How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील

ADV

नवी दिल्ली : How To Earn-Save | नवीन वर्ष सुरु होताच कोरोनाचे (coronavirus) रुग्ण वाढू लागले आहेत. सरकारनेही नवीन नियमांची घोषणा करून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या बाबतीत पुन्हा एकदा झपाट्याने झालेली वाढ हे तिसऱ्या लाटेचे (3rd wave of corona) लक्षण असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत लोकांना आर्थिक परस्थितीच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या कठीण काळात तुम्ही तुमची घरगुती आर्थिक परिस्थिती कशी सुधारू शकता याबद्दल आमच्या एक्स्पर्टचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. (How To Earn-Save)

 

खर्चाचे एनालिसिस आवश्यक आहे.

ADV

सेबीचे गुंतवणूक सल्लागार (SEBI Investment Advisor) आणि तज्ज्ञ जितेंद्र सोलंकी (jitendra solanki) म्हणतात, आर्थिक नियोजन करताना कमाई, खर्च आणि बचत या सर्व गोष्टींचा समावेश केला जाईल. गेली 2 वर्षे आपण कोरोनाच्या काळात घालवली आहेत, अशा परिस्थितीत आपला खर्चहि कमी झाला आहे. आपण आता कमी प्रमाणात बाहेर फिरायला जात आहोत. व खर्च हि कमी प्रमाणात करत आहोत. परंतु आता तिसरी लाट येत आहे. यावेळेस आपण आधीच दोन लाटांचा सामना केला आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेचे (3rd wave of corona) प्लॅनिंग करून खर्च कमीत कमी करू शकतो. सोलंकी म्हणतात कि आवश्यक तिथेच खर्च करा, व खर्चाचे एनालिसिस करा.

 

आरोग्य विमा पॉलिसी (health insurance policy) आवश्यक.

जितेंद्र सोलंकी म्हणतात, आरोग्य विमा पॉलिसी आपल्याला इतर खर्चापासून वाचवेल, ज्यांनी हि पॉलिसी घेतली नाही त्यांनी आवश्य घ्यावी. व ज्यांनी हि पॉलिसी 3 ते 5 लाखांपर्यंत घेतली होती त्यांनाही हि पॉलिसी कमी पडत आहे. कारण कोरोनाच्या काळात लोकांनी मेडिकलवर दहा लाखांपर्यंत खर्च केला आहे. त्यामुळे आरोग्य विमा पुरेसा नाही, याचेही विश्लेषण आवश्यक आहे. सोलंकी म्हणतात की चार जणांच्या कुटुंबामध्ये 10 ते 15 लाखांची आरोग्य विमा पॉलिसी असावी. पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही टॉप अप पॉलिसी घेऊ शकता. (How To Earn-Save)

 

फायनान्शिअल प्लॅनिंग रिव्यू दरवर्षी आवश्यक.

जितेंद्र सोलंकी यांच्या मते, आर्थिक नियोजन हे वन टाइम एक्सरसाइज सारखे नाही, त्याचा दरवर्षी आढावा घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांच्या शाळेची फी किंवा कोणताही हप्ता भरावा लागतो त्यामुळे बजेट बिघडते. त्यामुळे आपल्याला हे पाहायचे आहे कि आपला खर्च वाढतोय कि नाही जर वाढत असेल तर कमाई हि वाढवायला हवी.

 

होम लोन ट्रान्सफर लक्षपूर्वक करणे.

जितेंद्र सोलंकी सांगतात, होम लोनचाही खर्चात समावेश असतो, पण आता काही बँका अत्यंत कमी दरात होम लोन देत आहेत.
त्यामुळे होम लोन ट्रान्सफरमध्ये तुम्हाला लोन ट्रान्सफरचा फायदा कितपत मिळत आहे,
व तुम्हाला तुमच्या पूर्ण लोन अमाऊंट ट्रान्सफरचा फायदा होतो कि नाही हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.

 

चांगला क्रेडिट स्कोर आवश्यक आहे.

क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळणे सोपे जाईल, त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोर ठेवा.
सोलंकी सांगतात की, तुमची क्रेडिट हिस्ट्री कशी आहे हे बँका तपासतात.
जर तुमची हिस्ट्री चांगली असेल तर कर्ज मिळवणे सोपे होईल. पेमेंट डीफॉल्ट कधीही होऊ देऊ नका.

 

Web Title :- How To Earn-Save | how to earn how to save where to spend how much these expert tips will help for you

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा