Pune Corona | पुण्यात कोरोनाचे 84 टक्के रूग्ण घरीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Corona | राज्यासह पुण्यातही कोरोना (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढत (Pune Corona) असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या 4,202 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 3,524 कोरोनाबाधित गृह विलगीकरणात आहेत, 678 कोरोना रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्हणजेच खरंतर साधारण 84 टक्के रुग्णांना साधारण लक्षणे असल्याचं सांगण्यात येते.

दैनंदिन कोरोनाच्या रूग्णसंख्येत (Coronavirus) वाढ होत आहे. दिवसेंदिवस 400 ते 500 रुग्णांची भर पडताना दिसत आहे. यातच 80 ते 85 टक्के कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणेच नाहीत किंवा सौम्य स्वरुपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांना गृह विलगीकरणात (Home quarantine) ठेवले जाते. गृह विलगीकरणातील रुग्णांनी सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. (Pune Corona)

  • सक्रिय रुग्ण – 4,202
  • रुग्णालयात उपचार घेतलेले रुग्ण – 676
  • होम क्वारंटाईन रुग्ण – 3,524

दरम्यान, कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉन (Pune Omicron) बाधित रुग्णांचा आकडा देखील वाढतो आहे. 125 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असा इशारा वैद्यक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Web Title : Pune Corona | corona patients every day 84 home pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी