प्राप्तीकर नियमांनुसार घरात किती सोनं ठेवता येतं ? जाणून घ्या नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीयाचे सोन्याबद्दलचे आकर्षण बऱ्याच काळापासून आहे आणि गेल्या काही वर्षापासून यामध्ये वाढ झाली आहे. भारतीयांमध्ये सोने म्हणजे केवळ गुंतवणूक नसून त्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय कुटुंबात सोन्याला विशेष प्राधान्य दिलं जातं. दरम्यान, प्राप्तिकर नियमानुसार घार सोन साठवणूकसंबंधित काही मर्यादा आहेत. म्हणजे घरात किती सोनं ठेवायचं याला मर्यादा असून प्राप्तिककर नियम काय आहे ? याची माहिती जाणून घ्या.

होस्टबूक लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष कपिल राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती सोनं साठवणूकीविषयी विविध श्रेणींसाठी नमूद केलेल्या तरतूदींची पूर्तता केल्यास संबंधितांना उत्पन्नाच्या स्थितीसंबंधित माहिती देणं बंधनकारक नाही. एक विवाहित महिला 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकते, तर अविवाहित पुरुष 250 ग्रॅम सोनं ठेवू शकतो. यांना उत्पन्न स्त्रोताविषयी माहिती देणे बंधनकारक नाही. तसेच पुरुषांना 100 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवण्याची मुभा आहे. त्यानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत सोनं साठवणूक असल्यास प्राप्तीकर विभागाकडून संबंधितांचे सोनं जप्तीची कारवाई होत नाही.

मर्यादेपेक्षा सोने ठेवल्यास काय होते कारवाई ?

जोपर्यंत आपण सोन्याचे किंवा दागिन्यांच्या संपादनाचे स्त्रोत प्रदान करू शकतात, तोपर्यंत सोन्याचे दागिने घरात ठेवण्याची मर्यादा नाही. म्हणजे एखादा व्यक्ती मर्यादेपेक्षा जास्त सोने-दागिने ठेवत असेल तर उत्पन्न स्त्रोताविषयी माहिती देणं बंधनकारक असेल, ज्याद्वारे सोनं खरेदी केलं आहे. मोठ्या प्रमाणात सोनं साठवणूक असल्यास उत्पन्नाचा स्त्रोत विचारात घ्यावा लागेल. तर गुंतवणूकीचा पुरावा तुम्हाला तुमच्या आयकर परताव्याच्या विरुद्ध गुंतवणुकीचा स्त्रोत स्थापित करण्यात मदत करेल.

भेट स्वरूपात आलेल्या सोनं व दागिन्यांविषयी माहिती कशी द्याल ?

तज्ज्ञांच्या मते अशा स्थितीत सोनं व दागिन्याची खरेदी रिसिप्ट जपून ठेवणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास संबंधितांना वेल्थ टॅक्स रिटर्न आणि शेड्यूल फिक्स असेट्स इन इनकम टॅक्स अंतर्गत सोने व दागिन्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. दरम्यान, यामध्ये कुठलीच तफावत नसावी. असल्यास संबंधितांना याबाबत संपूर्ण माहिती द्यावी लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like