हा डोक्यावर पडला काय ? जितेंद्र आव्हाड शरद पोंक्षेंवर भडकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अस्पृश्यता निवारणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा विनायक दामोदर सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे, असे वक्तव्य करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. हा डोक्यावर पडला आहे काय ? असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.


पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात ‘mi’ वर्कृत्व स्पर्धेचा समारोप पोंक्षे यांच्या उपस्थितीत पार पडला. सावरकर विचारांचे कट्टर अनुयायी असलेल्या पोंक्षे यांनी यावेळी अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या कार्याशी केली होती. आंबेडकर व फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्यानं त्यांनी जातीव्यवस्थेचे फटके बसले. त्यामुळं त्यांनी विद्रोह केला. याउलट अस्पृश्यतेचे कुठलेही चटके बसले नसतानाही सावरकर ब्राह्मणवादाविरोधात उभे राहिले. त्यामुळे त्यांच कार्य श्रेष्ठ असल्याचे पोंक्षे म्हणाले होते.

पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून शरद पोंक्षे यांना सुनावलं आहे. आपण काय बोलतो हे त्यांचे त्यांना कळते की नाही, असा खोचक टोला लगावताना हा डोक्यावर पडला आहे काय असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.