‘या’ 13 संस्था देणार ‘ड्रोन’ उडवण्याचे ‘प्रशिक्षण’, प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मिळेल ‘नोकरी’ किंवा सुरु करा स्वत:चा व्यवसाय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण आहे की डायरेक्टर जनरल नागरी उड्डयन वेळोवेळी ड्रोनबाबत नियम बनवत आहेत. ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही. यासाठी डीजीसीएने ड्रोन पायलट तयार करण्यासाठी देशातील 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता दिली आहे. डीजीसीएद्वारे मान्यता प्राप्त असणाऱ्या केवळ या 13 अकादमीच प्रशिक्षण देणार आहेत. यांनी दिलेल्या प्रमाणपत्रांच्या आधारे ड्रोन पायलटला कुठेही नोकरी मिळेल किंवा तो स्वत:चा व्यवसाय देखील करु शकतो.

ड्रोन पायलटांना मिळणार लाखोंची कमाई करण्याची संधी?

माहितीपट किंवा व्यावसायिक व्हिडिओग्राफीमध्ये ड्रोनचा वापर काळानुसार वाढत आहे. इतकेच नाही तर रेल्वेने आपल्या आस्थापनेच्या संरक्षणासाठी ड्रोनचा वापरही सुरू केला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने पॅसेंजर कंपार्टमेंट फॅक्टरीच्या सुरक्षिततेसाठी आणि पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. 9 ड्रोन 32 लाख रुपयांच्या किंमतीवर खरेदी करण्यात आली आहेत. आता ड्रोन बरीच मोठी आणि महाग देखील येऊ लागली आहेत. दरम्यान शेतात कीटकनाशके फवारणी करणार्‍या कंपन्या, सुरक्षा क्षेत्रात गुंतलेल्या एजन्सीज आणि रिअल इस्टेटमधील मोठं-मोठ्या प्रकल्पांमध्येही ड्रोनचा वापर केला जात आहे. तेल कंपन्यांनीही त्यांच्या पाइपलाइनवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर सुरू केला आहे.

वजनानुसार ड्रोनसाठी हे असतील मानक

ड्रोनला वजनानुसार वेगवेगळ्या प्रकारात ठेवले गेले आहे. 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाच्या ड्रोनला नॅनो ड्रोन म्हटले जाईल. यापेक्षा जास्त वजनाच्या मायक्रो किंवा मिनी ड्रोनसाठी यूआयडी व्यतिरिक्त इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. नवीन नियमांनुसार 250 ग्रॅम ते 2 किलो वजनाचे मायक्रो ड्रोन्स, 2 किलो ते 25 किलो, 25 किलो ते 150 किलो आणि त्यापेक्षा जास्त वजनाच्या मिनी आणि मोठ्या ड्रोनवर यूआयडी प्लेट व्यतिरिक्त आरएफआयडी/ सिम, जीपीएस, आरटीएच (रिटर्न टू होम) आणि अँटी कॉलिजन लाईट लावणे आवश्यक असेल. तथापि, 2 किलोपेक्षा जास्त वजनाचे मानवरहित मॉडेल एअरक्राफ्टवर केवळ आयडी प्लेट स्थापित करणे आवश्यक असेल. तसेच 250 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनला आता केवळ ट्रेंड ड्रोन पायलटच उडवू शकतील.

स्थानिक अधिकाऱ्यांची घ्यावी लागेल परवानगी

प्रतिबंधित भागात नॅनो आणि मायक्रो ड्रोन स्थानिक अधिकाऱ्यांच्या परवानगीने बंद किंवा आच्छादित आवारात उडवता येऊ शकतात. तसेच फिरते वाहन, जहाज किंवा विमानातून ड्रोन उडवले जाऊ शकत नाहीत. नॅनो ड्रोन 50 फूट आणि इतर ड्रोन 200 फूट उंचीवर उडवता येऊ शकतात.

नवीन नियमात या ठिकाणी ड्रोन उडवण्याची परवानगी नसणार

विमानतळाच्या पाच किमीच्या परिघामध्ये ड्रोन उडवण्याची परवानगी नसणार आहे. त्याचप्रमाणे विमानतळ प्राधिकरणाद्वारे प्रतिबंधित, निषिद्ध आणि धोकादायक घोषित केलेल्या भागात ते उडवले जाणार नाहीत. आंतरराष्ट्रीय सीमेच्या 50 कि.मी.च्या परिघामध्ये ड्रोन उडवण्यात बंदी घातली जाईल, त्यामध्ये नियंत्रण रेखा (एलओसी), वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) आणि वास्तविक भूस्थानिक (एजीपीएल) लाइनचा समावेश आहे.

ड्रोनला समुद्र व जमिनीपासून किती अंतरावर आणि उंचीवर उडवता येईल याबाबतच्या सीमा देखील निश्चित केल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, त्यांना समुद्रकाठापासून 500 मीटर क्षैतिज अंतरापर्यंत उडवले जाऊ शकते. दिल्लीतील लुटियन्स झोनच्या उच्च सुरक्षा क्षेत्रासाठीही एक मर्यादा सांगितली गेली आहे. यानुसार ड्रोन विजय चौकपासून सर्व बाजूंनी पाच किलोमीटर अंतरावर दूर ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे, गृह मंत्रालयाने निश्चित केलेल्या लष्करी आस्थापने आणि ठिकाणांहून त्यांचे उड्डाण अंतर नेहमी 500 मीटर किंवा त्याहून अधिक असले पाहिजे. तर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात, राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांवर ड्रोन उडवण्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता असेल.