6 जुलै राशिफळ : ‘या’ राशींसाठी सोमवारचा दिवस ‘शुभ’, भोलेनाथाचा मिळेल ‘आशीर्वाद’

मेष – आजचा दिवस चांगला आहे. कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल, तरीही मनात निराशा राहील. कुटुंबाची काळजी राहील. मानसिक ताण येऊ शकतो. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. थोडा खर्च होईल. इन्कम चांगले होईल. मित्र, नातेवाईक आणि शेजार्‍यांचे कामात सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. मानसिक चिंतांपासून मुक्ती मिळेल. भाग्याची साथ मिळेल. कामात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. तणाव असूनही परस्पर संबंध दृढ राहतील.

मिथुन
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. सावधगिरी बाळगा. कोणतीही मोठी कामे हातात घेऊ नका. मानसिक चिंता राहील. अनावश्यक खर्च आणि अनपेक्षित प्रवास होऊ शकतो. खर्च वाढेल. कामात खूप व्यस्त राहाल. वैवाहिक जीवनात तणाव राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

कर्क
दिवस चांगला आहे. कामात पूर्णपणे लक्ष देऊन पुढे जाल. वैवाहिक जीवनात समस्यांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. नाते मजबूत होईल. प्रेमसंबंधात रोमान्स वाढेल. कामात केलेल्या मेहनतीला यश मिळेल. भाग्याची साथ मिळाल्याने कामे होतील. खर्च वाढेल

सिंह
आजचा दिवस सामान्य आहे. काळजी घ्या. काही चिंता असू शकतात. खर्च वाढेल. पण उत्पन्नही वेगाने वाढेल. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जोडीदार आजारी पडू शकतो, त्याच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंध सुखी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. जोडीदाराला एखाद्या गोष्टीबद्दल राग येऊ शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील. तब्येत ठीक होईल.

तुळ
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील एखादी समस्या दूर करण्याचा प्रयत्न कराल. सर्वांसोबत बसून चर्चा कराल. कामात खूप व्यस्त राहिल्याने चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंध ठिक राहतील. भाग्याची साथ लाभल्याने अनेक कामे होतील.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जाण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवन प्रेम आणि रोमान्सने परिपूर्ण राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. विनाकारण कोणत्याही गोष्टीच्या मागे लागू नका. कामासाठी दिवस थोडा कमजोर आहे. काळजीपूर्वक काम करा. तब्येत ठीक राहील.

धनु
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाला वेळ द्याल. कामात चांगले परिणाम मिळतील. पदोन्नती होऊ शकते. वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस ठिक आहे. प्रिय व्यक्तीची कुटुंबाशी ओळख करुन देऊ शकता.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. प्रत्येक कामात तो तुमच्याबरोबर राहील, ज्यामुळे आनंद होईल. प्रेमसंबंध प्रेमपूर्ण राहतील. नात्यात रोमान्स वाढेल. कामात खुप मेहनत कराल, परंतु एखाद्या गोष्टीवरून थोडे दु:खी राहू शकता. खर्च वाढेल. पण उत्पन्नही चांगले होईल.

कुंभ
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिक चिंतेने ग्रासलेले राहाल. पायाला दुखापत होण्याची किंवा मुरगळण्याची शक्यता आहे, सावधगिरी बाळगा. उत्पन्न ठीक होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात चढ-उतार राहील. कामात चांगले परिणाम मिळतील. कुटुंबात आनंद राहील.

मीन
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. वैवाहिक जीवन शानदार राहील. प्रेमसंबंधही चांगले राहतील. एकमेकांशी बोलण्याने समजूतदारपणा वाढेल आणि एकमेकांना अधिक चांगले समजू शकाल. कुटुंबात काही महत्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा होईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like