कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेदरम्यान थरार : ‘तो’ थोडक्यात बचावला 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईन

प्रतिनिधी : शिल्पा माजगावकर


कोल्हापूर येथे विना लाठी  बैलगाडी, घोडागाडी स्पर्धेत छकडा गाडीत उभं राहून शड्डू मारण्याचा प्रयत्न करते वेळी तरुणाचा थरारक अपघात झाला. धावत्या गाडीतून पडल्यामुळे हा तरुण जखमी झाला. घोडागाडी चालकाच्या अतिउत्साहामुळे हा अपघात घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील माद्याळ या गावात  २७ ऑगस्ट रोजी सकाळी विना लाठी  बैलगाडी, घोडागाडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेवेळी घोडागाडी तुफान वेगाने धावत होती. त्यावेळी हा तरुण घोडागाडीमध्ये उभा होता. छकडा गाडीत उभे राहून शड्डू मारण्याचा प्रयत्न या तरुणाने केला. मात्र घोडागाडीच्या प्रचंड वेगामुळे तो खाली पडला. त्याच्या पाठोपाठ अनेक घोडागाड्या आणि  मोटरसायकली येत होत्या. त्यापैकी एक घोडागाडीचे चाक त्याच्या अंगावरुन गेले. घोडागाडी चालकाच्या अतिउत्साहामुळे हा अपघात घडला.
 [amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e87f700-aa9c-11e8-8424-fd8f92ebb2c3′]
विशेष म्हणजे ही शर्यत पाहण्यासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी घटनेचे प्रसंगावधान राखून चालकाला तातडीने बाजूला सारले, यामुळे अनर्थ तर टळला मात्र तरुण गंभीर जखमी झाला आहे.गर्भपात करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हासध्या  राज्यात  घोडागाडी, बैलगाड्यांच्या स्पर्धेला  बंदी असली तरी अनेक खेडोपाड्यांमध्ये बैलगाड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात.  त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील माद्याळ या गावात झालेली ही घोडागाडी स्पर्धा आता वादग्रस्त ठरू शकते.