मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या युगात तुमची महत्वाची माहिती, आणि तुमचे डिजिटल व्यवहार यासंदर्भातली माहिती तुमच्या जीमेल सर्व्हरवर स्टोअर होत असते . पण तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या ‘जी मेल’ अकाऊंटचे नक्की होते काय ? पण गुगलने ती देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मृत्यूनंतर जीमेल अकाऊंट आपोआप डिलीट दिलीत होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
असे करा तुमचे ‘जी मेल’ अकाउंट डिलीट
तुमचं जीमेल अकाउंट डिलिट करण्यासाठी या ठीकाणी आणखी एक पर्याय दिसेल.
ज्याद्वारे तुमचं अकाउंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनी कडून ते डिलिट होणार हे तुम्हाला ठरवता येतं.
start वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनअॅक्टिव्ह मॅनेजरचं पेज दिसेल ज्यात तुम्हाला ३ महिने, ६ महिने, १२ महिने, १८ महिने असे ४ पर्याय उपलब्ध आहेत.
यातील कोणताही पर्याय तुम्ही तुमच्या सोईसुनुसार निवडू शकता.
यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तेवढा काळ तुम्ही ते बंद ठेवल्यास तुमचं अकाउंट कंपनी कडून डिलिट केलं जातं.
पण तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर १ महिना अगोदर SMS किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क करण्यात येतो व त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.
तुमच्या जवळच्या व्यक्तींना देता येते कल्पना
याशिवाय याठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या १० व्यक्तींची नावं समाविष्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे १० व्यक्तींना तुमचं जीमेल अकाउंट डिलिट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. तसेच यात तुम्ही ऑटो रिप्लायचा पर्यायही निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीला आपोआप एक मेसेज जाईल की, तुम्ही हे अकाउंट वापरत नाही आहात. अशाप्रकारे तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही तुमचं अकाउंट डिलिट करू शकता