घरच्याघरी ’या’ 4 उपायांनी ‘किडनी स्टोन’पासून मिळवा मुक्ती, जाणून घ्या

किडनीस्टोन ही अतिशय वेदनादायी आरोग्य समस्या आहे. किडनीस्टोन असलेल्या व्यक्तीला कधीही याचा त्रास होऊ शकतो. अ‍ॅलोपॅथीमध्ये यावर ऑपरेशन हाच मार्ग सुचवला जातो. मात्र, आयुर्वेदात किडनीस्टोनवर अनेक उपाय सांगितले आहेत. किडनीस्टोन ही समस्या होण्याची विविध कारणे आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणे होय. घरच्याघरी किडनीस्टोनवर काही सोपे उपाय करता येऊ शकतात, हे उपाय कोणते ते जाणून घेवूयात.

हे उपाय करा

1 राईचे तेल, लिंबाचा रस
लिंबाच्या रसात राईचे तेल मिक्स करून ते प्यायल्यास ही समस्या नष्ट होते. स्टोन तोडण्यासाठी लिंबाचा रस आणि राईचं तेल स्टोनला बाहेर काढण्यासाठी उपयोगी आहे.

2 डाळिंबा
एन्टीऑक्सिड्ंस यामध्ये भरपूर असतात. याच्या नियमित सेवनाने हा आजार कमी होऊ शकतो. तसेच दररोज सकाळी एक चमचा आवळा पावडर खाल्ल्यास किडनी स्टोनपासून आराम मिळतो.

3 सफरचंद व्हिनेगर
सफरचंदाचे व्हिनेगर घेतल्यास किडनी स्टोन पुर्णपणे नष्ट होऊ शकतो. पण हे प्रमाणात सेवन करावे. सकाळच्यावेळी दोन लहान टिस्पून गरम पाण्यासोबत घ्या.

4 भरपूर पाणी प्या
दिवसातून कमीतकम 7 ते 8 ग्लास पाणी प्या. जास्तीत जास्त पाणी प्यायलाने स्टोनची समस्या होणार नाही. समस्या उद्भवल्यास आणि स्टोनचा आकार लहान असल्यास तो मुत्रावाटे निघून जाईल.