करा. धार्मिक कामात रुची वाढेल. यामुळे मित्र वाढतील.

मिथुन
आज वेळ वेगाने पुढे सरकेल. ऑफिसमध्ये सुद्धा अनपेक्षित प्रगती पाहून सर्व हैराण होतील आणि शत्रुसुद्धा वाढतील. मनोरंजनासाठी डोळे बंद करून खर्च कराल, यामुळे कुटुंबिय यामुळे त्रस्त होतील. व्यापारात नवीन डिल फायनल होऊ शकते, परंतु त्या वेगाने व्यापारात आणाव्या लागतील, तरच लाभ मिळेल. कुटुंबात संतुलन राहील. आध्यात्मिक आणि परोपकाराची भावना प्रबळ राहील. सायंकाळी कुटुंबातील छोट्या मुलांसोबत मजामस्ती कराल.

कर्क
आजचा दिवस संमिश्र आहे. जर एखादे कायेदशीर प्रकरण असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने होईल. भावाच्या मदतीसाठी पुढे याल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम आहे. विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या संपेल. उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल. कार्यक्षेत्र आणि घरात ताळमेळ ठेवण्यात अपयशी ठराल. काम करण्याच्या नादात दुसरे काम बिघडण्याची भीती सतावेल. आई-वडीलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ देऊ नका.

सिंह
आजचा दिवस काही समस्यांचा आहे. व्यापारात मोठे नुकसान होऊ शकते, सावध राहा. डोळे आणि कान उघडे ठेवून काम करा. प्रवासासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत भविष्याबाबत चर्चा कराल. नोकरी आणि व्यवसायात सुधारणा हवी असेल तर आळस, आराम सोडा. कामावर लक्ष द्या. कुटुंबात प्रेम आणि उत्साह राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. सायंकाळी मंगल कार्यात सहभागी व्हाल.

कन्या
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. सरकारी क्षेत्रात आश्चर्यकारक परिणाम मिळाल्याने उत्साह वाढेल, परंतु भविष्यात लाभप्राप्तीसाठी अधिकारी वर्गाशी संबंध चांगले ठेवा, तेव्हाच लाभ मिळेल. नव्या उद्योगासाठी मनात उत्साह राहील. सायंकाळी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, ज्यामध्ये धावपळ जास्त करावी लागेल. कुटुंबातील लहान मुले एखादी मागणी करू शकतात, जी पूर्ण कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता.

तुळ
आजचा दिवस व्यस्ततेचा आणि धावपळीचा आहे. व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल, तेव्हा भविष्यात लाभ होईल. कुटुंबात एकाच वेळी अनेक कामे समोर आल्याने थोडे त्रस्त व्हाल. अनावश्यक खर्च टाळा आणि संतुलन ठेवा. कार्यक्षेत्रात विरोधक त्रास देण्यासाठी पुढे येतील, परंतु सर्वांना तुम्ही पराभूत कराल. परदेशात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चांगली बातमी समजेल. प्रेमसंबंधात शांतता राहील.

वृश्चिक
आजचा दिवस व्यापाराच्या प्रगतीसाठी आहे. अडकलेली सरकारी काम पूर्ण होतील. वडीलांच्या आरोग्यात घसरण होऊ शकते, ताबडतोब डॉक्टरांकडे जा. एखाद्या मोठ्या अधिकार्‍याच्या मदतीने जुना वाद निकाली निघेल. निराशाजनक विचार मनात येऊ देऊ नका, वेळ खुपच अनुकूल आहे. राजकारणाशी संबंधीत जातकांच्या प्रभावात वाढ होईल. नोकरीसाठी दिवस उत्तम आहे. सायंकाळी मित्रांसोबत फिरायला जाल.

धनु
आजचा दिवस नवीन संपत्तीत लाभ देणारा आहे. व्यापारात नवीन डिल फायनल होऊ शकते. यातून भरपूर लाभ मिळेल. कार्यक्षेत्रात सहकारी तुमच्या सल्ल्याने काम करताना दिसतील, ज्यामुळे आनंद होईल. जर सासरच्या बाजूचा एखादा व्यक्ती पैसे उधार मागत असेल तर विचारपूर्वक द्या, परत येण्याची शक्यता कमी आहे. दाम्पत्य जीवनासाठी दिवस चांगला आहे. सायंकाळी मंगल कार्यात सहभागी व्हाल. भावांशी प्रेमाने वागा. संततीच्या विवाहाचा प्रस्ताव प्रबळ होईल.

मकर
आजचा दिवस संमिश्र परिणामांचा आहे. कौटुंबिक संपत्ती मिळण्याचे योग आहेत, व्यापारात कुणाला उधार दिले असेल तर परत घेण्यासाठी मेहनत करावी लागेल. सामाजिक आणि धार्मिक कामात भाग घेतल्याने सन्मान वाढेल. मामा बाजूने सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभ होईल. बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेणार असाल तर दिवस उत्तम आहे. सायंकाळी धार्मिक स्थळी प्रवासाचा योजना आखू शकता.

कुंभ
आज भविष्यासाठी काही नवीन योजना बनवाल. सरकारी अधिकार्‍यांच्या सहकार्याने लाभ घेण्याची संधी आहे. बौद्धिक आणि वैचारिक क्षमता वाढेल, परंतु इतर लोकांचे ऐकावे लागेल, तरच पुढे जाऊन लाभ होईल. घरात तणाव राहू शकतो. जोडीदार काहीसा नाराज असू शकतो, त्यास समजावण्याचा प्रयत्न करा. अध्यात्म आणि धर्माबाबत रूची वाढेल. धार्मिक ठिकाणी जाण्याची योजना आखाल. नवीन व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे.

मीन
आज कार्यशैलीत सकारात्मक बदल होईल. लाभाची स्थिती उत्पन्न होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. भविष्याच्या रणनितीवर काम कराल. कार्यक्षेत्रात गुप्त शत्रुंपासून सावध रहा. कारण ते तुमचे काम बिघडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. घरातील ज्येष्ठांशी वाद होऊ शकतो, परंतु त्यांचे म्हणणे मान्य करून त्यांना खुश करा. मोठ्या कालावधीपासून पैसे अडकले असतील तर ते मिळू शकतात. मामाच्या बाजून सन्मान मिळेल.