Home Remedies : ‘हे’ 5 घरगुती उपाय, जे दूर करतील जुन्यातील जुना खोकला, जाणून घ्या

वातावरणातील बदलामुळे किंवा बाहेरील खाण्यामुळे अनेक लोकांना खोकल्याची समस्या होते. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय परिणामकारक ठरू शकतात. खोकला हा छातीत कफ, श्वसननलिका आणि घशातील इंफेक्शन यामुळे होतो. सूखा आणि कफाचा खोकला दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा…

हे आहेत उपाय

1 आल्याचा एक छोटा तुकडा तोंडात टाका आणि तो हळुहळु चोखत राहा. 5 दिवस हा उपाय करा.

2 एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा खाण्याच्या पानाचा रस मिक्स करा. यामध्ये मध सुद्धा टाकू शकता. हे मिश्रण चाटण सारखे घ्या. एक आठवडा हा उपाय करा.

3 दिवसात तीन वेळा एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळा आणि प्या.

4 दिवसभर कोमट पाणी प्या.

5 आले, मध, तुळस आणि काळीमिरीचे सेवन करा.