‘असं’ दूर करा प्रायव्हेट पार्टला होणारं इंफेक्शन ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – सध्याच्या बिजी लाईफमध्ये शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सला अनेक कारणांमुळं इंफेक्शन होत असतं. अनेकदा हे इंफेक्शन शरीराच्या इतर भागात पोहोचतं आणि याचे गंभीर परिणाम होतात. अनेक कारणांमुळं त्वचेच्या खाजेची समस्याही येते. आज आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच यासाठी काय काळजी घ्यायला हवी हेही जाणून घेणार आहोत.

जर त्वचेला खाज सतत येत असेल तर व्हजायनल पेन किंवा लिव्हरचं दुखणंही असू शकतं. स्किनच्याही अनेक समस्या येतात जसे की, अ‍ॅलर्जी, स्किन रॅशेस आणि डर्माटायटीस म्हणजेच त्वचारोग. अनेकदा ही समस्या संपूर्ण शरीराला किंवा शरीराच्या विशिष्ठ भागालाच असू शकते. बहुतांश वेळा इतर आजारांमुळंही त्वचा कोरडी पडते आणि खाजेची समस्या येते. फोड आणि पुरळ आल्यानंही खाज येते.

लघवी केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट पाण्यानं स्वच्छ केला नाही तर इंफेक्शन होतं आणि खाज येते. पुरुष असो किंवा महिला डोक्यात उवा झाल्यानंतरही खाज येते. रस्त्यावरून चालताना किंवा जीने चढताना जर तापमान अधिक असेल तरीही खाज येते. सुरुवातीला या खाजेचं प्रमाण कमी असतं. परंतु जास्त प्रमाणात खाजवलं तर ती त्वचा लाल पडते. यामुळं पुरळंही येते. कंबर, छाती, मांड्या आणि बेंबीच्या आसपास खाजेची समस्या उद्भवते. या भागावर इंफेक्शन होण्याचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे बर्थ कंट्रोल करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादनं. जर शरीर संबंध ठेवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर आजारांचा धोका वाढतो.

त्वचेच्या खाजेपासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स

1) त्वचा मऊ राहिल याकडे लक्ष द्या. यासाठी मॉईश्चराईजर वापरा

2) जर तुमच्याकडे एखादी अँटी इचिंग क्रिम असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता.

3) कडुलिंबाची पानं उकळून गाळून घेऊन यानं जर अंघोळ केली तर खाज कमी होते.

4) जर नखं वाढली असतील तर यानं इंफेक्शन झालेला भाग कधीही खाजवू नका.

5) दिवसातून किमान 2 वेळा स्वच्छ अंघोळ करावी.

6) डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही एखादं अॅलर्जी रोखणारं औषधही घेऊ शकता.

7) साबण, डिटर्जंट आणि पर्फ्युम देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानं वापरावं.

8) चिंच, लोणचं, लिंबू, टोमॅटो, तेल, लाल मिरची, चहा अशा पदार्थांचं सेवन टाळावं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.